आपण पाहिलेला पहिला फॉरेनर कल्याणचा होता ! 

आपल्यातल्या बहुतांश भिडू लोकांचा जन्म १९४७ नंतरचा. साहजिक आपला जन्म झाला तेव्हा भारतात ब्रिटीशांची सत्ता नव्हती. आपल्यापैकी कोणालाच मी “पाहिलेला फॉरेनर” असा निबंध लिहायची वेळ देखील आली नाही.

जरा मोठ्ठ झाल्यानंतर कोणी “अंजठा वेरुळ” ला गेलं असेल, नाहीतर गोव्याला. तिथे तुम्हाला पहिल्यांदा याची देही याची डोळा “फॉरेनर” पहायला मिळाला असेल. काही दांडग्या स्वभावाच्या भिडू लोकांनी अशा फॉरेनर काका काकूंसोबत सेल्फी मारायचा ट्राय देखील केला असेल. त्याहून दांडग्या लोकांनी फॉरेनरला हात देखील लावला असेल. 

असो, इथल्या प्रत्येक भिडूकडे त्याने पाहिलेल्या पहिल्या फॉरेनरबद्दल आठवणी असतील. ते फॉरेनर वेगवेगळे देखील असतील.

पण टिव्हीवर पाहिलेला प्रत्येकाचा फॉरेनर एकच आहे. हे फिक्स !!! 

तर सिनेमातला 90’s चा पहिला फॉरेनर होता गेव्हिन पॅकर्ड. GAVIN PACKYARD हे त्याचं इंग्लीशमधलं नाव. चमत्कार, करण-अर्जून, मोहरा, तडीपार अशा कित्येक सिनेमात सुरवातीला हिरोला मारायची आणि नंतर मार खायची भूमिका त्याने गाजवली. 

तर आत्ता मुख्य मुद्दा आपल्याला जो सिनेमातून पहिला फॉरेनर दिसला होता तो कल्याणचा होता. विशेष म्हणजे तो पक्का महाराष्ट्रीय होता. 

हि गोष्ट त्याच गेव्हिन पॅकर्डची. 

गेव्हिन पॅकर्डचे आजोबा अमेरिकन आर्मीत होते. कामांच्या संदर्भात की फिरायच्या संदर्भात ते माहित नाही पण ते एक दिवस बंगलोरमध्ये आले. शहराच्या भारताच्या प्रेमात पडले आणि इथे सेटल झाले. जॉनचा मुलगा Earl हा कामासाठी बंगलोरमधून मुंबईत आाला. तिथे त्याने एका कोकणी मुलीसोबत लग्न केल. या जोडप्याला जो मुलगा झाला तोच गेव्हिन. 

गेव्हिन पॅकर्ड हा बॉडीबिल्डर होता. पहिल्यांदा मल्याळम फिल्ममधून पुढे येणाऱ्या गेव्हिनला पहिला चान्स मिळाला तो इलाका सिनेमात. त्यानंतर त्रिदेव, मोहला, खिलाडियों के खिलाडी, करण अर्जून अशा सिनेमात तो छोटे मोठ्ठे रोल करत होता.  

व्हिलनचा डावा हात हा त्याचा फेमस रोल. कधीकधी त्याला वेगळे रोल देखील मिळायचे.वेगळे म्हणजे कुठले तर व्हिलनचा उजवा हात. डाव्यावरून उजवा इतकाच काय तो बदल व्हायचां. पण त्याचं खास होतं ते त्याचं भारतीय प्रेक्षकांसाठी तो फॉरेनर वाटणं.

त्याच्या फॉरेनर दिसण्यामुळे (तसा तो फक्त फॉरेनर वंशाचा होता) त्याला तगड्या भारतीय हिरोकडून मार खाताना बघणं प्रेक्षकांना भारी वाटायचं.  “ब्रिटीश असताना आपण नव्हतो नाहीतर असचं तुडवलं असत” असणारा आपल्या पराकोटींच्या आत्मविश्वासावर फुंकर घालण्याचं कामच त्याने केलं. 

बर हा फक्त इतकच काम करत नव्हता तर, तो उत्तम बॉडीबिल्डर होता. अनेक देशपातळीवरच्या स्पर्धा त्याने आपल्या खिश्यात घातल्या होत्या.  आपल्या सलूभाईंचा वफादार शेरा आहे न, त्याचा हा गुरू होता. शेराची बॉडी गेव्हिनमुळे झाली. शेराच नाही संजय दत्त, सलमान खान यांच्या बॉडीच्या मागे सुद्धा गेव्हीन नावाचा हा गुरू होता.

त्याच्या शेवटचा पिक्चर होता “जानी दुश्मन – Ek Anookhi Kahani” त्यानंतर तो सिनेमात सिनेमात दिसला नाही. आपल्या शेवटच्या काळात तो आपल्या भावाकडे रहायला होता. २०१२ साली तो गेला, तेव्हा त्याच्याबद्दल छापून आलं ते त्याच्या मयताला कोणताच सेलिब्रिटी आला नाही म्हणून.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.