एकमेव किस ज्याने दोघांचंही करियर घडवलं.

१० जून २००६ ची ती भयंकर रात्र. अंधेरीच्या समवेअर एल्स नावाच्या पब मध्ये मिक्का सिंगच्या बड्डेची पार्टी सुरु होती.

आईशप्पथ सांगतो अख्ख्या देशात कोणाला माहित नव्हत मिक्का सिंग कोण आहे ते. नंतर कळाल ना ना ना ना दे ना दे ना दे फेम दलेर मेहंदी साहेबांचे हे कनिष्ठ बंधू.

नाही म्हणायला त्याचे सावन मे लग गयी आग दिल मेरा हाय वगैरे अल्बम चालले होते. नुकताच त्याचा समथिंग समथिंग मेरी जान नावाचा अल्बम गाजलाही होता पण एवढा पण गाजला नव्हता की त्याच नाव काय आहे कोणी विचारावं.

तर पार्टी जोरात होती. आता पंजाबी पोराची पार्टी म्हटल्यावर दारू असणार हे तर नक्कीच होत. रम व्हिस्की व्होडका पाण्यासारखे वाहत होते. दलेर मेहंदीचा भाऊ चांगलाच रंगात आला होता. तेवढ्यात तिथे एक लाल कपड्यामधलं वादळ आलं. नाव राखी सावंत.

ही बया तशी चर्चेतली होती. जोरू का गुलाम, मस्ती सारख्या सिनेमात तिने छोटे रोल केले होते. मोहब्बत है मिरची हे तीच आयटम सॉंग गजल होत. पण तिला खरी ओळख परदेसीया ये सच है पिया या गाण्यामुळ मिळाली होती. गाण्यामध्ये फुल एक्स्पोज करून भारतातल्या पोरांना हलक करायचं पुण्य तिच्या खाती अॉलरेडी जमा झालं होत. पार्टीमध्ये तिच्यासोबत तिचे काही मित्र सुद्धा होते. त्यात तिचा बॉयफ्रेंड आशिष शेरवूड हा सुद्धा होता.

राखी ही मिक्काची म्हणे मैत्रीण होती. मिक्का ने केक कापला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हप्पी बड्डे मिक्का वगैरे आपल्या भसाड्या आवाजात गाण म्हंटल. एकदम बड्डेमय वातावरण ओ.

राखीबाई या वातावरणात चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांना वाटल आपण आपल्या दोस्ताला थोड केक चारवून विश करू. तिथ पर्यंत पण ठीक होत. तिनं इंजिनियर लोकांनी पॉप्युलर केलेल्या पद्धतीप्रमाण बड्डे बॉयच्या चेहऱ्याला केक फासला. आणि म्हणे त्याच्या गालाची पप्पी घेतली.(असं मिकाच म्हणण होत, आम्हाला व्हिडिओमध्ये सापडलं नाही)

आता मिका म्हणजे पंजाबी लौन्डा. आधीच पार्टीमध्ये पिउन टाईट झालेला. त्याला राखी सारखी आयटम आपल्याला केक लावतेय आपल्याला विष करतेय हे अगदी बिचाऱ्याला म्हणे सहन नाही झालं. पोरग्याचा बांध सुटला आणि ते लागलं राखीची पप्पी घ्यायला. पप्पी म्हणजे तिला पकडून पकडून उपाशी माणसासारखं  किस घायला लागला. राखी सुद्धा एकदम दचकली.

तर योगायोगाने तिथे मिडिया हजर होती. (हो योगायोगानेच हा) . त्यांना बघून जोश मध्ये येऊन मिक्काने हा प्रकार दोन वेळा केला. बघणारे मजा घेत होते. काही जण टाळ्या वाजवत होते. राखी तिथून रडत रडत पळाली.(ती तेव्हा पण अॅक्टिंग खराबच करत होती. ) मिक्का भाऊला काही लक्षात येईना की आपण काय चुकीच केलं.

