हे फक्त पूजाच्या प्रियकरानं वाचावं !!!

 तुम्ही पूजाच्या प्रेमात आहात का ? कोण पूजा ?

तुम्ही शहरातल्या कुठल्याही चौकात जा. पूजा म्हणून जोरात हाक मारा. दहा पैकी पाच सहा मुली मागे बघतील. त्या सगळ्या पूजा झाल्या. आत्ता या पूजानं काय कांड केलं आहे ? तर पूजा पुर्णपणे निर्दोष आहे. जशी सोनम गुप्ता निर्दोष होती तशीच. हे कांड केलय ते पूजाच्या प्रियकरानं. 

कथेची प्रस्तावना –

शिक्षणानं तरुणांची एक पिढी भारत घडवू लागली. आधुनिक भारत. हे लोकं इंजिनियर झाले त्यांनी धरणं बांधली, रस्ते बांधले, पूल बांधले याअगोदर देखील एक पिढी होती त्यांनी आपणासमोर वास्तुशास्त्राला लाजवतील असे मोठमोठ्ठे किल्ले बांधले. याच काळात शिक्षणाने तिसरी पिढी घडवली ती पिढी या सगळ्यांवर आपल्या प्रेयसीचं नाव लिहण्यात मश्गुल राहिली. शिक्षणानं घडवलेला कचराच म्हणू हवं तर. शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्यांनी या किल्यांवर चुन्यानं आपली नाव कोरली. धरणं, पुलं काहीही बांधलं की हे लोकं तिथ हजर होत आणि आपल्या प्रेयसीचं नाव अगदी प्रेमानं त्यावर कोरतं. खरतर या कलेचा जन्मच मुळात विद्यापीठाच्या बाकावर, मुत्रालयात झाला. जागा दिसेल तिथ नाव नंबर लिहला की पुण्य भेटतं असा या पिढीचा समज. हा किस्सा देखील पूजाच्या त्याचं प्रियकराचा. 

नेमका मॅटर काय झाला –

दिल्लीची जामिया मलिया इस्लामिया विद्यापीठ. भारतातल्या अन्य विद्यापीठासारखं या विद्यापीठात देखील शिक्षणच दिलं जातं. या विद्यापीठाची देखील वेबसाईट आहे. तर झालं अस की रोजच्या सारखे रात्रीचे बारा वाजले. विद्यापीठातल्या हॉस्टेलमध्ये प्रेमाच्या किस्से रंगात आले होते. आत्ता रात्री बारा वाजताच्या या मंजुळ वातावरणात कोण विद्यापीठाची बेवसाईट चेक करत का ? तर करतात काही हूशार मुलं ते ही करतात. अशाच एका मुलानं विद्यापीठाची वेबसाईट चेक केली. त्याला जे दिसलं ते विद्यापीठाच्या प्रेमळ किस्यांमधलं अतुच्च टोक गाठणार होतं. 

विद्यापीठाच्या वेबसाईटवर तेव्हा हे झळकत होतं.

 

HAPPY BIRTHDAY POOJA 

वाह प्रेमाचं नाव कोरण्याची हि शैली थेट वेबसाईटवर जावून विराजमान झाली होती. रात्री बारा ते एक विद्यापीठाची वेबसाईट हॅक करुन हे कांड करण्यात आलं होतं. नेहमीप्रमाणे आत्ता विद्यापीठानं नेमका चोर शोधायचं ठरवलं. आत्ता पूजा नावाची मुलगी शोधली जाईल त्यानंतर तिचा आशिक. आत्ता कथेच्या सुरवातीचा सिन पुन्हा आला नं. पूजा तर ढिगानं आहेत. म्हणूनच हे निवेदन.

“मित्रा झालं गेलं विसरुन जा आणि पुढे ये. तुझा गुन्हा कबूल कर. काय माहिती पूजा खूष होवून होय पण म्हणेल. पण या सुंदर कांडा मागचा तुझा चेहरा असा मागे नको रहायला म्हणूनच हा प्रयत्न.”

Leave A Reply

Your email address will not be published.