“ना कजरे की धार वाली”, आजही तुमच्या समोर आहे पण ओळखत नाही. 

ना कजरे की धार ना मोतींयो के हार…

मोहरा सिनेमातलं सुपरहिट गाणं. पोरगी कशी असावी हे सांगणार गाणं. नट्टा पट्टा करण्यासाठी भाग पाडणाऱ्या मार्केटिंगला कम्युनिझम शिकवणार गाणं. फेअर लव्हली वाल्या पोरींना एका झटक्यात काळ पाडणार गाणं. फक्त आणि फक्त चेहरा. त्यावर ना काळज, ना मोत्यांचा हार, ना कुठले दागदागिने, पावडर नाही का फाऊंडेशन नाय. लिपस्टिक नाही का लाली नाही. फक्त आणि फक्त चेहरा. 

त्यात समोर सुनिल शेट्टी. जो थरच्या वाळवंटात तापलेली माती घेवून म्हणायचा, ये धरती मेरी मां हे सर मां. खरतर सुंदर काय असत ते सुनिल शेट्टीलाच दिसलं असावं. सुनिल शेट्टीनं मुलगी कशी सुंदर दिसलं ते या एका गाण्यातनं सांगितलं. तेच कुठतरी आतमध्ये झिरपलं असावं म्हणून आजही साधेपणात जे दिसतं ते नट्टापट्टाकेलेल्या मुलींमध्ये दिसत नाही. 

असो लय रोमॅन्टिकपणा केला. तर ती ना कजरे की धार वाली आठवते का ?

आठवायलाच हवी. ती पण आठवते आणि ते धुकं पण. धुक्यातनं साडीवर चालत यायची त्यावेळी ती काय वाटायची. मोहरा हा तिचा पहिला पिक्चर होता. तीच नाव पुनम झावर. आडनावावरुन जात ओळखण्याचा छंद असल्यांना लक्षात आलच असेल ती राजस्थानची असणार ते. तर ती राजस्थानची असली तरी लहानपणापासून तिच सगळ आयुष्य मुंबईतच गेलं. मुंबईत लहानाची मोठी झाल्यानंतर तिन मॉडेलिंग चालू केलं. डव, किलर जीन्स मध्ये ती झळकली. एका मॅक्झिनच्या कव्हरवर देखील तिला चान्स मिळाला होता. योगायोगाने ते मॅक्झिन प्रोड्युसर गुलशन रॉय कपूर यांच्या टेबलावर पडलेलं. एका छोट्या सिनसाठी म्हणून त्यांनी पूनमला साईन केलं. तिच्या वाट्याला छोटा रोल आणि पिढ्यांच गाण आलं. संधीच सोनं टाईपमध्ये झालं. 

सुनिल शेट्टीचा ती भूतकाळ असते. पुढे चार गुठांच्या नादात ती स्वत:ला चाकू मारून घेते आणि सुनिल शेट्टी बदला घ्यायला निघतो. पुढचा पिक्चर नसरुद्दिन शहा वढतो. पिक्चर आला तेव्हा तो तुफान चालला होता. या पिक्चरमुळे सगळेच सेट झालेले हिरो पुन्हा सेट झाले होते. 

पण पूनम झावरचं काय झालं. 

गाण्याच्या हिटमुळे पूनम पण फोकसमध्ये आली. दिवाना हू मैं तेरा आणि जियाला नावाचे पिक्चर तिने केलं. आत्ता नौका धक्याला लागणार अस वाटत होत तोच जियाला पिक्चरमध्ये कुमार सानू तिच्या वाट्याला आला. कुमार सानूने यात कल चौदहवीं की रात थी गाण आलं. ती या गाण्यातून पुन्हा फोकसमध्ये आली. 

एक्टिंग गंडतेय अस तिच्या लक्षात आल्यानंतर तीने स्वत:चा पिक्चर काढायचं ठरवलं. आंच नावाचा सिनेमा तिने प्रोड्युस केला. नाना पाटेकर आणि परेश रावल या दोघांच्या एक्टिंग मुळे पिक्चर चांगला चालला. त्याच बरोबरीने क्रिटिक्स नावाच्या प्रकारांनी देखील पिक्चरचं कौतुक केलं. याच पिक्चरमध्ये तीने प्रोड्युसर होण्याबरोबर स्वत:ची हौस भागवून घेतली होती. तीने या पिक्चरमध्ये स्वत:गाण म्हणलं ते हिट झालं आणि पट्टीने एकामागून एक अल्बम काढले. तिन्ही अल्बम सुपर डुपर प्लॉप झाले. 

आत्ता मॅडम तशा मेनस्ट्रिमच्या बाहेरच फेकल्या गेल्या होत्या.

पण झालं अस की अक्षय कुमारचा ओह माय गॉड आला. त्यात एका महिलेला पाहिल्यानंतर बारीक नजरेच्या माणसांनी ओह माय गॉड केलं. त्यात राधे मॉ टाईप असणाऱ्या रोलमध्ये पूनम झावर होती. मेकअप मध्ये दिसणारी ती हिच होती हे पटणं अनेकांना अशक्य होतं. पाच दहा वर्षांनी एखादी माहेरी यावी आणि सहज आपल्या पुढून जावी अस झालं. कळलंच नाही हे सगळं का झालं, कशामुळे झालं शिरीन..! 

त्यानंतर तिने 2G सेप्ट्रम घोटाळ्यावर आधारित असणाऱ्या सिनेमामध्ये नीरा राडियाचा रोल केला. वयाच्या उतारावर आल्यावर हॉट फोटोशूट केलं. त्यानंतर आण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झाली. जोरजोरात घोषणा वगैरे दिल्या. 

थोडक्यात काय तर मेकअप शिवाय दिसलेल्या ना कजरेकी धार वाल्या पूनमनं आयुष्यात सगळं केल. आत्ता दोन लाईनी, उडें खुशबूं जब चलें तू.. उडें खुशबू जब चलें तू… 

धन्यवाद वाचत रहा बोल भिडू. 

हे ही वाचा.  

Leave A Reply

Your email address will not be published.