ते मनमोहनसिंगच होते ज्यांनी काश्मिरी पंडीतांना रहायला पक्की घरं बांधून दिली..

‘द काश्मीर फाईल्स’ पिक्चर काय आला अन देशात जुनाच वाद पुन्हा एकदा चघळला जातोय.

त्यात स्वतः पंतप्रधान मोदींनी या पिक्चरचं प्रमोशन केलं, सत्य घटनेवर आधारित असे चित्रपट आणखी यायला पाहिजे असं देखील त्यांनी व्यक्त केलं.

पण हा पिक्चर जसा आला तसा वाद सुरु झाला, की काश्मिरी पंडितांसाठी कोणत्या सरकारने काय केलं ?

किती सरकारं आलीत अन गेलीत मात्र कोणत्याच सरकारला आमचं दुःखं समजलंच नाही अशी भावना काश्मिरी खोऱ्यातल्या काश्मिरी पंडितांची. भाजपच्या समर्थकांकडून असा कित्ता गिरवला जातोय, भाजपने काश्मीरी पंडितांसाठी बरंच काही केलं पण काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित आपल्या घरांकडे परतले पण त्यांच्या परतीसाठी मनमोहन सिंग सरकारने काय केले?

तर दुसरीकडे भाजप विरोधी लोकं म्हणतायेत भाजपने गेल्या ८ वर्षात काय केले उलट मनमोहनसिंग सरकारने केलं.

अशा प्रकारचे दावे-प्रतिदावे चालू आहेत.

तितक्यात या सोशल मीडिया वॉर मध्ये एक फोटो व्हायरल होतोय. मनमोहन सिंग एका स्मारकाचं उदघाटन करतायेत, ज्यावरचा स्पष्ट आणि रेखीव शब्दातला मायना असा आहे कि, 

TOWNSHIP FOR THE KASHMIRI MIGRANTS” – Inaugurated By Dr. Manmohan sing   

Prime Minister Of India. 

मग झालं हाच फोटो सोशल मीडियावर फिरतोय कि बघा मनमोहन सिंग सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय नाही केलं वैगेरे वेगैरे.  

पण या दाव्यात काही तथ्य आहे का ? तर याचं उत्तर आहे होय.

भले काश्मिरी पंडितांसाठी कोणत्याच सरकारने काही विशेष काम केलं नसलं तरी एक मात्र आहे ते म्हणजे काँग्रेसने काही कामं केली. मार्च २०११ दरम्यानच्या बातम्या पाहिल्या तर लक्षात येईल कि, काँग्रेस सरकार ने ४ मार्च २०११ रोजी काश्मिरी पंडितांसाठी टाऊनशिप बांधली होती ज्याचं उदघाटन झालं स्वतः पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते झालेलं. मनमोहन सिंग यांच्या हस्ते या टाऊनशिपमधील फ्लॅटस काश्मिरी पंडितांना सुपूर्द केले होते. 

यादरम्यान येथे तत्कालीन राज्यपाल एन एन वोहरा, तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद, उपमुख्यमंत्री तारा चंद असं सगळे आणि इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते.

FN zGifakAA3hu6?format=jpg&name=medium

या उद्घाटनाच्या कार्यक्रमा दरम्यान मनमोहन सिंग यांनी, “काश्मिरी स्थलांतरित मायदेशी परततील आणि शांततापूर्ण जीवन जगतील, अशी आशा व्यक्त केली होती. 

यावेळेस त्यांनी अशीही भावना व्यक्त केली होती कि, २००४ मध्ये ते जेंव्हा पंतप्रधान म्हणून रुजू झाले  तेंव्हा त्यांनी जम्मूला भेट दिली. आणि तेथील स्थलांतरितांच्या परिस्थितीचा आढावा घेतला तेंव्हा त्यांच्या मनात याचा विचार आला कि आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगावं लागणाऱ्या या कुटुंबाच्या वास्तविक परिस्थितीची आम्हाला जाण आहे. या  कुटुंबांना किमान दोन खोल्यांचे घरं आवश्यक आहेत आणि म्हणून हा प्रकल्प उपलब्ध करून दिला असल्याचं देखील ते म्हणाले होते.

मनमोहन सिंग सरकारने २००४ आणि २००८ मध्ये दोन पॅकेज जारी केले होते. जारी केलेल्या या  पॅकेजनुसार, जम्मूच्या भागात ५,२४२ अशी दोन दोन खोल्यांची घरे बांधली गेली होती.  तर काश्मीरच्या काही भागातही काही प्रमाणात घरे बांधून दिली गेली.

दरम्यान २००८ मध्ये देखील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जम्मूपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या जगती जिल्ह्यात काश्मिरी स्थलांतरितांना ४२१८ फ्लॅटची जगती टाऊनशिपचे उदघाटन केले होते. ज्याची पायाभरणी त्यांनी १५ जुलै २००७ रोजी पंतप्रधान पुनर्निर्माण आणि पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत केली होती.

मनमोहन सिंग यांच्या सरकारने २००८ नंतर देखील आणलेली एक योजना काहीशी यशस्वी झाल्याचं बोललं गेलं. 

या सरकारने काश्मिरी स्थलांतरितांसाठी पीएम पॅकेज जाहीर केलं होतं. त्याद्वारे काश्मीरमधील विस्थापितांसाठी ६,००० च्या जवळपास नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. मोदी सरकार आल्यानंतर २०१५ च्या दरम्यान देखील याच योजनेद्वारे नोकऱ्या देऊ केल्या असंही सांगितलं जातं. 

आता या वादाच्या निमित्ताने जरी हा प्रश्न समोर आला असेल कोणत्या सरकरने काय केलं त्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून काश्मीरी पंडितांना पक्की घरं देण्यासाठी मनमोहन सिंग समोर आले होते हे मात्र नक्की.   

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.