भारत आणि चीनच्या युद्धामुळे रतन टाटा अविवाहित राहिले ! 

काय सांगतो भिडू !!!! 

मग काय आजवर भिडू कधी खोट बोललाय का ? उज्वल निकम यांनी कोर्टात जेवढे पुरावे सादर केले नसतील तेवढे पुरावे आम्ही बोलभिडू साईटवर टाकलेत. तरी लोकं आमचं ऱ्हस्व दिर्घ काढतात हा भाग वेगळा. असो, तर विषय असा आहे की भारत आणि चीनच्या युद्धामुळे रतन टाटां सारखा माणूस अविवाहित राहिला होता. 

प्रथम बोलभिडू सल्ला. 

हे पहा मित्रांनो हि स्टोरी आहे रतन टाटांची. यु नो टाटा.. भारतातल्या निम्या गाड्या त्यांच्या कंपनीच्या असतील. हॉटेलं वेगळीच.. जग्वार घेतली तरी सोन्याची पेठे वाटणारी आपली माणसं. पण रतन टाटांनी जग्वारची कंपनी घेतली पण कधी साधे कंदी पेठे पण चारले नाहीत. सो, थोडक्यात काय तर हि मोठ्या माणसांची लव्ह स्टोरी आणि तुमच्या आमच्या सारख्या माणसाची नाही. त्यामुळं अस कस, एवढ काय त्यात यासारख्या सामान्य माणसांच्या सामान्य प्रश्नासारखं या स्टोरीकडे पाहू नका. 

तर मुख्य मॅटर. 

रतन टाटा एज अलवेज श्रीमंत मुलांच्या प्रथा, परंपरेप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी होते. परदेश म्हणजे अमेरिका. तर या अमेरिकेतल्या फेमस विद्यापीठात भावी उद्योगपती शिक्षण घेत होते. त्याच दरम्यान त्यांच जुळलं. कस, कधी, कुणाबरोबर हे त्यांच्या निरा राडिया ऑडिओ क्लिपसारखंच विस्मृतीत झालं असाव. पण मुद्दा असाय की या माणसाच जमलं. 

त्यांनी CCN ला एक मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी आठवणी सांगितल्या ते म्हणाले, ती समजूतदार होती. आमचं रिलेशन मॅच्युअर टाईपमध्ये होतं. दोघांना आपआपल्या आयुष्यात काय करायचं आहे ते पक्क माहित होतं. पण त्या मुलीला भारतात यायचं नव्हतं कारण तिला भारत नेहमीच इनसिक्युर वाटायचां. 

हे ही वाचा –

त्यानंतर एक दिवस मला भारतात तात्काळ याव लागलं. तेव्हा माझ्या आज्जीची तब्येत खराब होती. याच दरम्यान भारत आणि चीनचं युद्ध सुरू झालं. भारतातल्या असुरक्षिततेवर तिनं शिक्कामोर्तब केलं. ती म्हणाली भारतात राहणार असाला तर सॉरी… 

मग काय मी मुंबईतच थांबलो आणि तीनं दूसरीकडे लग्न केलं… 

त्यानंतर चार वेळा… कित्ती चार वेळा रतन टाटा प्रेमात पडले.. पडले म्हणजे ती प्रकरणं लग्नाच्या मांडवापर्यन्त गेली. पण पुढे काय जमलं नाय बुवा… मग ते तसेच राहिले.. आत्ता काय वड्डे लोग वड्डी वड्डी बातें टाईप आयुष्य चाचलय. 

पण जमलेलं भारत चीन युद्धामुळं तुटणं हे काही आम्ही सर्वसामान्य भारतानं सहन केलं नसतं बघा.. जाग्यावर MADE IN चायना चा चार्जर फोडून टाकला असता.. 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.