राखीने डायरेक्ट ओशिवारा स्टेशन मध्ये त्याच्याविरुद्ध सेक्सुअल असोल्टच्या आरोपाखाली क्म्प्लेंट नोंदवली. टीव्ही कॅमेरावर राखी आपल्या स्टाईलमध्ये दाखवत होती की मिकाने तिला कसे जबरदस्तीने कुठे कुठे किस केले. ब्रेकिंग न्यूज ओ. आपल्याला पण तेव्हा कुठे अक्कल होती? आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ परत परत सगळी कडे पाहिले.

मिक्का आणि राखीचा किस हा राष्ट्रीय प्रश्न बनला होता. रात्रीचे प्राईम टाईमचे डिबेट स्लॉट या कॉन्टरावर्सीने व्यापून टाकले.

सगळ्यांनी आपापल्या बाजू मांडल्या. कोण म्हणत होत राखीने मिक्काच्या भावना भडकवल्या म्हणून हे घडलं. आपल्याला तेव्हासुद्धा ते पटलं नव्हत. राखी ने कपडे कसेही घातले त्याला गालाला केक लावला याचा अर्थ त्याने जनावरांसारखं तिला बळजबरीण किस घ्यावं असा होत नाही. fact- प्राणी सुद्धा कोणाचा बळजबरीन किस घेत नाहीत) मिक्क्या खर तर चुकलच होत.

चार शहाण्या माणसांनी सांगितल हे सगळ चालू आहे ते फुकट प्रसिद्धहीसाठी. काही का असेना त्या रात्रीच्या किसने या दोन्ही कलाकारांचे दिवस बदलले. 

राखी बाईला मीडियाची ताकद कळाली. तिथून ती रियालिटी शोच्या मागे लागली. बिग बॉसमध्ये तिला चान्स मिळाला. (बिग बॉस काय लायकीचा शो आहे हे त्यांनी पहिल्याच सिझन दाखवून दिल) तिथ सुद्धा तिनं बराच गोंधळ घातला. त्यानंतर राखी का स्वयंवर वगैरे वगैरे अनेक शो येऊन गेले. राखीला सिरीयस घ्यायचं लोकांनी तेव्हाच बंद केल. लोकसभा निवडणूक लढवली. आता परवा दीपक कलाल बरोबर लग्नाची अफवा पसरवली.

आणि मिक्का?

मिक्काने स्वतःच्या या महान कार्याच्या समर्थनार्थ मित बंधूना घेऊन एक अल्बम बनवला. त्याचे बोल होते,

“ऐ भाय तुने पप्पी क्यू ली? सारी दुनिया छोडके तुझे याही बस मिली.”

गाण फालतू होत. पण बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटीचा अनुभव मिक्काला मिळाला. देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार वगैरे गाण्यातून तो फेमस झाला. मौजा ही मौजा आणि सिंग इज किंग ने त्याला टॉपच्या लिस्ट मध्ये बसवलं. आजही मिक्का सिम्बाच्या आंख मारे गाण्यातून चार्टबस्टरमध्ये एक नंबर ला आहे.

याचा अर्थ त्याच सगळ भारी चालू आहे असं नाही. अंगातले खोड गुण असे सहजासहजी संपतात होय? त्याचे दरवर्षी नवीन नवीन वाद सुरूच असतात. भर कार्यक्रमात आपल्या चाहत्याला कानाखाली वाजवणे असो, अथवा टॅलेंट शो मध्ये आपल्या सोबतच्या जजबरोबर भांडण काढणे असो. त्याचा घोळ सुरूच असतो. 

काही महिन्यापूर्वी सतरावर्षाच्या ब्राझिलियन तरुणीला अश्लील फोटो पाठवल्यामुळे त्याला दुबईमध्ये अटक झाली होती. त्यावेळी त्याच्या मदतीला कोण आलं माहित आहे काय? उसकी पुरानी जानी दुश्मन राखी. तिने एक सेल्फी व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून आपल्याला कसे दुःख झाले हे दाखवले.

असो मॅटर गंडलेला आहे. मिका आणि राखी हे न्यूजमिडियाने मोठे केलेले स्टार अजूनही जनतेला छळायचं थांबवलेलं नाही आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.