खरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय पक्ष’ झालाय का..?

आजवर देशात फक्त ८ राष्ट्रीय पक्ष आहेत, भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI-M), तृणमूल काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी.

त्यात आता ९ वा राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी पक्षाचा समावेश होऊ शकतो.

गुजरातच्या निवडणूकांचा कल पाहता, आपचा राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतय.

मात्र खरच आप राष्ट्रीय पक्ष झाला आहे का?

कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल तर The Election Symbols (Reservation and Allotment) Order 1968 मध्ये सांगितल्याप्रमाणे, संबंधित पक्षाला किमान ४ राज्यांमध्ये ६% पेक्षा अधिक मतदान झाले पाहिजे, लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा या तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्या किंवा लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही ४ राज्यांत किमान ६ टक्के मतं मिळवणं आवश्यक आहे.

तसेच त्यापक्षाचे ४ खासदार असावे किंवा संबंधित पक्षाला किमान ४ राज्यात तरी प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालेला असला पाहिजे. या चार अटी पुर्ण होत असतील तर त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. ३ अटींपैकी एका अटींची पूर्तता करणे आवश्यक असते.

या अटींप्रमाणे आपने गुजरात मध्ये २ विधानसभेच्या जागांसह ६ टक्के मतं मिळवणं आवश्यक होतं आणि गुजरातमध्ये प्रादेशिक पक्षाच्या मान्यतेसाठी एकूण ८ टक्के मतं मिळवणं आवश्यक होतं.

गुजरातच्या निकालांमधून आप ने या अटी पूर्ण केल्या का ? गुजरातमध्ये किती जागा मिळाल्या, आपला मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता सध्या आपने 13 टक्के मतदान घेवून पाच जागांवर आघाडी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सध्याचं चित्र पाहता 6 टक्के मतदान आणि किमान 2जागांवर विजय या दोन्ही गोष्टी आप पुर्ण करताना दिसत आहे…

आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा लगेच मिळणार का? 

तर नाही, केंद्रिय निवडणूक आयोगाने असा दर्जा देताना कार्यकाळ निश्चित केला आहे. निवडणूक ठराविक कार्यकाळाने असा दर्जा देतं. सध्या राष्ट्रवादीची कमी झालेली संख्या पाहता राष्ट्रवादीचा  राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाईल तर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल पण तो ठरलेल्या काळखंडानंतर नवीन यादीनुसार.,

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आप ला नेमका काय फायदा होऊ शकतो?

तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर राजकीय पक्षांना काही सवलती मिळतात. संबंधित पक्षाला देशभरात कुठेही निडणूक लढवताना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येते. उमेदवारी अर्ज भरताना त्या पक्षाच्या उमेदवाराला केवळ एका अनुमोदकाची आवश्यकता लागते.

याचबरोबर संबंधित राजकीय पक्षाला ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करता येते. या स्टार प्रचारांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात मोजला जात नाही. तसेच त्या पक्षाला दुरदर्शनच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी संधी दिली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.