ओ दादा…जरा दमानं घ्या! झुक्यानं कंपनीचं बारसं केलंय. फेसबुकचं न्हाई.

फेसबुकच्या ऑफिसात गुरुवारी मिटिंग पार पडली. झुक्या भावाला वाटलं आता कंपनीनं चांगलंच बाळसं धरलंय. कंपनीचं नाव बदलायला पाहिजे. मग काल बारसं पार पडलं. तो सोहळा फेसबुकवर छोट्याश्या क्लिप मध्ये दिसतोय.

आता ज्यांना हा बारश्याच्या सोहळा दिसत नाही त्यांच्यासाठी खास सोहळ्याचं प्रक्षेपण बोल भिडू करतंय.  

आता व्हिडिओ बघून झाला असेल तर मूळ मुद्द्याला सुरुवात करूया.

पहिल्यांदा तर हे सांगते की, फेसबुकचं नाव बदललेलं नाही. तर मार्क झुकरबर्गने त्याच्या कंपनीचं नाव बदललंय. या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मची कंपनी आता ‘मेटा’ या नव्या नावानं ओळखली जाईल. संस्थापक व सीईओ मार्क झुकेरबर्ग याने याची घोषणा फेसबुकच्या गुरुवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.

त्याने भविष्यातील व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिजन उर्फ मेटाव्हर्स यासाठी मेटा नावाच्या स्वरूपात या ब्रँडची नवी उभारणी करत असल्याच म्हण्टलंय. आता फेसबुक कंपनी फेसबुक फर्स्टऐवजी मेटाव्हर्स फर्स्ट असणार आहे.

कंपनी या वर्षी १ डिसेंबरपासून एमव्हीआरएस नावानं ट्रेडिंग सुरू करेल. फेसबुकची अल्फाबेटसारखी संपूर्ण पुनर्बांधणी हाेणार नाही. म्हणजे फेसबुक आज तुम्ही जस वापरताय, अगदी तसंच राहील.

आता हा उपदव्याप झुक्यानं का केलाय ?

तर सध्या वादग्रस्त मजकूर व लोकशाहीविरोधी कंटेंटवरून होत असलेल्या आरोपांवरून लक्ष वळवण्यासाठी झुक्याने ही आयडिया लढवली असल्याचं तज्ञ मंडळी सांगतायत.

नवीन कंपनीचं नामकरण करताना झुक्यानं आपले चार शब्द मांडले. त्यात तो म्हणतो,

नवीन नावातून तुम्हाला आमचा हेतू दिसेल. आम्हाला काय करायचय हे देखील यातून स्पष्ट आहे. आमची संपूर्ण ओळख सांगण्यासाठी फेसबुक हे नाव अपुरं पडलं आहे. पण तरीही लोक अजूनही आमच्याशी जोडलेले आहेत. येणाऱ्या काळात आपण स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने सादर करू शकू.

झुकरबर्गने त्याच्या ट्विटर हँडलवर @meta जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच meta.com आता तुम्हाला थेट Facebook च्या होम पेजवर रीडायरेक्ट करेल.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.