श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार, कोण जिंकतय सोशल मिडियावरची लढाई ?

लोकसभेच्या प्रमुख हायव्होल्टेज सामन्यापैंकी एक सामना म्हणजे, मावळची लढाई. शरद पवार यांचे नातू, अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे तळागाळातून आलेले श्रीरंग आप्पा बारणे अशी हि लढत होतं आहे. गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवड सारख्या शहरावर एकछत्री अंमल असून देखील मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला आपल्या ताब्यात घेता आला नव्हता. यंदा मात्र मावळवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा म्हणून पवार घराण्यातून थेट पार्थ पवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं.

पार्थ पवारांनी सध्या मावळच्या मैदानात किती मजल मारली हे नेमकं सांगता येणं अशक्य असलं तरी, त्यांची हि मजल दरवेळी तासादिड तासाने उशीरा पोहचते म्हणून ते चर्चेत आहेत. पहिल्यांच भाषणात झालेल्या चुकामुका, लोकलचा उलटा प्रवास, रस्त्यावरुन बिनकामाची धावपळ ते तथाकथित धर्मगुरूंकडून आत्मा ट्रान्सफर करण्याचे प्रकार पाहून लोकांनी पार्थ पवारांना ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. यामुळे पार्थ पवार चर्चेत आले आहेत.

असो, तरिही मुख्य मुद्दा आहे, सोशल मिडीयावर कोण कितपत मजल मारत आहे? कोणाची हवा सध्या काय म्हणतेय. तत्पुर्वी उमेदवारांची बेसिक माहिती. 

श्रीरंग अाप्पा बारणे.

  • जन्म- १६ फेब्रुवारी १९६४.
  • शिक्षण- आठवी पास.
  • टोपणनाव -अाप्पा.
  • व्यवसाय- बांधकाम व्यवसायिक आणि शेती.
  • कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.
  • सन १९९७ पिंपरी चिंचवड महानगर पालिका येथे नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात.  
  • १९९७ ते २०१२ पिपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता अशी अनेक पदे भूषवली.
  • २०१४ साली स्वतः उद्धव ठाकरे यांनी तेव्हाचे विद्यमान खासदार गजानन बाबर याचं तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना तिकीट दिले.
  • मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप उमेदवारांना धूळ चारून मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा झेंडा रोवला.

पार्थ अजित पवार.

  • जन्म – २१ मार्च १९९०.  
  • शिक्षण- पदवीधर (वाणिज्य शाखा) एच.आर.महाविद्यालय, मुंबई.
  • टोपणनाव- दादा.
  • पार्थ पवार हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत.
  • माजी कृषिमंत्री, माजी संरक्षणमंत्री, माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू.
  • पवार घराण्याचा समर्थ राजकीय वारसा.
  • प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव नाही.
  • २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राजकीय व्यासपीठावर आल्याचे सांगितले जाते.
  • गेल्या सहा महिन्यांपासून मावळमध्ये स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत भेटीगाठी वाढवण्यात आल्या.
  • यावेळी मावळमधून निवडणूक लढवणार म्हणून सुरवातीपासून आग्रह. नातवासाठी शरद पवार यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागल्याची चर्चा.

फेसबुक.

१. श्रीरंग बारणे.

Screenshot 9

श्रीरंग बारणे यांचे Shrirang Appa Barne नावाचे अधिकृत फेसबुक पेज आहे. या पेजला जवळपास १ लाख लोक फॉलो करतात. हे अकाऊंट २६ नोव्हेंबर २०१३ मध्ये उघडण्यात आले असून या पेजला फेसबुकचा निळा टिक अर्थात ऑफिशियल अकाऊंट चा सिंम्बॉल आहे. श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची दिशा या अकाऊंटवरून कळते,

“वारसा नव्हे वसा लोकविकासाचा.”

