ट्विटर आता “X” होणार…

इलॉन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटरचा कारभार हाती घेतला आहे तेव्हापासून ट्विटरमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि आता मोठा बदल होणार आहे तो म्हणजे ट्विटरचा लोगो बदलला आहे. लवकरच ट्विटर च्या ब्ल्यू बर्डच्या जागी X दिसतोय ..

याच्याही पलीकडे जाऊन एक बातमी म्हणजे ट्विटरचा फक्त लोगो नाही तर ट्विटरचं संपूर्ण रिब्रँडिंग होणार आहे. म्हणजेच ट्विटर पूर्णपणे बदलून जाणार. इलॉन मस्क यांनी याबद्दलच्या काही हिंट्स रविवारी ट्विटरवरून दिल्या आहेत.

पण तरीही तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील कि, ट्विटरचं रिब्रँडिंग का होणार आहे? त्यानंतर त्यात काय बदल होतील? या विषयी आपण अजून माहिती घेऊ.

इलॉन मस्क यांनी, “लवकरच आम्ही ट्विटर या ब्रँड ला निरोप देत हळू हळू सगळ्याच पक्षांना निरोप देणार आहोत.” या आशयाचं ट्विट करत, ट्विटरचा लोगो आणि सगळंच बदलण्याचे संकेत दिले आहेत. मस्क यांच्या या निर्णयामुळे आपल्याला पहिला प्रश्न पडतो “का?”.

ट्विटरमध्ये हा बदल का करण्यात येतोय?

इलॉन मस्क कडून तरी याबाबत अजून काहीच सांगण्यात आलेलं नाही तरी, चर्चा अशी आहे की, याबद्दल एक कारण असू शकतं की, थ्रेड. पण थ्रेड येण्यापुर्वीच म्हणजे अगदी ट्विटर विकत घेतानाच इलॉन मस्क यांनी X नावाचं एक सुपर अँप काढण्याची आपली इच्छा बोलून दाखवली होती. पण थ्रेडच्या सोशल मिडियाच्या मार्केट मध्ये येण्याने ही हालचाल झपाट्याने होत असल्याचं दिसत आहे.

मस्क यांनी मध्यंतरी ट्विटरमध्ये असे काही बदल केलेत जे युजर्सना आवडले नाहीत. जसं की, ट्विटर वर येणारे स्पॅम कमी करण्याच्या प्रयत्नात ट्विटरने आपली DM सेटिंग्ज अपडेट केली होती. जी सगळ्यांसाठी अव्हिलेबल नव्हती.

नंतर अचानक ट्विटरचा पक्षी जाऊन त्याजागी एक मिम मधल्या कुत्र्याचा फोटो आला होता. जो Dogecoin या क्रीप्टोकरन्सीच्या सपोर्ट साठी बदलण्यात आला होता. पण त्यामुळे Dogecoinचे शेअर्स घसरले होते.

तिसरं महत्वाचं कारण असू शकतं, संपूर्ण सोशल मेडिया प्लॅटफॉर्मवर एक मोठा बदल घडवून आणणं. कारण इलॉन मस्क यांनी त्यांच्या बिजनेस मध्ये जे काही निर्णय घेतलेत ते त्या त्या क्षेत्रात गेम चेंजर ठरले. जसं की, टेसला कार आणि XAI.

आता आपण जाणून घेऊ की, ट्विटरचा लोगो X का असणार?

खरं तर x.com हे मस्क यांचच डोमेन होतं एवढंच नाही ते त्यांचं स्टार्टअप होतं. ते नंतर त्यांनी बदलून PayPal केलं. पण x.com हे मस्क यांचं स्टार्टअप असल्यामुळे x.com त्यांच्या किती जवळ असेल हे वेगळं सांगायला नको. त्यांच्या स्पेस कंपनीच नाव सुद्धा SpaceX आहे, त्यांच्या AI कंपनीचं नाव XAI आहे.

X.com काय आहे?

