राज कपूरला झालं होत “love at first sight”

बॉबी सिनेमामधला सीन,

तरुण हँडसम ऋषी कपूर त्याचा लहानपणी सांभाळ केलेल्या ब्रीगांझा आंटीला भेटण्यासाठी तिचं घर शोधत जातो. एकेकाळी निवांत असणाऱ्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या तिच्या घरात जातो आणि तिथलं दार ठोठावतो.

आतून आवाज येतो “कौन है?”

ऋषी कपूर म्हणतो “मै”

आतून परत आवाज येतो “मै? मै कौन?”

ऋषी काय बोलावं या विचारात असतो एवढ्यात दार घडलं जातं.

दार उघडणारी आंटी नसते तर एक षोडशवर्षीय रुपगर्विता असते. स्वैपाककरता करता तसचं ती दार उघडायला आलेली असते . तिच्या  हाताला बेसनचं पिठ लागलेलं असत. तरीही ती एखाद्या अप्सरेपेक्षा सुंदर दिसत असते.

तिचं सौंदर्य बघून आपल्या ऋषीच्या बत्त्या गुल होतात. बावळटासारखं फक्त तिला बघतचं तो राहतो.तीसुद्धा हे ध्यान का बोलत नाही म्हणून डोळे मोठे करते.

ऋषीच्या तोंडातून अखेर शब्द बाहेर पडतात,”आप? यहां? ”

मुलगी म्हणते,”मै और कहां रहुंगी? मगर तुम कौन?”

असं म्हणत म्हणत ती आपल्या डोळ्यासमोर आलेली बट मागे घेते. हाताला लागलेलं भजीच पीठ तिच्या केसांना लागत. ऋषी कपूर अजूनही आपण कोण आहे हे सांगण्यासाठी शब्द शोधत असतो तेव्हड्यात आंटी येते, ऋष्याचा जीव भांड्यात पडतो.

Screenshot 2

ही षोडशवर्षीय यौवना म्हणजे डिंपल कापडिया.

डिंपल कपाडियाच्या या सिनेमामधल्या बिकिनीची जितकी चर्चा झाली त्याच्या पेक्षा जास्त चर्चा तिच्या केसांना लागलेल्या बेसणची झाली. राज कपूरच्या दिगदर्शनाची रसिकता फक्त अर्धनग्न सौंदर्य दाखवण्याइतपत मर्यादित नव्हती हे दाखवायला फक्त हाच एक सीन पुरा ठरावा.

पण या सीन मागे ही एक लव्हस्टोरी आहे ती तुम्हाला माहीत आहे काय?

राज कपूर आणि नर्गिसच्या पहिल्या भेटीवरून राज कपूरला हा प्रसंग सुचला होता.

झालं असं होत की बावीस वर्षाचा राज कपूर तेव्हा आपल्या आर के बनर खाली पहिलाच सिनेमा बनवत होता, “आग”. त्याचा हा दिग्दर्शनाचाही पहिलाच प्रयत्न होता. त्याच्यासाठी काही तरी मदत हवी म्हणून तो जेष्ठ नृत्यांगना अभिनेत्री दिग्दर्शिका जद्द्नबाई यांच्याकडे आला. वडील पृथ्वीराज कपूर यांच्यामुळे त्यांची पूर्वीची ओळख होती. शोधत शोधत तो त्यांच्या घरापाशी पोहचला. त्यावेळी जद्दनबाईच्या मुलीने नर्गिसने दार उघडला.

सेम बॉबीमधल्या ऋषी प्रमाणे राजची अवस्था झाली होती. नर्गिस किचन मध्ये भजी बनवत बनवत दर उघडायला आली होती आणि त्याच बेसनच पीठ तिच्या केसांना लागलं.

पहिली नजर में प्यार ही फिल्मी कन्सेप्ट त्या दिवशी राज कपूरला खरोखर पटली.  

खरं तर राज कपूरची आणि तिची ही पहिली भेट नव्हती.

खूप वर्षापूर्वी लहानपणी आईसोबत नर्गिस एकदा एका सिनेमाच्या शुटींगला आली होती. तेव्हा तिथे तिला एक गोलमटोल मुलगा दिसला होता. त्याचा गोरा रंग, निळे डोळे आणि टम्म फुगलेलं पोट बघून तिला एखाद्या बाहुलीची आठवण आली. छोट्या नर्गिसने सगळ्यांच्या समोर खो खो हसायला सुरवात केली. खुद्द पृथ्वीराज कपूरच्या मुलावर हसणाऱ्या आपल्या लेकीला  आवरे पर्यंत जद्दनबाईच्या नाकी नऊ आले होते.

त्या भेटीनंतरची तारुण्यातली त्यांची ही पहिलीच भेट. तेव्हा सोळा सतरा वर्षाच्या नर्गिसने नुकतच बालकलाकाराची भूमिका बंद करून हिरोईनची भूमिका करायला सुरवात केली होती.

राज कपूरला नर्गिस इतकी आवडली त्याने आपल्या फिल्म मध्ये तिच्या साठी जागा बनवली. इतकचं नाही तर सिनेमाच्या हिरोईनच्याही आधी तिचं नाव टायटलमध्ये टाकण्यात आलं .

अशी सुरु झाली होती राज कपूर नर्गिस ची अजरामर प्रेम कहाणी.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.