एक मुस्लीम योद्धा महाराणा प्रतापांसाठी तर, राजपूत योद्धा अकबरासाठी लढला..

१८ जून १५७६.

आजपासून साधारणतः साडेचारशे वर्षांपूर्वी फक्त राजस्थानच्याच नाही तर भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाचं  असणारं ‘हळदीघाटीचं युद्ध’ सुरु झालं होतं. जेव्हा राजस्थानमधील इतर सर्व राजांनी अकबर बादशहाची चाकरी स्वीकारली होती त्यावेळी मातृभूमीच्या आत्मसन्मानाच्या आणि राजपुती शौर्याचं प्रतिक असणाऱ्या मेवाडच्या संरक्षणासाठी महाराणा प्रतापांनी मुगल बादशहा अकबराशी घनघोर युद्ध केलं होतं.

केवळ ४ तास चाललेल्या या युद्धात प्रचंड रक्तपात झाला होता. युद्धभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त सांडलं होतं की त्यानंतर युद्धभूमिला ‘रक्त तलाई’ असं नांव पडलं. अकबराच्या प्रचंड सैन्यासमोर जरी महाराणा प्रतापांचा पराभव झाला असला तरी महाराणा प्रतापांच्या सैन्याच्या झुंझार वृत्तीमुळे अकबराचं सैन्य जेरीस आलं होतं. महाराणा प्रताप आणि त्यांच्या तुटपुंज्या सैन्याने शौर्याची पराकाष्ठा केली होती.

२०१८ पर्यन्त ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्याच्या प्रक्रियेला गती आलेली आहे.

हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रतापांनी अकबराचा पराभव केल्याचा इतिहास राजस्थानमधील पुस्तकांमध्ये लिहिला जाऊ लागला आहे. राजस्थान सरकारमधील भाजपचे मंत्रीच तसे दावे करू लागले आहेत. शिवाय याच लढाईचा उपयोग हिंदू-मुस्लीम धृवीकरणासाठी करण्यात येऊ लागलाय.

या पार्श्वभूमीवर या लढाईसंदर्भातील ऐतिहासिक तथ्य आपण नव्याने समजून घेणं गरजेचं आहे. हल्दीघाटच्या लढाईत महाराणा प्रतापांच्या सैन्याचं नेतृत्व एक मुस्लीम योद्धा करत होता. ज्याचं नावं होतं हकीम खाँ सूर आणि रंजक गोष्ट म्हणजे त्याचवेळी अकबराच्या सैन्याचं नेतृत्व होतं जयपूरचे नरेश ‘मानसिंह कच्छावा’ या राजपूत योध्याकडे.

याशिवाय मुगल सैन्यांमध्ये इतर अनेक राजपूत योध्यांचा आणि सैनिकांचा देखील समावेश होता. हकीम खाँ सूर यांच्या नेतृत्वाखालील राजपुतांच्या सैन्यात  देखील १००० अफगाण पठाणी मुसलमान सैनिक होते.

हे ही वाचा. 

जयपूर नरेश मानसिंह यांनी अकबराच्या  मैत्रीपूर्ण चाकरिचा स्वीकार करून महाराणा प्रतापांच्या विरोधात एल्गार पुकारला होता. ब्रिटीश इतिहासकार जेम्स टॉड यांच्या मते, “मानसिंहांनी आपल्या पराक्रमाच्या जीवावर ओडीसा आणि आसाम जिंकून तो अकबराच्या साम्राज्यास जोडला होता. मानसिंहांची इतकी दहशत होती की काबुलच्या सम्राटाने देखील त्यांच्यासमोर शरणागती पत्करून आपला प्रांत अकबराच्या अधिपत्याखाली दिला होता.

“त्यांच्या अशाच पराक्रमांमुळे अकबराने बंगाल, बिहार आणि काबूलचे प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.”

तर त्याचवेळी हकीम खाँ सूर हे महाराणा प्रताप यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते आणि महाराणा प्रतापांचे सेनापती देखील. राजपूत सैन्याला युद्धकलेचे अनेक नुस्खे त्यांनी शिकवले होते. हकीम खाँ सूर यांच्या शौर्याचे अनेक किस्से आजदेखील राजस्थानात सांगितले जातात.

हल्दीघाटच्या युद्धात देखील त्यांनी आपल्या अपरिमित शौर्याचं दर्शन घडवत इतिहासावर आपला अमीट ठसा उमटविलेला आहे.

हे ही वाचा – 

2 Comments
  1. Ramchandra Kashinath Barad says

    I will interested in Yodhas Maharana Pratap History

Leave A Reply

Your email address will not be published.