बादशाह खान यांच्या गाठोड्यात काय आहे याची उत्सुकता इंदिराजींना देखील असायची…

फ्रंटियर गांधी, बाच्चा खान, बादशाह खान, सरहद्द गांधी आणि मुस्लिम गांधी असे कितीतरी नावांनी ओळखले जाणारे खान अब्दुल गफ्फार खान….६ फेब्रुवारी १८९० रोजी जन्मलेले खान अब्दुल गफार खान हे बलुचिस्तानचे महान राजकारणी होते…आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे नेते.  गफ्फारखान पेशावरचेही पलिकडचे होते.

असा नेता जो आयुष्यातले ३५ वर्षे तुरुंगात घालवली का तर हे जग मानवांसाठी एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी… त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांचे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी दोनदा नामांकनही झाली होती. आणि १९८७ मध्ये त्यांना भारतरत्नही मिळाला होता.

त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपणाला माहितीच आहे. पण किस्सा सांगते जो कदाचित तुम्हाला माहिती नसेल…तो म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान यांच्या सोबत एक छोटंसं गाठोडं असायचं, ते गाठोडं ते कायमच सोबत ठेवत, जे ते कोणाच्याही हातात देत नसायचे. महात्मा गांधीजी अनेकदा त्यांच्याशी चेष्टा करायचे की बादशाहाच्या पिशवीत असे काय आहे कि ते कोणालाही हात लावू देत नाहीत.

गांधीजींच्या अगदी जवळचे कुणी मित्र होते तर ते म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान होते. महात्मा गांधींच्या खर्‍या अहिंसेच्या तत्त्वांचे पुजारी कुणी असेल तर ते म्हणजे बादशाह खान होते.

गांधीजी शाकाहारी होते, आणि गफ्फारखानांची अडचण अशी होती की ते मांसाहारी होते. जेंव्हा ते आश्रमात राहायाण्यासाठी आलेले तेंव्हा गांधीजी म्हणाले, आश्रमाच्या नियमानुसार आश्रमात मांसाहार शिजवायला बंदी आहे पण खायला नाही, तुमच्यासाठी आश्रमाबाहेर मांसाहार शिजवण्याची व्यवस्था करतो. गफ्फारखान सेवाग्रामला राह्यले. बापू कुटीमध्ये सर्व आश्रमवासी राहात असत. गफ्फारखान सात फूट उंच होते. व्हरांड्यात प्रवेश करताना त्यांना वाकावं लागे. गांधींजींना ते ठीक वाटलं नाही. त्यांनी सुताराला बोलावून पायर्‍यांच्या वरची पाखं उंच करून घेतली होती. स्वातंत्र्यासंबंधातील चर्चा, वाटाघाटी सुरू झाल्या त्यावेळी गफ्फारखान गांधींजींसोबत दिल्लीच्या सफाई कामगारांच्या वस्तीत राहात असल्याचे. अशी मैत्री होती त्यांच्यात.

गांधीजी अशीं मस्करी करत तेंव्हा एकदा कस्तुरबा म्हणाल्या देखील होत्या की, बादशहाला असं सारखं त्यांच्या गाठोड्याबद्दल चेष्टा करू नका, त्यांच्या या गाठोडवुयात दुसरं काही नसून पिशवीत पठाणी सूट आणि काही गरजेच्या वस्तूंशिवाय काहीही नसतं. त्यावर गांधीजी म्हणाले माझ्याकडेही फक्त दोनच कपडे आहेत, म्हणूनच मी त्यांची मस्करी करतो. मी कुणाशी मस्करी करतो असं कुणी मला पाहिलंय काय ? अशी चेष्टा मी फक्त बादशहासोबतच करू शकतो.  कारण मला सम्राट अगदी माझ्यासारखाच वाटतो…….

संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर भाषण करताना एकदा गफ्फारखानांनी भारत सरकारची हजेरी घेतली होती. तुम्ही गांधींजींना विसरून गेले आहात असं त्यांनी भारताला सुनावलं होतं. 

