इंग्लंडच्या बाईमुळं काश्मिरच्या राजाला मिशी काढावी लागली होती.

पोरांना पोरींनी गंडवलेले प्रकरणं आपल्याकडं काही कमी नाहीत. प्रेमात पाडून गंडवलेल्यांची संख्या तर ढीगभर उदाहरणं आपण रोज पाहतो. तेवढंच काय सध्याच्या जमान्यात रोज वापरत असलेल्या फेसबुकवर अनोळखी लोकांशी मैत्री करून अनेक तरूण तरूणींना गडवलं जातंय.

हे सगळं तुमच्या आमच्या सारख्या सोज्वळ, प्रामाणिक आणि प्रेमाचे भुकले असलेल्या कार्यकर्त्यांसोबत घडतं. बरोबर हाय ना?

पण कार्यकर्त्यांनो असं काही भी नसतं. प्रेमात पडलं की भल्याभल्याची माती होती. माणूस पार देशोधडीला लागतं. अशाच एका खऱ्याखुऱ्या राजाची गोष्ट तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

ह्या राजाला चक्क लंडनमध्ये गोऱ्या इंग्रजाच्या पोरीनं फसवलं आणि लाखोंचा गंडा घातला.

साल होतं १९१९.

त्यावेळी काश्मीर संस्थानाचा राजकुमार राजा हरि सिंह एका इंग्रज अधिकाऱ्यांसोबत इग्लडंला फिरायला गेला होता. असं म्हणलं जातं की इंग्लडंला जाताना हरिसिंग तब्बल ४० लाख डाॅलर घेऊन गेला होता.

म्हणजे आत्ताच्या आपल्या रूपयांच्या किंमतीत तब्बल २७ कोटी रूपये.

त्यावेळी राजाचं वय जेमतेम २३ ते २४ होतं. म्हणजे एकदम तरणाबांड होता, नुकताच वयात आलेला. दिसायला राजबिंडा त्यात काश्मीर संस्थानचा राजकुमार म्हणल्यावर लंडनमध्येही त्यांची शाही व्यवस्था करण्यात आली होती.

हरिसिंगसोबत त्याचा सेक्रेटरी मेहबुब होता. त्यांनी लंडनमधील अनेक चांगल्या ठिकाणी भेटी दिल्या अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. हरिसिंग महाराजांचे लंडनमध्ये चांगले दिवस चालले होते.

मात्र, 1924 साली टाईम्स मासिकात हरिसिंगबद्दल एक रिपोर्ट छापला गेला होता.

त्यात असं सांगण्यात आलं होतं की,

एका कार्यक्रमात हरिसिंगची तिथलंच्या एका रॉबीन्सन नावाच्या महिलेशी ओळख झाली. ओळखीचं चांगलं मैत्रीत रूपातंर झालं. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. एकदा हरिसिंग आणि रॉबीन्सन एका हाॅटेलमधल्या खोलीत बसले होते.

तेवढ्यात एक माणूस तिथं आला आणि रॉबीन्सन माझी बायको आहे. तुमचे तीच्यासोबत अनैतिक संबंध आहेत असं म्हणत हरिसिंगला ब्लॅकमेल करू लागला.

त्यावेळी हरिसिंग महाराजांनी त्याला साडे सात – साडे सात लाखाचे दोन चेक दिले.

जास्त बदनामी होऊ नये म्हणून हरिसिंगने कुठं जास्त वाच्यता केली नाही. उगाच आपलं भांड फुटेन म्हणून गपगुमानं त्याला रक्कम देवून टाकली होती. मात्र त्या दोन चेकपैकी एक चेक डिपॉझीट झाला होता मात्र एक चेक त्यांनी रोखला.

मात्र, चेक रोखल्यामुळे रॉबींसनने कोर्टात धाव घेतली आणि हरिसिंगवर धोका दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. हरिसिंगला तिथं या प्रकरणामुळे कोर्टाच्या पायऱ्याही चढव्या लागल्या. हरिसिंगला तिथलंच्या कोर्टात मिस्टर ए या कोडनावानं बोलवलं जातं होतं.

या सगळ्या प्रकरणाचा निपटारा करून हरिसिंग 1924 साली काश्मिरमध्ये परतला. मात्र, काश्मिरमध्ये आल्यानंतर त्याला राजे प्रतापसिंग यांनी चांगलंच झापलं होतं. त्यांनी हरिसिंगला या चुकीमुळं मिशी काढण्याची शिक्षा सुद्धा दिली असल्याचं बोललं जात होतं. 

मात्र, हरिसिंग गादीवर बसल्यानंतर त्यानं काश्मिरच्या विकासाच्या बाबतीत खुप चांगले निर्णय घेतले. स्वातंत्र्यानंतर काश्मिर संस्थान भारतात विलीन करण्यात हरिसिंगचा सिंहाचा वाटा आहे.

मात्र कार्यकर्त्यांनो तुम्ही जपून रहावा. त्यो राजकुमार हुता म्हणून त्याचं सगळं जमून गेलं. तुमच्या बाबतीत असं घडलं तर तुम्हाला रस्त्यावर भीक मागावं लागेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.