आणि राम लल्लाच्या नावावर होणारा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या मुख्य पुजाऱ्याची हत्या झाली

आज तक विश्व हिंदू परिषद के लोगोंने मंदिर में एक माला भी नहीं चढाई। भगवान कीं पूजा अर्चना तक उन्होंने नहीं करवाई। पैसे पर खरीदे गयें साधू जिन्होनें राम शिलाए गुमाई। इन शिलाओंसे उन्होंने अपने मकान बनवाये, राम के नाम पर करोडों रुपये इकाठठा करके व्यक्तिगत खातों में डलवाऐं।

आणि हे सर्व बोलणाऱ्या व्यक्तीचा त्याचं वर्षभरात खून झाला होता…नाव होत संत लालदास !

कारण होतं राम लल्लाच्या नावावर विश्व हिंदू परिषदने केलेला भ्रष्टाचार 

लालदास हे रामजन्मभूमी वादातलं, इतिहासातलं असं एक नाव होतं जे आज कोणालाही घ्यायचे नाही, आठवायचं नाही. ज्या नावाने विश्व हिंदू परिषद, भाजप आणि आरएसएसमधल्या लोकांना आजही कापरं भरतं.

याच व्यक्तीने ‘मारेंगे मर जाएंगे, मंदिर वही बनाऐंगे’ अशा हिंदुत्वाच्या घोषणांमध्ये राम मंदिर-बाबरी वादावर शांततेने तोडगा काढण्याचा मुद्दा उचलून धरला होता, राम मंदिराच्या नावाखाली विश्व हिंदू परिषद भ्रष्टाचार करतोय हे नॅशनल टेलिव्हिजन वर सांगितलं होत.

बरं हे कुणी साधंसुधं व्यक्तिमत्व नव्हतं, तर तत्कालीन राम मंदिराचे मुख्य पुजारी होते संत लालदास.

आज ही गोष्ट सांगायची वेळ येतेय कारण आजही राम मंदिर ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. हा आरोप २ दशकांपूर्वीही झाला होता. राम लल्लाच्या नावे झालेल्या भ्रष्टाचारात एकच धागा इथं समान आहे. तो म्हणजे…विश्व हिंदू परिषद

तेव्हा आरोप झाले तेव्हा विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांच नाव लालदास यांनी घेतलं होत. तर आज आरोप होतायत त्या ट्रस्ट मध्ये अशोक सिंघल यांचे विश्वासू सहकारी विहिंपचे नेते चंपत राय आहेत. मंदिराचे आर्थिक हिशोबही तेच पाहतात.

सध्या आपण आपल्या लालदासच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टीला सुरुवात करुया,

१९९२ मध्ये कल्याण सिंग यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात प्रथमच भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्याच दरम्यानची ही गोष्ट.

रामजन्मभूमी वाद हा तसा जुनाच होता. पण हे भ्रष्टाचाराचं सत्र उघडकीस आणायला कारणीभूत होते मंदिराचे मुख्य पुजारी लालदास. रामजन्मभूमीच्या वादाला राजकीय रंग देण्याच्या ते विरोधात होते. त्यांच्या मते मंदिराचा मुद्दा हा स्थानिक लोकांना घेऊन मिटवला पाहिजे. हा मुद्दा मिटवायला कोर्टकचेरी, रथयात्रा, आंदोलनाची गरज नाहीये.

त्यांच्या या तटस्थ भूमिकेमुळेच सुप्रीम कोर्टाने त्यांना मंदिराचे मुख्य पुजारी नियुक्त केलं होतं. त्याचवेळी त्यांनी राम मंदिरासाठी मिळणाऱ्या पैशांच्या भ्रष्टाचारावर मधु किश्वर यांना मुलाखत दिली होती. आणि ही मुलाखत ‘मानुषी’ या पत्रिकेत छापण्यात आली होती. त्यात लालदास म्हणतात,

मंदिर बांधण्यासाठी रामाच्या नावावर पैसे गोळा करणारी भ्रष्टाचारी लोक विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत. हीच ती लोक जी हिंदू राष्ट्र, रामाचं नाव घेऊन तणाव पसरवत आहेत. लोकांची माथी भडकवत आहेत. 

त्या काळात वर्षभरात मंदिरात १० लाखांहून अधिक रक्कम दानपेटीत जमा व्हायची. २५-२६ वर्षांपूर्वी ही रक्कम काही कमी नव्हती. पण ती रक्कम कुठं जाते यावर सर्वांनी जाणीवपूर्वक मौन बाळगलं होतं असं लालदास यांचं म्हणणं होत.

यात त्यांनी अशोक सिंघल यांचं नावं घेतलं होत, ते म्हणतात

ये जो पुंजीपती कहते हैं की हिंदू धर्म की रक्षा, हिंदू धर्म की रक्षा पर यही लोग लाखो रुपये अपने खातो में डाल रहे हैं। विश्व हिंदू परिषद के पुंजीपतीयोमेसे अशोक सिंघल कहते है, हम राम के बहोत बडे भक्त हैं। क्या राम का यही आदर्श है की ९०% लोग भुकसे मरे? लोगो की हत्या हो जाए उससे आपको कोई मतलब नहीं?

इनका मतलब सिर्फ कुर्सी और पैसा मिले बस!

