भारतातल्या सगळ्या अतिरेकी संघटनांना हा फंडिंग करतो पण गेल्या ३० वर्षात साधा फोटो नाही

इंटरपोल म्हणजेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेच्या वेबसाइटवर एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या नावानं नोटीस आहे.

कुटुंबाचे नाव

घोरी

पूर्वनाव

मोहम्मद फरहतुल्लाह

लिंग

पुरुष

जन्मतारीख

02/08/1963 (वय 58 वर्षे)

जन्मस्थान

हैदराबाद, भारत

राष्ट्रीयत्व

भारत

वेगळी वैशिष्ट्ये

१)दाढी आणि मिशा असणे

२) काश्मीरी चेहरेपट्टी

3) जाड लेन्स वापरणे

4) कपाळावर नमाजाची निशान

५) पुढं आलेलं पोट

६) धूम्रपान करण्याची सवय

उंची

1.7 मीटर

गुन्हे

हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे शस्त्रे मिळवणे/ बाळगणे, कट रचणे, प्रवृत्त करणे, माणसे/शस्त्रे आणि दारूगोळा गोळा करणे आणि भारताविरुद्ध युद्धाची तयारी करणे.

अशी फुल्ल डिटेलमध्ये जाहिरात आहे. 

आणि त्याचा फोटो ह्यो असा 

58318766

नोटिसीच्या खाली अजून मोठ्या अक्षरात लिहलंय असा माणूस दिसला तर आम्हाला जरूर कळवा. आता असा माणूस जरी टपरीवर चहा पीत जरी आपल्यापुढं उभा असला तरी आपल्याला कळणार नाही. 

इंटरपोल जवळपास ३० वर्षे याच्या मागं आहे तरी त्यांना त्याचा साधा चांगला फोटो मिळवता आलेला नाहीये.

आपली ओळख एवढी सिक्रेट ठेवणारा हा अतिरेकी आहे ,५९ वर्षीय फरार जिहादी फरहतुल्ला घोरी. घोरीबद्दल जी थोडीशी माहिती मिळते त्यानुसार हैदराबादच्या कुरमागुडा तो १९९४ पर्यंत हैद्राबाद इथं  वास्तव्य करत असल्याचं समोर येतं. 

१९९२-९३ च्या धार्मिक हिंसाचारानंतर घोरी दरसगाह जिहाद-ओ-शहादत मौलवी नसीरुद्दीन मोहम्मद हन्नेफुद्दीन यांनी स्थापन केलेला  कट्टर धार्मिक संघटनेत सामील झाला.

१९९५ च्या उत्तरार्धात घोरी भारतातून सौदी अरेबियाला निघून गेला. त्यानंतर तो पुढे आला भारतातल्या दहशतवादी संघटनांचा चीफ फायनान्सर म्हणून. भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार भारतात दहशतवादी सेल स्थापन करू पाहणाऱ्या आणि जैश-ए-मुहम्मद किंवा लष्कर-ए-तैयबा शिबिरांमध्ये प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जाणाऱ्या भारतीय जिहाद्यांना पैसा पुरवण्याची जबाबदारी असते मोहम्मद फरहतुल्लाह घोरीची.

बरं घोरी कोणत्या संघटनेला जॉईन पण नाहीये. 

अगदी फ्रिलान्सिंग केल्यासारखं तो भारतविरोधी काम करणाऱ्या अतिरेकी संघटनांना फायनान्स करत असतो. जैश-ए-मुहम्मद, लष्कर-ए-तैयबा, अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या संघटनांना पैसा आणि माणसं जोडून देण्यासाठी घोरी त्याचं नेटवर्क वापरतो.

२००२ मध्ये हैद्राबाद मधल्या मंदिरातील बॉम्बस्फोट, २००५ मध्ये पोलिस कार्यालयावर आत्मघाती बॉम्बस्फोट आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नल्लू इंद्रसेना रेड्डी यांच्या हत्येचा प्रयत्न यासह हैदराबादमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी आर्थिक मदत केल्याचा घोरीवर आरोप आहे.

घोरीने कठीण काळात भारतातल्या जिहादींच्या पोटा पाण्याची सोय देखील केली आहे.

हैदराबादचे फोन सेल्समन शेख अब्दुल खाजा यांनी पोलिसांना सांगितले की तो २००९ मध्ये रियाधच्या डाउनमार्केट बटाह परिसरात घोरीच्या घरी राहिला होता. लष्कर ए तैयबाची कामं करण्यात अयशस्वी झाल्यानंतर शेख अब्दुल खाजाचं महिना ३०००० चं स्टायपेंड बंद केलं होतं तेव्हा घोरीने आपले काँटॅक्ट्स वापरून पुन्हा चालू करून दिलं होतं. 

२६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख दहशतवाद्यांना घोरीनेच एकत्र आणलं होतं.

आत घोरी बातम्यांमध्ये आहे त्यानं सोशल मीडियावरून चालू केलेल्या दहशतवाद्यांच्या भरतीमुळं. अल-कायदा आणि लष्कर-ए-तैयबासाठी भारतातील संभाव्य दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं सोशल मीडिया नेटवर्कची स्थापना केली आहे असं द प्रिंटनं म्हटलं आहे.

इंटरनेटवर टाकलेल्या एका भाषणात घोरी म्हणतो 

 “भारतात मुस्लिमांचा सन्मान आणि जीवन धोक्यात आले आहे, परंतु मुजाहिदीन या जुलमी लोकांची डोकी उडवण्याच्या तयारीत आहेत. मुस्लिम लवकरच त्यांच्यावर लादण्यात आलेल्या अत्याचाराच्या साखळ्या तोडतील.”

भारतात आज जी हिंदू -मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. रोज दंगलीच्या बातम्या येत आहेत. याचाच फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकं दहशतवादी संघटनांकडे ओढण्याचा घोरीचा प्लॅन असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता घोरी गुप्तचर यंत्रणेच्या पुन्हा रडारवर असणार एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.