जेव्हा विलासरावांच्या एका चुकीनं पवारांचं पंतप्रधानपद हुकलं !!!

शरद पवार पंतप्रधान होणार या चर्चेनं सध्या वातावरणात धुमाकूळ घातला आहे. पवारांच्या पंतप्रधानपदाची ही चर्चा आजची नाही, राजीव गांधीच्या मृत्यूनंतर जेव्हा जेव्हा पंतप्रधान पदाची चर्चा रंगात आली तेव्हा तेव्हा शरद पवारांचं नाव चर्चेत आलं. मग ती संधी कधी नरसिंहरावांना मिळाली तर कधी मनमोहनसिंगांना आणि मागं राहिली ती फक्त शरद पवारांच्या पंतप्रधानपदाची चर्चा…

हा किस्सा तोच जेव्हा शरद पवार पंतप्रधान झाल्यात जमा होते, त्याक्षणी विलासराव देशमुखांच्या एका चुकीने शरद पवार पंतप्रधान होता होता राहिलं.

तर किस्सा असा की, राजीव गांधीच्या आकस्मित मृत्यूनंतर कॉंग्रेसची जबाबादारी कोण घेवू शकेल याबाबत जोरदार चर्चा होतं होत्या. सोनिया गांधी यांनी मला राजकारणात रस नसल्याचं सांगितल्यानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याच्या बाहेर कॉंग्रेसची सुत्र जाण्याची चिन्हे दिसू लागली होती. तापलेलं वातावरण पाहून अनेक पत्रकार वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेवून काही मिळतय का याचा अंदाज घेत होते.

Screen Shot 2018 07 03 at 1.42.35 PM

यादरम्यान टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार राजदिप सरदेसाई व महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार प्रकाश अकोलकर, विलासराव देशमुखांना भेटायला गेले होते. दिल्लीतील राजकिय भविष्याबाबत राजदिप सरदेसाई यांनी त्यांना छेडलं असता ते म्हणाले, शरद पवारांनी कॉंग्रेसच्या प्रत्येक खासदाराला दोन कोटी रुपये ऑफर केले आहेत..

या एका शब्दाचा अचूक अंदाज राजदिप सरदेसाई यांना आला. त्यांनी पवारांच्या या ऑफरची बातमी केली. नेमका त्या दिवशी रविवार असल्या कारणाने टाईम्सचे संपादक दिलीप पाडगांवकर सुट्टीवर होते. राजदिप सरदेसाईंची बातमी शहानिशा न करता छापून आली. बातमीचा अपेक्षीत परिमाण साध्य झाला व दिल्लीच्या कोअर टिममधून शरद पवारांच नाव मागे पडलं.

या घटनेबाबत राजदिप सरदेसाई सांगतात की, दुर्भाग्य म्हणा की भाग्य पण बातमी छापून आल्यानंतर शरद पवारांचा मला फोन आला. ते म्हणाले, राजदिप. हे काय केलस तू ? आमचा प्लॅन प्लॉप केलास… तूला माहित आहे का, आत्ता एवढ्या स्टोरीमुळे माझी संधी हुकणार आहे ..? ”

त्या घटनेमुळे शरद पवारांच नाव मागे पडलं अस राजदिप सरदेसाई आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात. त्यानंतर ते म्हणतात, कदाचित त्या दिवशी दिलीप पाडगांवकर ऑफिसमध्ये असते तर बातमीची शहानिशा झाल्याशिवाय बातमी छापली गेली नसती पण माझी ती बातमी छापली गेली आणि महाराष्ट्राच पंतप्रधानपद हूकलं !!!

2 Comments
  1. Madan Jain says

    Khajdeep ssrkhya Avalon bhadvyla kakani ghoda Jada lavla Nahi?

  2. धनंजय पाटील says

    खूप छोटी गोष्ट वाटते ही पण खूप मोठी संधी महाराष्ट्राच्या हातून गेली. पत्रकारिता ही जबाबदार हवी. एखाद्याचं अख्ख आयुष्य पणाला लागू शकते एखाद्या चुकीच्या बातमी मुळे.

Leave A Reply

Your email address will not be published.