त्या इंटरव्यू मध्ये हिंदू धर्मीय संघटनांना लालदासांनी हे उघड उघड बोलले आवडलं नाही. याच दरम्यान कल्याण सिंग यांच्या नेतृत्वात १९९२ मध्ये उत्तर प्रदेशात प्रथमच भाजपाचे सरकार स्थापन झालं. आणि त्यांनी लालदास यांना पुजारीपदावरून हटवलं. आणि एक वर्षाच्या आतच त्यांची हत्या झाली.

आता हा निव्वळ योगायोग नव्हता. 

सीबीआयच्या तपासात लालदासची हत्या जमीनीच्या वादातून झाल्याचं सांगितलं गेलं. अयोध्या आणि आसपासचे लोक असं सांगतात की, राम मंदिराच्या राजकारणावर कब्जा करु पाहणाऱ्या लोकांनीच लाल दासची हत्या केली होती. पण सीबीआय हे सिद्ध करू शकली नाही.

विश्व हिंदू परिषदेवर फक्त लालदासांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले नव्हते. तर त्यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ही होतं. 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने २ मार्च १९८९ मध्ये विश्वहिंदू परिषदेच्या अशोक सिंघल आणि अकॉउंट बघणाऱ्या लोकांना समन्स धाडले होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हे समन्स जसे का पाठवले त्या २४ तासाच्या आतच विहिंपने पंतप्रधानांच्या निवासस्थाना समोर उग्र असं आंदोलन केलं.

त्यात ‘हिंदू हित का काम करेगा वही देश पें राज करेगा’ अशा घोषणा देण्यात आल्या.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने २ ते ३ मुद्द्यांना लक्षात घेऊनच विहिंपला समन्स पाठवले होते.

विश्व हिंदू परिषदेला बाहेरून येणारा पैसा 

विहिंपने आरबीआयला एक अर्ज केला होता. यात त्यांनी म्हंटल होत कि, मंदिराच्या निर्माणसाठीं बाहेरच्या देशातले लोक पैसे पाठवू इच्छितात. तर आरबीआयने तशी परवानगी द्यावी.

पण आरबीआयने ही परवानगी नाकारली. त्याच कारण होत विहिंप एकतर अशी संघटना आहे जी सातत्याने दंगली घडवू शकते आणि बाहेरून आलेला हा पैसा त्याच काम यासाठी वापरला जाऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे विहिंप सत्ताधाऱ्यांना पाठबळ देणारी, राजकीय हितसंबंध जोपासणारी संघटना आहे.

तत्कालीन परिस्थितीत विहिंपच्या अमेरिकेत २०० च्या वर ब्रांचेस होत्या. तर युके, कॅनडा आदी देशांमध्ये १ लाखाहून अधिक ब्रांचेस होत्या. आणि या देशातून राम मंदिर बांधायच्या नावाखाली खूप सारा पैसा गोळा होत आहे याची टीप इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळाली होती. 

विहिंपने साधा डुप्लिकेट कागद सुद्धा जमा केला नव्हता. 

IT रिटर्न्स भरायचे असतील तर अकाउंट डिटेल्स सादर करावे लागतात हा साधा कायदा आहे. ऑक्टोबर १९८९ मध्ये अशोक सिंघल यांनी एक IT रिटर्न फाईल केली. जेवढ्यासाठी IT रिटर्न फाईल केली होती त्या पैशांचा हिशोब त्यांना देता आला नाही.

त्याचे साधे डुप्लिकेट कागदपत्र ही त्यांच्याकडे नव्हते. आणि पुढचं म्हणजे त्या अकाउंट वरचा सर्व पैसा गायब होता. त्यांनी तो हिशोब दद्यायला टाळाटाळ केली होती.

विहिंपमध्ये या पैशांवरुन अंतर्गत वाद सुरु झाला. 

१ करोड ६६ लाखांसाठी IT रिटर्न फाईल केली होती. हा पैसा राम मंदिराच्या शिलान्यासावर खर्च होणार होता. पण तस झालंच नाही. जो खर्च विहिंपने दाखवला होता तो बोगस होता. या पैशावरून विहिंप मध्ये अंतर्गत वाद सुरु झाला होता.

आता याची टीप पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळाली होती. म्हणूनच समन्स धाडले होते.

याचा परिणाम असा झाला कि, ८ मार्चला विहिंपने सरकार वर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुरु असलेली इन्क्वायरी बंद करण्यासाठी सरकारला गळ  घातली.अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल असा सज्जड दम भरला.

हे समन्स विश्वबंधू गुप्ता या अधिकाऱ्याने पाठवले होते. त्याच दिवशी या अधिकाऱ्याची ट्रान्सफर मद्रासला करण्यात आली. आणि जून २९ ला तर सस्पेंड पण केलं. त्याचबरोबर त्या अधिकाऱ्याला विहिंपच्या दोन नेत्यांनी जीवानिशी मारण्याची धमकी दिली होती. 

तो अधिकारी हा तपास थांबवताना एक महत्वाचं वाक्य बोलला,

आज दलालत सभी जगह घूस गई है। पर धर्म को उसका नाम देना ये बहोत गलत बात है।

आज ही बऱ्याच लोकांना राम मंदिर बांधण्यासाठी देण्यात आलेल्या देणग्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. हजारो कोटी राहू द्या पण गेल्या दोन-तीन दशकांतल्या किमान शेकडो कोटींच्या देणग्यांच काय झालं, पैसे गेले कुठे? असे नवे प्रश्न, आत्ताच्या नव्या भ्रष्टाचारावर लोकांनी उपस्थित केलेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.