बॉम्बस्फोटावेळी मुंबईला वाचवणारा “जंजीर”

१२ मार्च १९९३

मुंबईत मोक्याच्या ठिकाणी एकामागून एक बॉम्बस्फोट होत गेले. संपुर्ण देश हादरून गेला. संशयास्पद गोष्ट दिसली की लोकं फोन करत होते. अनेक ठिकाणाहून लोकांचे फोन येत होते आणि दूसऱ्याचं मिनटाला पोलिसांच पथक संशयित ठिकाणी पोहचत होतं.

पोलिसांची गाडी संशयित जागी आली की त्यातून सर्वात प्रथम झेपावणारी व्यक्ती होती ती जंजीर नावाचा श्वान.

जंजीर तेव्हा फक्त अकरा महिन्यांचा होता. खऱ्या अर्थानं पिल्लू म्हणतां येईल असा गोंडस. पुण्याच्या शिवाजीनगरच्या ट्रेनिंग सेंटरमधून सर्वात अगोदर शिकून बाहेर पडणारां कुत्रा म्हणजे

“जंजीर”.

बॉम्बस्फोटामुळे सगळं शहर भितीच्या छायेखाली वावरत होतं. जागोजागी संशयास्पद गोष्टींचा खच पडलेला होता. संशयित ठिकाणी असणारी बॉम्ब आणि स्फोटकं असणारी वस्तू तो क्षणात आपल्या ट्रेनरनां निर्देशनास आणून द्यायचा. त्याचे ट्रेनर होते गणेश आंदळे आणि व्ही.जी.राजपूत

सलग तीन चार दिवस अहोरात्र काम करून मुंबई, मुंब्रा, ठाणे परिसरातून अनेक स्फोटकं शोधून देण्यात जंजीरचा वाटा होता. बॉम्बस्फोटाच्या दोन दिवसातच धनजी स्ट्रिटवर स्फोटकांचा मोठ्ठा साठा जंजीरनं शोधून दिला. त्याच रात्री सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आलेला बॉम्ब देखील जंजीरनं शोधून दिला.

बॉम्बस्फोटानंतर दिवसरात्र शोधमोहिमेचं काम करण्यात आलं. यामध्ये सर्वात मोठ्ठा वाटा होता तो याचं जंजीरचा. जंजीरने त्याच्या आयुष्यात,

१७५ पेट्रोलबॉम्ब
५७ देशी बॉम्ब
११ हॅन्डग्रेनेड
६०० डिटोनेटर
२०० ग्रेनाईड
३३४९ किलो RDX शोधून काढले. 

एवढं सगळं शोधण्याचं श्रेय जातं ते एकट्या जंजीरला. अनेकदा बॉम्ब शोधायची इक्विपमेंट सोबत नसले तर फक्त जंजीर सोबत घेऊन मुबई पोलीस घटनास्थळावर जायचे. फक्त मुंबईतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात जंजीर फेमस झाला होता. त्याकाळात लोक त्याला देवदूत मानत होते.

बच्चनच्या सिनेमावरुन त्याचं नाव जंजीर ठेवण्यात आलं होतं पण मुंबई पोलिसांना त्या जंजीरपेक्षा हा जंजीर जवळचा होता !!!

जंजीरने बॉम्बस्फोटानंतर पोलीसखात्याच्या अनेक महत्वाच्या केसनां सोडवण्यात मदत केली. पुढे त्याला हाडाचा कन्सर झाला व त्यातच १६ नोव्हेंबर २००० रोजी त्याचा मृत्यू झाला. तेव्हा मुंबईच्या पुर्ण पोलिस डिपार्टमेंटने शासकीय इतमामात त्याला श्रद्धांजली वाहिली.

IMG 20191116 101651 scaled

गेली अनेक वर्षे आजच्या दिवशी पुण्यात कर्वे रोडवर त्याच्या पुण्यतिथीचा भलामोठा फ्लेक्स झळकत असतो. जिथे कायम राजकारण्याचे फ्लेक्स झळकतात तिथे या शूर श्वानाचा फोटो बघून अनेकांच्या आठवणी ताज्या होतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.