त्यानंतर १९६९ मधला एक प्रसंग…

जेंव्हा १९६९ मध्ये गांधी जन्म शताब्दीनिमित्त तसेच उपचारासाठी इंदिराजींच्या विशेष विनंतीवरून गफारखान भारतात आले होते. तेंव्हा खास इंदिराजी आणि जे.पी नारायणजी स्वतः त्यांना विमानतळावर घेण्यासाठी गेल्या होत्या. बादशाह खान विमानातून बाहेर आला तेंव्हा त्यांच्या हातात तेच गाठोडं होतं. ज्याबद्दल गांधीजी कायम चेष्टा करत असायचे. तर गफारखान विमानातून उतरले. त्यांना रिसिव्ह करण्यासाठी गेलेल्या इंदिरा गांधींनी गफारखान यांच्या गाठोड्याच्या दिशेने हात पुढे करत बोलल्या, 

ते आमच्याकडे द्या, आम्ही घेऊ”, यावर बादशाह खान अगदी शांतपणे म्हणाले, हेच बाकी होतं, तेही घ्याल का?

badshah

बादशाह खान यांच्या वाक्यातूनच फाळणीचे संपूर्ण दुखणे समोर आले. या वाक्य ऐकताच इंदिराजींनी आणि जेपी नारायण या दोघांनीही त्यांच्या पायावर डोकं टेकवले….इंदिरा विचारात पडल्या अन जेपी नारायण यांच्या तर डोळ्यात अश्रू जमा झाले, ते स्वतःला आवरूच शकले नाहीत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडत होते….

त्यानंतर १९८५ मध्ये काँग्रेस प्रतिष्ठान शताब्दी निमित्त तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी बादशाह खान यांना पुन्हा विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.  त्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन हुकूमशहा पंतप्रधान झिया-उल-हक यांना बादशाह खान याना भारतात येण्याची परवानगी मागितली गेली होती.

बादशाह खान जेंव्हा भारतात आले. तेंव्हा देखील त्यांच्या हातात तेच गाठोडं होतं जे कायम त्यांच्या सोबत असायचं.  राजीव गांधींना या गाठोड्याबद्दल आधीच माहिती होती, ते बादशाह खान यांना म्हणाले, तुम्ही महात्मा गांधी आणि इंदिराजींना कधीही तुमच्या या गाठोड्याला हात लावू दिला नाही…पण मला फार उत्सुकता आहे, तुमचं हे गाठोडं मी उघडून पाहू शकतो का ?

वयाने म्हातारे असलेले बादशाह खान त्यावर अगदी पहाडी आवाजात हसले आणि त्यांच्या पठाणी शैलीत म्हणाले, “ तु तो हमारा बच्चा है… देख ले … नही तो सभी सोचते होंगे पता नही बादशाह इस पोटली मे क्या छुपाए फिरता है”, राजीव गांधींनी ते गाठोडं उघडले तेंव्हा त्यांना लाल रंगाच्या फक्त दोन जोड्या दिसल्या. कुर्ता आणि पायजामा….तेंव्हा राजीव गांधींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं….

आणि त्याच्या काही वर्षानंतर १९८७ मध्ये त्यांना पंतप्रधान राजीव गांधी सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले.

ह्या गाठोड्याचा किस्सा काय फक्त काय किस्सा नाही तर यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व दिसून येतं.  त्यांचं नाव जरी बादशाह खान असलं तरीही ते अगदी फकीरासारखे राहत असायचे. अलिगढ विद्यापीठातून शिक्षण घेतलेला, पश्तून एका जमीनदाराचा मुलगा असलेले हे बादशाह खान अगदी साधे राहायचे. इतकेच काय तर त्यांचे सख्खे भाऊ लंडनहून डॉक्टर बनले होते आणि ते पश्तूनचे मुख्यमंत्री होते. आता एवढी मोठी पार्श्वभूमी असताना देखील हा माणुस दोन जोड कुर्ता-पायजमा घालून आयुष्य जगत होता…अगदी शेवटपर्यंत  

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.