एका मिनिटात 42 वेळा गिअर बदलणाऱ्या स्पीडच्या बादशहाचा मृत्यूसुद्धा तितकाच दर्दी होता….

If the one day speed kills me
Don’t cry because I was smiling
– paul Walker

हे वाक्य आहे स्पीड किंग,वेगाच्या बादशहाचं. ज्याच्या गाडीच्या स्पीडचा नजारा बघून भलेभले मागे सरकायचे.

हॉलीवूड सिनेमा बघणाऱ्या लोकांना पॉल वॉकर काय असामी होती हे सांगायची गरज नाही. आपल्याकडे ड्युक घेऊन पळणारे पोरं तर त्याच्यासमोर चिल्लर होते. स्पीड म्हणजे काय असतं, वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवण काय असतं याच सगळं नॉलेज पॉल वॉकरला होतं पण याच स्पीडने त्याचा जीव घेतला होता. गाडी काय लेव्हलने पळवली जाते आणि स्वतःवर किती कंट्रोल ठेवावा लागतो, आपल्या गाडी चालवण्यामुळे कोणाला अपघात तर होणार नाही ना याची लागली काळजी तो घ्यायचा पण याच स्पीडने घात केला आणि पॉल वॉकरचा जीव गेला.

वॉकरचा २०१३ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता क्लॅरिटा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. पोलीस अधिका-यांना व्हॅलेन्सियामध्ये आगीमध्ये होरपळलेलं एक वाहन सापडलं, ज्यामध्ये दोन लोक देखील उपस्थित होते. ‘पॉल मित्राच्या गाडीतून जात होता. ‘रीच आउट वर्ल्ड’ या त्यांच्या संस्थेच्या एका चॅरिटी कार्यक्रमात तो हजेरी लावणार होता. पॉल वॉकर मरण पावला तेव्हा तो फक्त 40 वर्षांचा होता. पॉल त्याच्या औदार्यासाठी आणि त्याच्या लूकसाठी जास्त प्रसिद्ध होता.

त्याची आई चेरिल एक फॅशन मॉडेल होती आणि वडील कंत्राटदार होते. चार भावंडांमध्ये तो सर्वात मोठा होता. वॉकरचे जीवन अत्यंत साधे होते. ना कोणत्या घोटाळ्यात त्याचं नाव आलं ना कुठला खळबळजनक कांड करून तो व्हायरल झाला. लोक वॉकरला फास्ट अँड फ्युरियस सिरीजचा हिरो म्हणून ओळखतात. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त त्यानी जवळपास 25 चित्रपटांमध्ये काम केले.

पॉलने 1985 मध्ये वयाच्या 11 व्या वर्षी टेलिव्हिजनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याने “हायवे टू हेवन”, “अ टच्ड बाय अॅन एंजेल”, “थ्रॉब” आणि इतर टीव्ही शो सारखे चित्रपट केले. मॉन्स्टर इन द क्लोसेट हा पॉलचा पहिला चित्रपट होता ज्यात त्याने अभिनय केला होता. हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर पॉलने मागे वळून पाहिले नाही.

आता पॉल वॉकरच्या वेगावरून तर आपल्याला कळलंच असेल की पॉलला कारची खूप आवड होती, परंतु वॉकरबद्दल असे म्हटले जाते की तो मिनिटाला 42 वेळा कारमधील गीअर्स बदलत असे. त्याला कार रेसिंगचा इतका अनुभव होता की लोक म्हणतात की अपघाताच्या दिवशी तो त्याच्या मित्राऐवजी स्वतःची कार चालवत असता तर कदाचित तो जिवंत राहिला असता. स्पीड किंग त्याला लोकं उगाच म्हणत नसे.

पॉल वॉकर हा ‘फास्ट अँड फ्युरियस’ चित्रपटाच्या फ्रेंचायझीचा एक प्रसिद्ध चेहरा होता. मृत्यू झाला तेव्हा पॉल ‘फास्ट अँड फ्युरियस 7’ मध्ये काम करत होता. याशिवाय तो ‘हमारा’ या लोकप्रिय सस्पेन्स ड्रामामध्येही दिसला होता. पॉलला केवळ चित्रपटातच नव्हे तर वास्तविक जीवनातही वाहनांची खूप आवड होती. त्याच्याकडे वाहनांचा चांगला संग्रह होता. पॉल त्याच्या फावल्या वेळेत अनेक रेसिंग मालिकांमध्ये भाग घेत असे. ‘रेडलाइट टाईम अटॅक रेसिंग सीरिज’मध्येही तो सहभागी झाला होता.

पॉल वॉकरच्या स्पीडवरून तरी आपण आपली गाडी दमानं पळवली पाहिजे. तसा पॉल वॉकर हा हिरोसुद्धा नामी होता आणि त्याच्याशिवाय फास्ट अँड फ्युरियस सिरीज कम्प्लिटचं होऊ शकत नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

English Summary : Fast n Furious rider Paul Walker’s 8th death anniversary

Leave A Reply

Your email address will not be published.