काँग्रेसवाल्यांनी ओरड केली म्हणून जोशींनी मंत्रालयाबाहेर धान्याच्या भावाचा बोर्डच लावला

बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर शिवसेनेचा भगवा झेंडा झळकला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांचे प्रश्न लावून धरल्यामुळे.

मार्च ११९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार महाराष्ट्रात आलं. ते सरकार येण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेना भाजप युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन या दोघांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेनेला स्थापन झाल्यानंतर ४० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर राज्याची सत्ता अर्धी का होईना मिळवता आली याचं कारण होतं प्रसिद्ध केलेला जनसामान्यांसाठीचा जाहीरनामा.

त्याकाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याकडे सरकारचा रिमोट कंट्रोल राहणार असे अनेक वेळा जाहीरपणे सांगितले होते. एवढेच नाही तर ‘माझा मुख्यमंत्री उठ म्हंटलो तर उठणार बस म्हणलो तर बसणार’ असे व्यक्तव्य केलं होतं. हे सर्व कशासाठी तर राज्य शिवशाही अवतरावी यासाठी. कारण त्या निवडणुकीत युतीने जाहीरनामा नाहीतर वचननामा सादर केला होता. 

आश्वासन ही देण्यासाठी असतात तर वचन ही पाळण्यासाठी असतात अशी त्यामागील भूमिका होती आणि जनतेला दिलेली वचने पूर्ण करायचे असतील तर लोकशाही नव्हे तर लोकशाहीचा अवलंब करावा लागतो अशी शिवसेनाप्रमुखांची धारणा होती. 

तेव्हा शिवसेनेने शेतमालाचे, धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचं वचन आपल्या जाहीरनाम्यात दिल होत. त्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ज्वारी, तांदूळ, डाळ, साखर, तेल, या पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. 

पण पुढे म्हणजे १९९९ मध्ये युतीच सरकार जाऊन काँग्रेसच सरकार सत्तेवर आलं. आणि त्यावेळच्या सरकारने युती सरकार असताना कशी भाववाढ झाली होती हे सांगायला सुरुवात केली. यावर मनोहर जोशींनी १९९९ साली मंत्रालयासमोर एक बोर्ड लावला.

त्या बोर्डवर जोशी मुख्यमंत्री असताना तेव्हाचे भाव आणि १९९९ साली असलेले भाव एकच असल्याचे दाखवून दिले. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या भावात तेव्हा वाढ झालेली नव्हती.

शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करत राहील हे या निमित्ताने त्यांनी दाखवून दिले. जनतेचे प्रश्न हे काही खूप मोठे नसतात. आंतरराष्ट्रीय घडामोडी, मोठमोठे आर्थिक निर्णय या पेक्षाही सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टी, महागाई, धान्यांचे भाव हे महत्वाचे होते. शिवसेनेने याच मुद्द्यांवर आवाज उठवला. आपल्या पहिल्या टर्ममध्ये जनतेच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नांवर लक्ष दिले याचा परिणाम शिवसेना गोरगरीब जनतेच्या मनातून कधी खाली उतरली नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर घेतलेल्या या निर्णयाची आजही आठवण काढली जाते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.