हे आहे देशातलं पहिलं क्रिप्टोकरंन्सी रेस्टॉरंट ; इथं बीटकॉइनमध्ये वडापाव मिळतो 

हे शक्य नाही, कस शक्य आहे. कारण क्रिप्टो चलन म्हणून वापरता येत नाही हे इनलिगल आहे. भावड्या थंड घे. आम्हाला माहिताय तुला क्रिप्टोबद्दल लय माहिताय. डॉजी कॉईनमध्ये तूला डॉजी वाजलाय ते पण माहिताय.

लोड घेवू नको सगळं प्रकरण व्यवस्थित वाचं.. 

बाकी ज्यांना वरचा पॅराग्राफ कळला नाही त्यांनी विषय तिथच सोडून इथून खाली वाचायला सुरवात करा… 

तर झालय अस की भोपाळमध्ये क्रिप्टोबेस रेस्टॉरंट निघाल्याची बातमी आलेय. ह्या रेस्टॉरंटमध्ये क्रिप्टोमध्ये बील घेतलं जातं. आणि रेस्टॉरंटची थीम पण क्रिप्टो बेस ठेवण्यात आलेली आहे. 

वास्तविक दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये देखील मागच्या वर्षी क्रिप्टो बेस हॉटेल निघालं होतं. म्हणजे ते अजून सुरू आहे म्हणे पण आत्ता भोपाळ सारख्या शहरात सुद्धा क्रिप्टो बेस रेस्टॉरंट सुरू झाल्याची बातमी आली आहे. 

नेमकं काय, कुठे आणि कस आहे हे रेस्टॉरंट.. 

भोपाळच्या रोहित नगर मध्ये हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. याची थीम पुर्णपणे क्रिप्टो बेस आहे. यांचा जो मेन्यू आहे तो पण क्रिप्टोकरंन्सीवर बेस आहे. गौरव तिवारी नावाच्या तरुणाने हे रेस्टॉरंट सुरू केलय. इथं कोणकोणत्या डिश आहेत तर इथं बीटकॉईन बॉम्ब नावाचं एक चॉकलेट मिळतं. ते चॉकलेट फोडलं की आत बिटकाईनच्या आकाराचे चॉकलेटचे कॉईन असतात ते तुम्हाला खाता येतात. 

बाकी रेग्युलर रेस्टॉरंटमध्ये जे मिळतं ते इथच मिळतय त्यावर फक्त क्रिप्टोची कन्सेप्ट वापरून संस्कार केलेत.. 

पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पेमेंट करण्याचा.. 

तर इथं पेमेंट क्रिप्टो मध्ये केलं जावू शकतं. क्रिप्टोतच पैसे द्यायचं बंधनकारक नाहीए. कारण कसय देशाचं अधिकृत चलन तुम्ही नाकारत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जावू शकते. म्हणूनच इथं काही खाल्ल आणि मी क्रिप्टोत पेमेंट करु शकत नाही नोटा देतो म्हणला तर मालकाला त्या नाकारता येत नाहीत त्यामुळे क्रिप्टो हा ऑप्शन आहे कंम्पलशन नाही.. 

याबद्दल रेस्टॉरंटचा मालक गौरव तिवारी म्हणतो, 

गेल्या दिड महिन्यापासून क्रिप्टोचा ऑप्शन आम्ही सुरू केला आहे. या दिड महिन्यात ३० लोकांनी क्रिप्टोतून व्यवहार केलाय. प्रोसेस एकदम सोप्पी आहे. क्रिप्टोचा इक्सेंजर तुम्ही डाऊनलोड करावा लागतो त्यावर कोणतेही क्रिप्टो तुम्ही घेवू शकता. आम्ही सध्या बीटकॉइनमध्येच व्यवहार करतो. आम्ही काय करतो तर जितकं बील झालं असेल ते एक्सेंजर वरून घेतो. 

आत्ता गौरवचं बरोबर असलं तरी इथं एक कायदा मोडला जातोय तो म्हणजे करचुकवेगिरीचा.. 

कारण तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाता तेव्हा तिथे बील मिळतं. त्या बिलावर टॅक्स लावला जातो आणि तो टॅक्स सरकारी खात्यात जमा होता. रेस्टॉरंटमधले व्यवहार हे कॅशमध्येच होतात. आत्ता जर बील न मिळता कॉईन ट्रान्सफर होत असतील तर यात टॅक्स बुडवला जावू शकतो. 

दूसरी गोष्ट म्हणजे,

सरकारने क्रिप्टो कॉईन्सवर टॅक्स लावला आहे पण समांतर चलन म्हणून क्रिप्टोचा स्वीकार केलेला नाही त्यामुळे अशा प्रकारे क्रिप्टोचा वापर करणं हे बेकायदेशीरच आहे. 

मात्र दोन व्यक्ती एक्सेंजर वरून आपआपसात व्यवहार करू शकतात. अन् त्या व्यवहाराबद्दल मी माझ्याजवळील क्रिप्टो एखाद्याला स्वखुशीने देवू शकतो असा कायद्यात बसणारा मार्ग काढला जावू शकतो. म्हणजे कसं तर इथे वडापाव खाल्ला आणि त्यासाठी 0.00034 बिटकॉईन द्यायचे असतील तर टेक्निकली हॉटेलवाल्याने तुम्हाला वडापाव दिला पण तो फुकट मित्र म्हणून आणि त्याबदली तुम्ही स्वखुशीने त्याला क्रिप्टो ट्रान्सफर केले असाही मध्यममार्ग काढला जावू शकतो. 

सध्या तरी या रेस्टॉरंटवर कोणीही आक्षेप घेतलेला नाही हे मात्र नक्की, आणि हे रेस्टॉरंट तितक्याच चांगल्या पद्धतीने चालू देखील आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.