श्रीरंग बारणे यांचा पेजवरील सुरवातीच्या तीन पोस्ट उदाहरणादाखल घेतल्या तर, आज १ एप्रिल रोजी चारच्या च्या सुमारास या पेजवर श्रीरंग बारणे यांच्या उद्याच्या पनवेल ग्रामीण व उरण दौऱ्याचे वेळापत्रक शेअर करण्यात आले आहे. त्यापूर्वी साधारण दीड वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांमधील निवडक विधानांचा एक ५२ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. सकाळी ९.३० वाजता पंतप्रधान मोदीजींचा समावेश असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या तिन्ही पोस्टना अनुक्रमे ४६, ४२ आणि ७० इतके लाईक आहेत. हे पोस्ट साधारण ६ ते आठ जणांनी शेअर केलेले सुद्धा आपणास दिसून येईल.

श्रीरंग अप्पा बारणे यांच्या नावाचे इतर फेसबुक पेजेस.

Screenshot 2019 04 02 at 10.55.35 AM 

फेसबुकवर श्रीरंग बारणे यांच्या नावाने सर्च केल्यास त्यांचे ऑफिशियल पेज सोडून चारच पेजेस येतात. या पेजेसला 4 पासून 916 लाईक्स आहेत. थोडक्यात, श्रीरंग आप्पा बारणे फेसबुकवर कमालीचे पाठीमागे असलेले दिसून येतात.

 

२. पार्थ अजित पवार. 

Screenshot 4

पार्थ पवार यांच Parth Ajit Pawar हे फेसबुक पेज आहे. या पेजला जवळपास ४१,००० लोक लाईक आणि फॉलो करतात. हे पेज २६ मे २०१७ ला बनवण्यात आलं होत. अजूनही फेसबुक कडून अधिकृत निळा टिक पार्थ पवार यांना मिळायचा आहे. त्यांच्या प्रचाराची दिशा या फेसबुक पेजवरून कळते. यात ते म्हणतात,

“पिपरी चिंचवडला दिला आकार आता मावळही साकारणार, आता एकच ध्यास नवी मुंबईप्रमाणे मावळचाही विकास, बारामती आहे देशाची शान मावळलाही मिळणार तोच मान “

यावरून पवार घराण्याने केलेल्या विकासाच्या राजकारणाची आठवण मतदारांना करून देण्याचा प्रयत्न दिसून येतो.

  • पार्थ पवार यांची सगळ्यात लेटेस्ट पोस्टमध्ये म्हणजे काल ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजता धम्मभूमी देहू रोड येथील बुध्द विहारचं त्यांनी घेतलेल्या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टला २६६ लाईक आणि ९ शेअर आहेत.
  • त्या पूर्वी संध्याकाळी ७ वाजता पार्थ पवार यांनी तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीचे पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला सुद्धा २४९ लाईक आणि १२ शेअर करण्यात आले आहेत.
  • ३१ मार्चला संध्याकाळी ६.१९ वाजता त्यांनी  पिंपरी चिंचवड शाखेच्या WIRC ह्यांनी आयोजित केलेल्या सभेत तरुण CA तरुणांशी संवाद साधला याबद्दल पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टला लोकांनी तब्बल ५८५ लाईक आणि २१ शेअर केलेले पाहायला मिळतात.

पार्थ पवार यांच्या नावाचे इतर फेसबुक पेजेस.

Screenshot 2019 04 02 at 10.56.28 AM

यात  पार्थ अजित पवार युवामंच, युवा सर्व पार्थ पर्व असे काही पेजेस पार्थ पवारांच्या प्रचारासाठी सक्रीय असलेले दिसून येतात मात्र एकंदरीत संख्या बघता श्रीरंग अप्पा बारणे यांच्याहून अधिक इतकच समाधान पार्थ पवार यांना मानावं लागेल.

ट्विटर. 

