कोकणात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, कारण… 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले चार लोकं एकत्र आले न की मग आमच्याकडे अस आणि तुमच्याकडे तसं हे विषय रंगतात. असाच विषय काल रंगलेला. निमित्त होतं गणपती आणि गौऱ्यांचं. आत्ता काही भागात गौराई न म्हणता लक्ष्मी म्हणतात. तर काही ठिकाणी गौरा म्हणतात. यावरूनच विषय सुरू झाला… 

मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच सांगितलं, पार गडचिरोलीमधल्या दोस्ताने तिकडच्या प्रथा सांगितल्या पण इटंरेस्टिंग वाटली ती कोकणातील प्रथा. कारण कोकणातल्या गड्यानं सांगितलं आमच्याकडे गौराईला चिकन, मटण असा नैवेद्य असतो.. 

कस शक्य आहे चिकन मटण ते पण थेट देवाला. म्हसोबा, बिरोबा अशा देवांना बकरं लागतं हे माहित होतं पण गौराईला पण ही गोष्ट पचायला थोडी जड होती त्यामुळं विस्ताराने शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा कारण समोर आलं.. 

कारण आहे पौराणिक कथेच.. 

या कथेनुसार पार्वती देवीचं लग्न महादेवासोबत अर्थात शंकरासोबत झालं. आत्ता शंकर हा स्मशानात राहणारा देव. लग्नानंतर पार्वती आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली. वाटेत पार्वतीच्या रक्षणासाठी महादेवांनी आपल्यासोबत स्मशानात असणाऱ्या भूतगणांना पाठवलं. या भूतगणांनी पार्वतीचं रक्षण केलं आणि पार्वती मातेला सुखरूप तिच्या माहेरी सोडलं.

माहेरी आल्यानंतर पार्वतीसाठी गोडधोड पदार्थ बनवण्यात आले. कौतुकसोहळा सुरू झाला. पण माहेरच्या लोकांच लक्ष्य भूतगणांकडे गेलच नाही. भूतगणांच्या जेवणाचं काय? नेमकं हे हेरलं ते माता पार्वतीने… 

तिने भूतगणांच्या जेवणाची सोय केली. मात्र भूतगण स्मशानात रहात असल्याने मांसाशिवाय ते दूसरं काहीच खात नसतं. त्यामुळे या भुतगणांना मांस देण्यात आलं. त्यामुळेच प्रथा पडली ती गौराईला मांसाहाराचा नैवेज्ञ द्यायची. वास्तविक हा नैवैज्ञ गौराईसोबत आलेल्या भूतगणांना असतो पण पौराणिक कथा माहित नसल्याने गौराईसाठीच हा नैवेज्ञ असल्याची मान्यता रुढ होत गेली.. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.