आणि चक्क पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आदिवासींसोबत नृत्य करू लागल्या…

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मधला प्रमुख फरक म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणारे राजपथावरचे कार्यक्रम.

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.

त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.

या संचलनासोबतच प्रजासत्ताक दिनाची आणखी एक महत्वाची खासियत म्हणजे चित्ररथ.

या चित्ररथातून भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.

१९६७ साली देखील असच झालं होतं.

भारतात पहिल्यांदाच इंदिरा गांधींच्या रूपात महिला पंतप्रधान लाभल्या होत्या. नेहरूंची मुलगी म्हणून त्यांना हे पद मिळालं होत असं बोललं जात होतं, गुंगी गुडिया म्हणून त्यांना हिणवलं जात होतं. पण तरीही इंदिरा गांधी यांनी आपली स्वतःची छाप सोडायला सुरवात केली होती. त्यांच्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेल्याला एक वर्ष पूर्ण होत आलेलं. त्यांच्यातील आत्मविश्वास दिसून येऊ लागला होता.

२६ जानेवारी १९६७ रोजीच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात त्या उत्साहाने सामील झाल्या. त्या वर्षीचा संचलनाच्या कार्यक्रमात वेगळाच रंग भरला होता. जेव्हा चित्ररथ आले तेव्हा त्यातील एक रथ पाहून इंदिरा गांधी प्रचंड खुश झाल्या. तो चित्ररथ नेहमी प्रमाणे फक्त राज्याची संस्कृती दाखवणारा नव्हता तर त्यात त्या राज्यातील आदिवासी संस्कृती दाखवण्यात आली होतीय. सोबत काही गोड आदिवासी मुली आपलं पारंपरिक नृत्य सादर करत होत्या.

हे अदिवासी नृत्य इतकं जमून आलं होत कि त्यांचा उत्साह प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या प्रत्येक हजारो जनतेच्या मनात उतरला. इतकंच काय ते नृत्य पाहून स्वतः पंतप्रधान भारावून गेल्या.   

इंदिरा गांधी या रसिक स्वभावाच्या होत्या. त्यांचं शिक्षण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मध्ये झालं होतं. तिथे त्या पारंपरिक लोकनृत्य देखील शिकल्या होत्या. त्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या आदिवासी मुलींच्या उत्साहाने त्यांना देखील मोह आवरला नाही.

चक्क पंतप्रधानपदाची खुर्ची सोडून इंदिरा गांधी आदिवासी नृत्यात सामील झाल्या. सगळा देश आश्चर्यचकित होऊन पाहत होता. इतिहासात पहिल्यांदाच एक पंतप्रधान आदिवासी नृत्यात सामील झाला होत होता. इंदिरा गांधी या लोकांच्या नेत्या आहेत हे या निमित्ताने त्यांनी दाखवून दिल.

फक्त त्याच प्रजासत्ताक दिनाच्या वेळी नाही तर वेळोवेळी इंदिरा गांधी लोकांमध्ये सामील होत होत्या. त्यांच्याबरोबर जेवत होत्या, त्यांच्या नृत्यात सहभागी होत होत्या. 

अशाच एका प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील ‘जवराला’ आणि ‘बुधवार पेठ’ या गावातील आदिवासीनी प्रसिद्ध ‘ढेमसा’ हे आदिवासी नृत्य सादर केले होते. इंदिरा गांधी यांना  हे नृत्य पाहून त्यांच्यातील कुतूहल जागे झाले. आणि त्यांनी या नृत्या बद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ठिकाणची संस्कृती, त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचे ठरविले. प्रजासत्ताक दिनाच्या पथकात सामील झालेल्या कलाकारांच्या या दोन्ही गावांना भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

खुद्द पंतप्रधान येणार होते. मात्र ३०० किलोमीटरच्या आत कुठेच विमानतळ नव्हते. त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर त्या भागात उतरावे आणि त्यांना या दोन्ही गावांत जाता यावे म्हणून जवळचा पर्याय म्हणून किनवट तालुक्यातील राजगड येथे वन विभागाच्या जमिनीवर धावपट्टी तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि अवघ्या काही महिन्यात १९८० मध्ये रोजगार हमीच्या कामावरील मजूरांच्या साहाय्याने विमानाची धावपट्टी तयार करण्यात आली होती.

इंदिरा गांधी या गावात कधी येऊ शकल्या नाहीत मात्र ती धावपट्टी आजही पाहायला मिळते. इंदिरा गांधींच्या बबद्दल अजूनही आदिवासी समाजात का आदर व प्रेम आहे याच कोडं त्यातून उलगडतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.