मर्डरची केस फक्त एका शार्क माशामुळे सुटली होती
असं म्हणतात की चोर कितीही प्रो असला तरी तो काहीना काही खूण मागे ठेवतो आणि पकडला जातो. काही केसेसमध्ये खरंच चोर अल्ट्रा प्रो निघतो आणि पोलिसांना सुद्धा गुलीगत धोका देतो. असाच एक आजचा किस्सा एडविन स्मिथच्या हत्येच्या केसबद्दलचा जाणून घेऊया ज्यात आरोप सिद्ध असूनही आरोपीला मुक्त करण्यात आलं होतं.
समुद्रात मच्छिमार लोकांना १४ फूट लांबीचा एक शार्क मासा घावला.
आश्चर्य याचं नव्हतं की एवढा मोठा शार्क सापडला आश्चर्य याचं होतं की त्या शार्कच्या तोंडातून एक मानवी हात सापडला होता. पोलिसांना बातमी कळली आणि पोलिसांनी त्या शार्कला प्रदर्शनासाठी कोगी अँक्वेरीयम मध्ये ठेवलं. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की त्या माशाच्या पोटात मानवी हात आहे आणि त्याला प्रदर्शनासाठी ठेवलं आहे.
त्या हातावर होते दोन बॉक्सरचे टॅटू ज्यावरून ओळखता येऊ शकत होतं की तो हात कुणाचा आहे. मेडिकल चौकशी झाली त्यात कळून आलं की तो हात शार्कने चावलेला नाही. त्यावरून स्पष्टपणे दिसत होतं की हात कापून फेकून दिलाय आणि हे एका हत्येचं प्रकरण होतं.
पोलिसांची चक्र फिरू लागली आणि बरीच शोधाशोध केल्यावर कळलं की तो हात एडविन स्मिथ या व्यक्तीचा आहे. त्या मृत व्यक्तीच्या बायकोने तो हरवल्याची तक्रार सुद्धा दिलेली होती.
तपास अजून जोरात सुरू झाला आणि मुळाशी गेल्यावर समोर आलं की गायब होण्याच्या एक हफ्ता अगोदर एडविन आपला मित्र पेट्रिक ब्रॅडी सोबत दारू पीत होता. साहजिकच पोलिसांचा संशय ब्रॅडीवर गेला आणि अंदाज लावण्यात आला की यांच्यात काहीतरी वाद झाला असेल आणि पेट्रिक ब्रॅडीने त्याची हत्या करून एका बॅगेत त्याला भरलं असेल पण हात त्या बॅगेत मावत नसल्याने हात कापून समुद्रात फेकून दिला असेल.
पण हा फक्त अंदाज होता अजून काहीतरी मिळेल म्हणून पोलीस शोध घेऊ लागले. पोलिसांना पत्ता लागला की स्मिथ कुठल्यातरी रेगीनाल्ड होम्स नामक व्यक्तीसोबत ड्रग्जचा धंदा करायचा . पोलिसांनी होम्सची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की स्मिथचा कापलेला हात नाचवत ब्रॅडी माझ्याकडं आला होता आणि कोणालाही सांगू नको म्हणून धमकी देऊन गेला होता.
सगळा मॅटर क्लीअर होता आता ब्रॅडीला शिक्षा होण्यापासून रोखणारा कोणीच नव्हता पण ब्रॅडीचं नशीब जोरावर होतं. होम्स जो या खुनाचा एकमेव साक्षीदार होता त्याला कोणीतरी गोळी मारली आणि तो मेला.
आता होम्स मेल्यानंतर असा एकही साक्षीदार नव्हता की जो ब्रॅडीच्या विरोधात साक्ष देऊ शकेल. आता साक्षीदारचं नाही म्हणल्यावर न्यायालयाने पेट्रिक ब्रॅडीला सोडून दिलं. हे प्रकरण तेव्हा भरपूर गाजलं होतं.
हे ही वाच भिडू :
- खुनाच्या केसमध्ये जेल मध्ये जाऊन आलेल्या बाहुबलीला लॉकडाऊन मोडला म्हणून अटक झालीय
- नुसत्या वर्णनावर ते आरोपीचं स्केच काढतात ; त्यांच्यामुळे ४०० केसेस पोलिसांनी सोडवल्या आहेत..
- बुरारी केस : एकाच घरातल्या ११ जणांनी केलेली आत्महत्या आजही भूताटकीला बळ देत राहते