नाव- उमेश गोपिनाथ जाधव, काम- शहीद जवानांच्या घरची माती जमा करणे

देशाच्या सीमांवर जवान जीव धोक्यात घालून दिवसरात्र पहारा देतात म्हणून आपण करोडो देशवासी बिनघोर आयुष्य जगू शकतोय हे शाश्वत सत्य आहे. आणि जेव्हा कधी एकदा सैनिक भारत मातेची सेवा करताना शहीद होतो तेव्हा करोडो भारतीय त्यांच्या दुःखात सहभागी होतात. जेव्हा पुलवामा हल्यासारख्या घटना घडतात तेव्हा अक्खा देश दुःखाच्या छायेत लोटला जातो. शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी  कोणी पोस्ट लिहितो, कोणी चित्र काढतो, कोणी दान करतो, कोणी मेणबत्ती पेटवतो किंवा पुष्पहार अर्पण करतो.

अशीच इछा होती बंगळुरूच्या उमेश गोपीनाथ जाधव यांची. मग हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि 3 वर्षांपूर्वी एका प्रदीर्घ प्रवासाला निघाले.

उमेश गोपीनाथ जाधव यांना शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. फार्मसीचे माजी प्राध्यापक आणि संगीतकार उमेश यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘गणवेश न घालता देशासाठी खूप काही करता येते. देशभरात फिरून शहीद जवानांच्या कुटुंबियांशी आणि इतर देशवासीयांशी संवाद साधल्यानंतर मला हेच जाणवलं.

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 14 फेब्रुवारी 2019 रोजी जेव्हा उमेशला पुलवामा हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने शहीदांच्या घरी जाण्याचा, त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा आणि शहीदांच्या घरातील माती गोळा करण्याचा निर्णय घेतला. उमेश जयपूरहून बंगळुरूला परतत असताना त्याला पुलवामा हल्ल्याची माहिती मिळाली. उमेश  यांच्याच शब्दातच सांगायचे तर, ‘त्या बातमीने मला हादरवून सोडले. शहीदांच्या घरांची माती गोळा करण्याचे ठरवले. पुलवामा शहीदांचे स्मारक बांधण्यात आले आहे. मी गोळा केलेली माती आता संरक्षण दलांना दिली जाणार असून दिल्लीत स्मारकही तयार केले जाणार आहे.”

या उदात्त हेतूसाठी उमेश गोपीनाथ जाधव यांनी आपल्या कारमध्ये अक्खा देश पालथा घेतला आहे. या गाडीवर देशभक्तीच्या घोषणा त्यांनी रंगवल्या होत्या. हॉटेलमध्ये द्यायला पैसे कमी असताना उमेश या गाडीतच झोपायचे. उमेश यांनी सांगितले की त्याचा प्रवास प्रायोजित नव्हता. उमेश गोपीनाथ जाधव फक्त पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या घरीच पोहोचले नाहीत. त्यांनी पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, कारगिल युद्ध, उरी हल्ला, पठाकोट हल्ला, ऑपरेशन रक्षक, गलवन संघर्ष आणि नुकत्याच झालेल्या कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातातील शहीदांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

सर्वप्रथम उमेशने मंड्या येथील सीआरपीएफ जवान एच गुरू यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. प्रत्येक हुतात्म्याच्या घरी जाणे शक्य नसून प्रत्येक राज्यातील दोन शहीदांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्व घरांची माती कलशात जमा केली, असे त्यांनी सांगितले.उमेश फील्ड मार्शल, जनरल केएम करिअप्पा आणि जनरल सॅम माणेकशॉ हे देखील 26/11 शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या घरी देखील गेले आहेत. उमेशचे यांचें मित्र आता आपल्या मित्राच्या कामगिरीवर शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या संमतीने त्यांच्या प्रवासावर एक माहितीपट बनवण्याचा विचार करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.