एकच पेग, एकच क्वॉटर असं नसतंय…किती पेग दारू पिली तर शरीराला झेपतंय ते समजून घ्या…

तुम्ही म्हणाल भिडू कसला भारीये…दारुचा विषय घेऊन आलाय. पण तरी कसंय बसणं हा वेळ, काळ, स्थळ, वार या सगळ्याच्या पलीकडं गेलेला विषय आहे. दारू पिऊ नये या ठाम मताचे आम्ही असलो, तरी दारुवर बोलू नये असं नियमांच्या पुस्तकात कुठंच लिहिलेलं नाय. त्यामुळं कुठंतरी काहीतरी वाचलं जातं आणि तुमच्या काळजीपोटी आम्हाला विषय सुचतात.

 दिवंगत ऋषी कपूरचा शेवटचा पिक्चर नुकताच रिलीझ झाला. प्रमोशन करता करता रणबीर कपूरनं सांगितलं, ”आमचे पप्पा इतके शौकीन होते, की आधी डॉक्टरला आणि मग मम्मीला गंडवून रोज रात्री लिटिल लिटिल म्हणत दोन ड्रिंक्स घ्यायचेच.”

आता ट्रीटमेंट सुरू असतानाही कपूर काका बसत होते, म्हणून इन्स्पायर होऊ नका. प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतोय आणि कोटाही. म्हणून कुणी खंबा डाऊन असलं, तरी सरळ उभं राहतंय आणि कुणी एका क्वार्टरमध्येच टॉम क्रुझ होतंय.

आपला आजचा विषय आरोग्याचा आहे. म्हणजे असं की, दिवसाला किंवा आठवड्याला किती दारु पिली पाहिजे? दारूचे दुष्परिणाम आणि प्रमाणात घेतलेल्या दारुचे फायदे काय असतात?

सगळ्यात पहिलं या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करतो. थोडी असो किंवा लई दारु पिणं हे शरीराला चांगलं नसतंच. पण कमी पिण्याचा धोका जरा कमी असतो. आता बऱ्याच लोकांचा असा विषय असतो, की त्यांना दारू पिल्याशिवाय राहवत नाहीच. मग अशावेळी डॉक्टर्स त्यांना सल्ला देतात की, तुम्ही आठवड्याला एवढी एवढीच दारु पित जा. आता एवढी म्हणजे किती, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरुषांनी आठवड्याला सहा ते सात स्टॅंडर्ड ड्रिंक्स घेणं चालू शकतंय आणि महिलांनी त्याच्या निम्मे स्टॅंडर्ड ड्रिंक्स घेणं ओके आहे.

मग आता स्टॅंडर्ड ड्रिंक्स म्हणजे काय? 

हा पॉईंटाचा मुद्दा. कारण इथं आपल्याला संपती तितकं माप म्हणजे स्टॅंडर्ड नसतंय. मापं सांगतो स्क्रीनशॉट काढून ठेवा, व्हिस्की किंवा जिन असेल तर फक्त थर्टी, बिअर असली तर ३३० मिलीलिटर आणि वाईन असली तरी १५० मिलीलिटर. मापात माप केलं की विषय बाद होणार, हे फिक्स. 

आणखीन एक म्हणजे सात पेग आठवड्याला चालतात म्हणून एकाच दिवशी पिऊ नका. 

कारण सायन्स असं सांगतं की, एका दिवशी आपलं शरीर फक्त ३ स्टॅण्डर्ड ड्रिंक्सच सहन करु शकतं. म्हणजे थोडक्यात दिवसाला नाईंटीच. त्यातही तासाला एकच पेग. आता पिऊन किती चढणार हे प्रत्येकाच्या कोट्यावर अवलंबून असलं, तरी उपाशी पोटी दारू पिऊच नका. थोडं खाऊन मगच थेंब शिंपडायला घ्या आणि पिताना पाणी पण भरपूर प्या म्हणजे डीहायड्रेशन होत नाही.

आता आपल्याकडची बरीच गाभडी म्हणतात, ‘मी कधीतरीच बसतो रे.’

गडी कधीतरी बसतो आणि निदान खांब डाऊन होतो. तर दिवसाला थोडं थोडं पिण्यापेक्षा हे एकाच दिवशी पिणं फार जास्त घातक असतं. कारण शरीरातली साखर वाढते, बीपी वाढू शकतं आणि कोलेस्ट्रॉल उसेन बोल्टच्या स्पीडनं पळायला लागतं. दारू पिऊन आपल्या लिव्हर सेल्स डॅमेज होतात, त्या भरुन येणं कठीण असतं आणि एकाचवेळी खंबा संपवल्यावर लिव्हरची काय अवस्था होत असेल तुम्हीच विचार करा.

एवढे सगळे दुष्परिणाम असले, तरी लोकं दारू पिणं थांबवत नाहीत. मग त्रास वाढला की वाईन वर शिफ्ट होतात. रेड किंवा व्हाईट वाईनमुळं अनेकांच्या आरोग्यावर चांगले परिणाम दिसून आले आहेत. म्हणजे वाईन पिणाऱ्यांना थकवा कमी जाणवला, त्यांची स्कीन ग्लो करायला लागली, केस एकदम भारी झाले.

पण शेठ विषय असाय, की हे फायदे सगळ्यांमध्येच दिसून येतील असं नाही. प्रत्येकाचं शरीर, डायट, वातावरण आणि वेळापत्रक वेगळं असतंय, त्यामुळं एखाद्याला फायदा झाला म्हणून लगेच सुपरमार्केटकडे धाऊ नका. तिकडं तशीपण सोय झालेली नाहीच.

डॉक्टर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात ती म्हणजे, दारू पिण्याचे असंख्य दुष्परिणाम आहेत. पार लिव्हर फेल होण्यापासून ह्रदयविकारापर्यंत. सोबतच तब्येतीला चांगलं असतंय म्हणून लिटिल लिटिल घेतो हे सांगणंच चुकीचं आहे. एखाद्याला दारूचा काहीच त्रास जाणवत नसला, तर तो त्याच्या जेनेटिक्सचा विषय असू शकतोय. 

राहिला प्रश्न मापाचा, तर दिवसाला घ्यायची झाली तर किती, आठवड्याला घ्यायची झाली तर किती हे सांगायचं काम आम्ही केलंय. थेम्ब शिंपडताना आमची आठवण नाय काढली तरी चालेल पण स्वतःच्या लिव्हर आणि शुगर लेव्हलची नक्की काढा. 

विशेष सूचना: दारू पिऊच नका, पिल्यावर गाडी तर अजिबात चालवू नका.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.