१. श्रीरंग बारणे-

Screenshot 6

ऑक्टोबर २०१४ पासून खासदार श्रीरंग बारणे यांचे ट्विटरवर अकाऊन्ट काढलेले दिसून येते. आतापर्यंत त्यांनी १९२० ट्विट्स केले आहेत तर त्यांचे २६१३ ट्विटर फोलोवर्स आहेत हे आपण पाहू शकतो. श्रीरंग बारणे हे ट्विटरवर २१२ जणांना फॉलो करतात या मध्ये भारताचे राष्ट्रपती , पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, अमिताभ बच्चन, शरद पवार या ट्विटर अकाऊंटस चा समावेश आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या ट्विटसमध्ये आदित्य संवाद या कार्यक्रमाचे वेळापत्रक, शिवाय प्रचाराच्या निमिताने एकविरा आईचे घेतलेले दर्शन, त्यापूर्वी शिवसेना भाजपा युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त भेटीचे फोटो शेअर केलेले आहेत. या तिन्ही ट्विटसना अनुक्रमे ४२,१३८, १६२ इतके लाईक आहेत. हे तिन्ही ट्विट साधारण दोन चार दिवसात एक या प्रमाणे करण्यात आलेले आहेत.

२.पार्थ अजित पवार-

Screenshot 5

मी २०१८ मध्ये पार्थ पवार यांनी हे ट्विटर अकाऊंट सुरु केले. आता पर्यंत त्यांनी ९९ ट्विट केलेले आहेत. त्यांना ४७४३ एवढे जण फॉलो करतात तर पार्थ पवार ११ जणांना फॉलो करतात. यामध्ये शरद पवार, अजित पवार, बराक ओबामा, राहुल गांधी, अमीर खान यांचा समावेश होतो.

पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटसमध्ये त्यांनी काल उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याबद्दल इस्रोचे कौतुक केलेले आहे. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर करून त्यात इंग्रजीमध्ये भारतातील बेरोजगारीवर टीका करण्यात आली आहे. ३० मार्चला दुपारी शेअर केलेल्या ट्विटमध्ये पार्थ पवार यांनी सर्वाना आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

 इंस्टाग्राम. 

१.श्रीरंग अप्पा बारणे. 

Screenshot 8

इंस्टाग्राम वर खासदार श्रीरंग बारणे यांना ४४६५ फोलोवर्स आहेत व त्यांनी आता पर्यंत ११५ पोस्ट शेअर केलेल्या आहेत. यात त्यांनी पिंपरीमधल्या काही सन्मानीय  सिएंची घेतलेली भेट, त्यांच्या पत्नीने प्रचारासाठी महिला वर्गाशी साधलेला संवाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ याचा समावेश आहे. या तिन्ही पोस्टना अनुक्रमे ३८,१०८ लाईक आणि व्हिडीओला ५६५ व्हूज मिळालेल्या आहेत. बारणे यांच्या इंस्टाग्राम अकाऊन्टला निळा टिक मिळालेला नाही.

२.पार्थ अजित पवार-

Screenshot 7

फेसबुक, ट्विटर वर अधिकृत निळा टिक न मिळालेल्या पार्थ पवार यांना इंस्टाग्रामवर मात्र अधिकृत निळा टिक मिळालेला आहे. त्यांनी आतापर्यंत ५४ पोस्ट शेअर केल्या असून त्यांचे ५,९७१ इतके फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर पार्थ पवार यांनी एक बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीला नमस्कार करतानाचा, wirc च्या सभेत भाषण करतानाचा आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोना अनुक्रमे ६७१, १,०३५ आणि १,१७० इतके लाईक मिळालेले आहेत.

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांचा विचार करता, पार्थ पवार हे श्रीरंग बारणे यांच्या बरेच पुढे असल्याचे दिसून येतं. मात्र पार्थ पवार हे ट्रोलिंगमध्ये देखील श्रीरंग बारणे यांच्या पुढे असल्याने तेच गणित बारणे यांच्या पथ्यावर देखील पडण्याची चिन्हे जास्त आहेत. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.