आधी सांगितलं त्याप्रमाणे X.com हा इलॉन मस्क यांचाच जुना स्टार्टअप होता. १९९९ मध्ये इलॉन मस्क यांनी x.com ची स्थापना केली होती. याला मस्क एक मायक्रो ब्लॉगिंग साईट बनवणार होते. पण नंतर त्याचं नाव बदलून paypal झालं. आणि २०१७ मध्ये इलॉन मस्क यांनी पुन्हा paypal कडून x.com हे डोमेन विकत घेतलं. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा करार चालू असतानाच सांगितलं होतं की, ट्विटरचा करार झाला की, ते x.com नावाने एक सोशल मिडिया platform काढणार आहे. त्यानंतर काही आठवड्याने ४४ बिलियन डॉलर मध्ये ट्विटर विकत घेतलं. त्यातसुद्धा बरेच वाद झाले पण अखेर ट्विटर इलॉन मस्क यांच्या नावावर झालंच.

ट्विटरचं X झाल्यावर त्यात काय बदल होणार आहेत?

इलॉन मस्क यांना नेहमीच एक सुपर अँप बनवायचं होतं. सुपर app म्हणजे काय तर एकाच app वर तुम्ही सर्व काही करू शकता. याबद्दल ट्विटरची CEO लिंडा याकारीनो यांनी याबद्दल ट्विट करून सांगितलं होतं की, मध्ये मेसेजिंग, ऑडीओ-व्हिडीओ कॉलिंग, बँकिंग हे सगळं असेलंच पण या अँपमधून नवीन कल्पना, सेवा आणि संधींसाठी AI च्या दतीने ग्लोबल मार्केटस्पेस तयार करणार आहे.”

म्हणजेच कॅब सेवा, फूड डिलिवरी, मुव्ही तिकिट्स बुकिंग, गेमिंग असं सगळं तुम्ही X वर करू शकता. तुम्ही चायनाच्या weChat बद्दल ऐकलं असेलंच. Wechat सुद्धा एक सुपर अँप आहे आणि त्यालाच प्रतिस्पर्धी म्हणून इलॉन मस्क X लॉंच करत आहे आणि चायनीज apps भारतात बॅन केलेत त्यामुळे भारतीयांना X ची खरी मजा घेता येईल.

इलॉन मस्कने ट्विटर घेतल्यावर कोणते कोणते बदल झालेत?

  • ट्विटर ताब्यात घेतल्या घेतल्या ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि लीगल हेड विजया गड्डे यांच्यासोबत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.
  • ट्विटरच्या ब्ल्यू टिक साठी ८ डॉलर म्हणजे ६६० रुपये आकारले जाऊ लागले. त्यादरम्यान सगळ्यांचेच ब्ल्यू टिक काढून टाकण्यात आलं होतं.
  • एप्रिल मध्ये मस्क ने ब्ल्यू बर्ड काढून चक्क मिम वाल्या कुत्र्याचा चेहरा ठेवला होता. खरंतर Dogecoin ही एक क्रीप्टोकरन्सी आहे. आणि इलॉन मस्क नेहमीच Dogecoin च्या सपोर्टमध्ये काहीना काही tweet करायचे. तेव्हा Dogecoin च्याच सपोर्टसाठी कुत्र्याच्या चेहऱ्याचा लोगो ठेऊन #Doge हे hashtag ट्रेंड केलं होतं.

माणसाचा मूळ स्वभाव पाहता, कोणतीही नवीन सोशल साईट किंवा सोशल app असो त्याला उत्तम प्रतिसाद हा मिळतोच कारण प्रत्येक माणसाचा अर्ध्याधिक वेळ हा सोशल साईट्स वर जातो. आणि X हे सुपर app असणार असेल तर इतर स्वतंत्र apps च्या युजर्सच्या संख्येत काय फरक पडतो हे भविष्यात कळेलच. पण अद्यापतरी ट्विटरचा फक्त लोगो बदलण्यात आला आहे आणि संपूर्ण app सुद्धा लवकरच बदलेल असं वाटतंय.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.