जग गाजवणाऱ्या एमआयटीला जाणारा पहिला भारतीय पुण्याचा होता

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जगातल्या इंजिनीअरिंगसाठी  सगळ्यात फेमस कॉलेजपैकी एक. एमआयटीनं भारताला अनेक हिरे दिले. भारतातील सॉफ्टवेअर उद्योगाचे पितामह फकीराचंद कोहली, किर्लोस्कर समूहाचे शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर, आदी गोदरेज आणि नादीर गोदरेज, बिर्ला समूहाचे आदित्य बिर्ला, पार्लेचे रमेश चौहान हे सगळे एमआयटीचे माजी विद्यार्थी. यातले बरेच हे बिझनेसमॅन फॅमिली मधले.

 आजही अनेक बिझनेसमॅन फॅमिली आपल्या पोरांना एमआयटीला पाठवतात पण ह्या एवढ्या भारी कॉलेजमध्ये जाणारे पाहिलॆ भारतीय होते आपल्या पुण्याचे.

१८८२ मध्ये आपल्या पुण्यातून पहिले भारतीय मॅसॅच्युसेट्सला गेले होते. पण तेव्हा ना आजच्यासारखा इंटरनेट होत ना परदेशी शिक्षणाची सगळी व्यवस्था करून देणाऱ्या कंसल्टंसी मग यांना साता  समुद्रापारच्या कॉलेजची कशी माहिती मिळली हे पाहिलं सांगतो. 

तर भारतीयांना विशेषतः मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारख्या कॉलेजेसची सर्वप्रथम माहिती मिळाली ती लोकमान्य टिळक यांच्यामुळे.

 लोकमान्य टिळक आपल्या मराठा या वृत्तपत्रात जगाच्या तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल आवर्जून लिहीत असतं . स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या लोकमान्यांना भारतानं तंत्रज्ञानात क्षेत्रातही ‘आत्मनिर्भर’ व्हावं असं मनोमन वाटत असे. एकोणिसाव्या शतकातील जागतिकीकरण – आणि स्टीमशिप, टेलिग्राफ, स्टीम प्रिंटिंग प्रेस यासंबंधीच्या तांत्रिक घडामोडींची माहिती टिळकांचा मराठा वर्तमानपत्र उत्सुकतेने कव्हर करत असे. 

त्याचबरोबर ” भारतीय विद्यार्थ्यांना पाश्चिमात्य कौशल्ये शिकवणाऱ्या औद्योगिक शाळेची गरज” हीटिळकांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती . 

त्यांच्या अशाच संपादकीयांमधून वाचकांना जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची ओळख झाली. 

मराठामधील आणखी एक तीन भागांच्या लेखमालेतही टिळकांनी एमआयटीवर लक्ष केंद्रित केले होते आणि तिला “जगातील सर्वोत्कृष्ट संस्था” असे संबोधले होते.

त्याचबरोबर आपल्या धगधगत्या शैलीत भारतीयांनी अशा कॉलेजेसमध्ये शिकून भारतमातेची कशी सेवा केली पाहिजे असं लिहीत असत.आणि टिळकांचं हेच लिखाण वाचून पुण्यातला या तरुणाने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या जगप्रसिद्ध विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. 

१८८२ मध्ये पुण्याच्या केशव मल्हार भट यांनी  मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रतिष्टीत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 

केशव मल्हार भट हे या विद्यापीठात प्रवेश घेणारे पहिले भारतीय ठरले होते. 

केशव मल्हार भट यांना अमेरिकेतील शिक्षणात कोणते अडथळे आले याची माहिती आज उपलब्ध नाही. मात्र त्यांच्या नंतर त्रिकमल शाह जे एमआयटीमध्ये १०० वर्षांनंतर शिकायला गेले त्यांच्या अनुभवावरून केशव भट यांना कोणत्या अडचणी सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पना करता येइल. त्रीकमल शहा विवाहित होते आणि इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप मोठा होते. अमेरिकन संस्कृतीची त्यांना फारशी माहिती नव्हती. त्यात शाह शाकाहारी होते .त्यात बोस्टन किंवा केंब्रिजमध्ये भारतीय रेस्टॉरंट नव्हते. त्यात एमआयटीमध्ये जाणे म्हणजे कर्ज काढून जाणे.

मात्र एवढा सगळं होऊनही टिळकांमुळे स्वदेशीचे संस्कार झालेले केशव मल्हार भट भारतात परतले. भारताबाहेर त्यांना गडगंज पगाराच्या नोकऱ्या भेटल्या असत्या मात्र भारतमातेच्या सेवेसाठी ते भारतात आले. ते परत आले आणि पुण्यात एक छोट इंजिनिअरिंगचं वर्कशॉप सुरू केलं.

हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.