काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल म्हणणाऱ्या शहाजी पाटलाच्या लग्नाचा किस्सा पण तेवढाच भारीय..

शिवसेनेत नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात शिवसेनेचे ४० आमदारांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येतंय.

मात्र यात सर्वाधिक चर्चा होतीय ती सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची 

झालय असं की,

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतील एका गटाने रातोरात सुरत गाठली आणि त्यानंतर गुवाहाटी. या सगळ्या गोंधळात सर्व आमदारांच्या फोन बंद करण्यात आले होते. त्यामुळे ते कुठं आहेत, पुढे कुठं जाणार आहे याची कल्पना त्यांच्या घरच्यांना सुद्धा नव्हती.

तीन दिवसांनंतर आमदार शहाजी पाटील आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे हे विचारण्यासाठी कार्यकर्त्याला फोन केला, या दरम्यानचा संवाद व्हायरल झाला..

फोनच्या सुरवातीलाच कार्यकर्ता विचारतो,  

तीन दिवस झाले.. नेते कुठं आहे..?  

पाटील म्हणतात,

आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे …काय झाडी…काय डोंगार…काय हाटेल ओके मध्ये आहे. 

त्याचं हेच वाक्य प्रचंड व्हायरल झालं. सोशल मिडीयातून त्याबद्दल मीम्स तयार करण्यात आल्या.

असाच त्यांच्या लग्नाचा किस्सा देखील प्रसिद्ध आहे, तोच हा किस्सा…

शहाजी पाटील यांना एकूण ४ भाऊ होते.  शहाजींच्या २ मोठ्या भावांची लग्न झाली होती, तर उरलेले तीनही भाऊ लग्नाच्या वयाचे होते. तर शहाजी बापूंच्या मामाला एकुलती एकच मुलगी होती. त्यामुळे जेव्हा कधी मामाच्या मुलीच्या लग्नाचा विषय निघायचा तेव्हा स्पर्धेत हे तिनही भाऊ यायचे.

शहाजी पाटलांच्या वडिलांनी मामाच्या मुलीसांसाठी आपल्या तिन मुलांपैकी पसंती दिली होती ती शहाजीबापूंनाच.  शेतात पाईपलाईन करायची आहे म्हणून मामा पैसे घेवून आले होते. तेव्हाच मामापुढे लग्नाचा विषय निघाला..

त्यांच्या मामांनी लवकरच लग्नाची तारीख ठरवू असं सांगितले. त्यावेळी शहाजी पाटील मामाला म्हणाले की,

“मामा मी तुमच्या पोरीशी लग्न करतोय पण काही तरी फसतय असं वाटतंय. लग्न केल्यावर माझं काही खरं नाही”.

दुसऱ्या दिवशी शहाजी पाटील यांचे वडील मामाच्या घरी गेले आणि लग्नाची तारीख ठरवून आले. 

मात्र, हे लग्न गुपचूप होणार होते. त्यासाठी रात्री गावात जाऊन मुलीला पळवून घेऊन जायचा असं ठरलं. ठरल्याप्रमाणे त्यांचे भाऊ आणि मित्र रात्री ९ वाजता मामाच्या गावात जीप घेऊन गावात गेले आणि मुलीला घेऊन शिखर शिंगणापूरला गेले. दुसरीकडे शहाजी पाटील आणि त्यांच्या वडिलांनी एसटी ने शिंगणापूर गाठले होते.   

सकाळी साडे पाच वाजता नवरी- नवरदेवाला शिंगणापूरच्या तलावात अंघोळ घालण्यात आली. सकाळी सात वाजता एकीकडे मंदिरात नगारा वाजता असतांना दुसरीकडे शहाजी पाटील यांचे लग्न लावण्यात आले. 

तर इकडे मुलीच्या गावात शिंदे पाटलाच्या मुलाने पोरगी पळवून नेल्याची समजले होते. त्यांच्यातील एका मुलाने ही गोष्ट गावात सांगितली होती. आपल्या गावातील पोरगी पळवून नेल्याच्या रागातून मुलीच्या गावातील ट्रक भरून माणसं शिंगणापूरला मागे आली. लोक मागे लागल्यानंतर त्यांचे वडील रडायला लागले होते. 

लग्न लावायला त्यांच्या ओळखीचे ब्राम्हण होता. त्याने मुलीच्या गावातील लोकांना समजून सांगितले की, आपण पुन्हा एकदा लग्न लावू. तेव्हा ते शांत झाले. 

नंतर मग तिथेच लहान मांडव करण्यात आला होता. यानंतर गावातील घरांमध्ये लग्नसाठी आलेल्यांसाठी जेवण तयार करण्यात आले. यात गावातील ब्राम्हण समाजातील लोक सुद्धा सहभागी होते. ज्याला जमेल तसा स्वयंपाक करत होते. दीड तासात सगळा स्वयंपाक झाला होता. 

पुन्हा एकदा त्यांचे लग्न लावण्यात आले.

जातांना नवरी मुलगी ट्रक मध्ये बसून गेली. तर शहाजी पाटील आणि त्यांचे तालमीतील मित्र जीप मधून गावाकडे निघाले होते. जातांना एका ठिकाणी त्यांच्या मित्राने मासे खाऊन जाऊ असे सांगितले. शेजारच्या गावात त्यांचा मित्र राहत होता. त्याच्याकडे भाकरी आणली आणि शहाजी पाटील यांनी त्यांच्या सोबत मासे खाल्ले होते.   

घरी आल्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यावेळी पूजा करतांना ब्राह्मणाला लक्षात आले होते की, शहाजी पाटील यांनी मासे खाल्ले आहे म्हणून. तरीही त्यांनी पूजा उरकली आणि अशा प्रकारे शहाजी पाटील यांचे लग्न उरकले.

त्यामुळे आपली वरात निघाले नसल्याची आठवण शहाजी पाटील सांगतात. पंढरपूर मधील गादेगाव येथील त्यांचे सासरवाडी होती. मारुती बागल यांची नातं शहाजी पाटील यांची पत्नी झाली. 

हे ही वाच भिडू 

    

Leave A Reply

Your email address will not be published.