अबू सालेम शाहरुखला म्हणाला,” अभी पुलिस कि जरुरत नहीं, मै तुम्हे नही मारुंगा.”

बॉलिवूड इंडस्ट्री आणि अंडरवल्ड याचं पहिल्यापासूनचं एक वेगळं समीकरण. मग ते प्रेम प्रकरण, मैत्री, खंडणीपासून धमकीचे दोन हा प्रवास आधीपासूनचाचं. यात शाहरुखची सुद्धा खानसुद्धा अपवाद नव्हता.

तर तो काळ होता जेव्हा शाहरुख एक मोठा स्टार म्हणून समोर आला होता. त्याच वेळी मुंबईत अंडरवर्ल्डची पकड पुन्हा घट्ट होऊ लागली होती. रिअल इस्टेटमध्ये नरमाई आली, सोनं आयात करणं सोपं झाल्याने त्यातलं स्मगलिंग कमी झालं. त्यामुळे गुंडांनी दुबईहून ड्रग्ज, हत्यारं आणि बॉलिवूडमधून खंडणीवसुलीवर लक्ष द्यायला सुरुवात केली.

या दरम्यान गँगस्टर अबू सालेम बराच चर्चित आलेला. त्याने शाहरुखला टार्गेट केलं होतं. त्यामुळे ज्येष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी दिग्दर्शक महेश भट्टला फोन केला आणि सांगितलं कि,

‘शाहरुखला जिवे मारण्यात येईल, असा धोका आहे. आता तो कूठे आहे ते शोधा आणि  त्याला बाहेर जाण्यापासून प्रतिबंध करा,’

मारिया यांना आपल्या खबऱ्याकडून ही माहिती मिळाली होती. आमीर नव्हे, तर शाहरुख हा महेशचा लाडका अभिनेता. महेश त्याला घेऊन सिनेमा करत होता. त्याने शाहरुखला हा निरोप दिला. मग दोघे जण मारिया यांना भेटले. त्यांनी त्याला सुरक्षा देऊ केली.

मोहन भिसे हा उंचापुरा, तगडा कमाडौं शाहरुख खानचा बॉडीगार्ड बनला होता. पण यावेळी शाहरुख खबरदारी घेतचं होता. तो फार कमी वेळा घराबाहेर किंवा स्टुडिओबाहेर पडायचा. पार्ट्यांना जाणं तर त्याने पार टाळलं. कामानिमित्त आपल्या कारने जाता- येतानाचा मार्ग तो आयत्या वेळेला बदलायचा. ऑटोग्राफसाठी एखाद्या चाहत्याने पेन देण्यासाठी खिशात हात घातला, तरी आता हा बंदूक काढतोय की काय, अशी भीती शाहरुखला वाटायची. मूलांबाळांची काळजी वाटायची.

शाहरुखचा बॉडीगार्ड भिसे साध्या वेशात असायचा. आपलं रिव्हॉल्वर लपवून ठेवायचा आणि  शाहरुखजवळ येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करायचा. मोहन आणि शाहरुखची चांगलीच गट्टी जमलेली. ते साहित्यापासून राजकारणापर्यंत सगळ्या गोष्टींवर गप्पा मारायचे.

या दरम्यान, खंडाळ्याला माधुरी सोबतचा चित्रपट ‘दिल तो पागल है’चं शूटिंग  होतं. ते आटपून शाहरुख परत येत असताना अचानक त्याला एक फोन आला. तो आवाज अबू सालेमचा होता.  दटावणीचा स्वर आणि  मुन्नाभाई सर्किटची भाषा

‘हां, क्या चल रहा है? फिल्में कौन सी कर रहा है? आपुनसे छिपाने का नहीं’

आता आधी फोन कोणाचा हे कळालं नसल्याने शाहरुखने विचारले,’हू इज धिस ?’

आता तो इंग्रजीत झाडायला लागल्याने अबूचं टाळकं सणकलं. त्याने ठेवणीतल्या शिव्या हासडल्या. आता गोंधळलेला शाहरुख म्हणाला ‘व्हॉट इज द प्रॉब्लेम सर ?’.

यावर समोरून ‘एका मुस्लिम निर्मात्याचा सिनेमा तू का नाकारलास ? तू मुस्लिम आहेस की कोण आहेस?’ असा सवाल अबू सालेम केला. 

शाहरुखने पूर्वी अब्बास-मस्तान मन्सूर खानचा ‘जोश’, अझीझ मिझ्झाच्या चित्रपटात कामं
केली होती. महेश भट्टची आई (‘जख्म’ आठवतो?) मुस्लिमच, महेशच्या ‘चाहत’मध्ये तो होता.
अबूला त्याचं म्हणणं पटलं. तो म्हणाला,

‘लोग बोलते थे, तू बहोत प्राऊडी है, लेकिन तू बडा शरीफ है. अभी पुलिस की जरुरत नहीं. तेरे को मैं नही मारुंगा.’

पण गुंडांचा भरवसा नसतो. महिन्याभरानंतर तो त्याला फोन करून इतर नटनट्यांची, निर्मात्यांची, नव्या चित्रपटांची माहिती काढण्यासाठी प्रयत्न करू लागला. ‘तू अभी किसी के साथ कहाँ है ये मालूम है मेरे को’ अशी टाकाटाकी करून तो त्याला घाबरवून सोडायचा.

अबूचा आपल्यावर वाँच आहे या जाणिवेने शाहरुख अस्वस्थ व्हायचा. कामावरचं लक्ष उडायचं. ‘नम्रपणे बोल. त्याच्याकडून माहिती घेऊ नकोस आणि त्यालाही काही सांगू नकोस,’ अशी सूचना  मारिया यांनी शाहरुखला दिली होती. त्यानुसार शाहरुख वागत राहिला.

‘मी काही मॅकोबिको नाही. माझी हवा तंग झाली होती,’ अशी कबुली शाहरुख देतो.

अबूने शाहरुखकडे पैसे मागितले नाहीत. कधीतरी तो सांगे की अमुक निर्मात्याची फिल्म कर, तेव्हा ‘तुझ्या कामात मी ढवळाढवळ करतो का ? तेव्हा तूही माझ्या कामात हस्तक्षेप करू नकोस,
असं हळुवारपणे शाहरुख उत्तर द्यायचा.

एकदा अबूने शाहरुखला फोन करून कॉन्फरन्स कॉलवर होल्ड ठेवले. मग अबू दोन बड्या फिल्मी हस्तींना फोनवरून धमक्या देऊ लागला. शिवीगाळ करू लागला. त्याच वेळी दोघांना त्याने याची कल्पना दिली की बघा, शाहरुखसारख्या सुपरस्टारला मी होल्डवर, वेटिंगवर ठेवू शकतो. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.