हिमालयात आहे हाडाच्या सापळ्यानी भरलेले एक गूढ रहस्यमयी तलाव.

रूपकुंड हा उत्तराखंड मधील हिमालय पर्वतात वसलेला एक ग्लेशियर तलाव आहे. हा तलाव “हाडांच्या सापळ्यांचा तलाव” म्हणून देखील प्रसिद्ध आहे. हा तलाव अत्यंत उथळ असून त्याची खोली सुमारे २ मीटर इतकी आहे. तलावाच्या रहस्यमयी निसर्ग रचनेमुळे ट्रेकर्स आणि एॅडव्हेंचर पर्यटक यांच्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

१९४२ मध्ये नंदा देवी नॅशनल पार्कच्या एका रेंजरला हा तलाव आढळून आला जो मानवी अवशेषांनी भरलेला होता.

जेव्हा जेव्हा या परिसरातील बर्फ वितळतो तेव्हा शेकडो मानवी सापळ्याची हाडे पृष्ठभागावर दिसून येतात. असे म्हणतात की, तलावातून दागिने, लाकूड, लोखंड काढण्यासाठी त्याबदल्यात ३०० पेक्षा जास्त मानवी सापळे इथे टाकली आहेत. इथल्या थंड व कठोर हवामानामुळे काही सापळ्यांची हाडे आजही सुस्थितीत असल्याच्या दिसून येतात.

IMG 5500.jpg.CROP .article920 large

सापळ्यांचा तलाव प्रसिद्धीत येण्यापूर्वी तलाव संबंधित कथा स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या. जेव्हा रेंजर्स कडून तलावाचा शोध लागला तेव्हा अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. ब्रिटीश साम्राज्याने अशी कल्पना केली की, ते मानवी अवशेष जपानच्या सैनिकांचे असावे. जे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारताच्या अवती भोवती फिरत होते. पण त्या अवशेषांची तपासणी करण्यासाठी पाठवलेल्या संसोधन पथकाने ते महायुद्ध्याच्या काळातील असण्याची शक्यता नाकारली.

नंतर एका रेडियोअक्टीव्ह कार्बन प्रक्रियेत असे समोर आले की ते शव नवव्या शतकच्या मध्यंतरीच्या काळातील म्हणजे सुमारे इसवी सन ८५० मधील आहेत.

२०१३ मध्ये काही शास्त्रज्ञांनी त्या परिसरात झालेल्या मृत्यूंच्या गूढतेचा शोधला लावला होता. त्यांच्या असा अनुमान होता की, ते शव दोन गटात मोडत असावेत. एक गट जो कुटुंबाप्रमाणे होता तर दुसरा गट जो वेगळ्याच लोकांचा होता. त्या दोन गटांतील शवांच्या उंचीत लक्षणीय फरक होता. कुटुंबाप्रमाणे असलेल्या शवांची उंची दुसऱ्या गटातील शवांपेक्षा अधिक होती. उंची कमी असलेल्या गटात स्थानिक लोकांचा समावेश होता.

एका डीएनए रिपोर्ट मध्ये असे समोर आले की, उंची जास्त असलेल्या गटाची उत्पत्ती इराण पासून झाली होती आणि उंची कमी असलेल्या गटाची उत्पत्ती खरोखरच स्थानिक वंशाची होती. यावरून असा निष्कर्ष काढला की, एखादे कुटुंब स्थानिकांच्या मदतीने कुठल्यातरी तीर्थक्षेत्राला इथून जात असताना त्यांच्यासोबत काहीतरी द्रूदैवी घडले असावे. भूस्खलन होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा किंवा त्यांनी सामुहिक आत्महत्या केली असावी असा ही अनुत्तरीत प्रश्न राहतो.

या अवशेषांबद्दल माहिती देताना स्थानिक लोक एक कथा सांगतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, कनौजचा राजा, राजा जसधवल आणि त्याची पत्नी राणी बलामपा जी त्यावेळी गर्भवती होती. ते नंदा देवी तीर्थक्षेत्री दर १२ वर्षांनी होणाऱ्या उत्सवासाठी चालले होते. ते जात असताना गारांचे जोरदार आले. त्या खुल्या मैदानवर आश्रय घेण्यासाठी कुठेच जागा नसल्याने ते सगळे या तलावाजवळ आले आणि तिथेच त्या सगळ्यांचा मृत्यू झाला.

हाडांच्या वैज्ञानिक विश्लेषणाने पौराणिक स्पष्टीकरणाची पुष्टी केली. चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, त्यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर क्रिकेट बॉलच्या आकाराच्या कशाचातरी मार लागला होता ज्यामुळे त्यांची कवटी फुटलेली होती. त्यावरून असे लक्षात येते की, अनपेक्षितपणे आलेले गारांचे वादळ हे या परिसरातील मृत्यूंचे कारण होते. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांचा शोध लागेपर्यंत ते १२०० वर्षापासून ते १६,००० फुट उंचीवर या तलावात गोठलेले होते.

पण तिथे पर्यटकांच्या जाण्याने तलाव सभोवतीचे वातावरण आणि तलावातील सापळे यांच्यात फुट पाडणारा आहे. भारत सरकार हा परिसर संरक्षित करून त्याचे जतन करत आहे. हाडे संरक्षित करण्यासाठी त्यांचे 3D स्कॅन करून डिजिटलरित्या दस्तऐवजीकरण केले जात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.