मायावतींचा पक्ष जाहीरनामाच प्रसिद्ध करत नाही कारण यांचा पॅटर्नच वेगळाय

युपीच्या निवडणूका जवळ आल्या आणि सर्व राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेशाचं विकासाचं मॉडेल समोर ठेवत आश्वासनांच्या ओझ्याने भरलेले त्यांचे आकर्षक जाहीरनामे प्रसिद्ध केले….

भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, काँग्रेस, आप ने देखील आपले आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले. मतदारांना भुरळ पाडणाऱ्या आकर्षक जाहीरनाम्याला प्रत्येक पक्षांनी लोककल्याण, संकल्प पत्र अशी भारदस्त नावं दिली. कुणी स्वस्त जेवणाच्या कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली तर कुणी दरवर्षी २० लाख तरुणांना रोजगार मिळवून देऊ अशी घोषणा केली. कुण्या पक्षाने स्त्रियांना मोफत स्कुटी वाटण्याचे आश्वासन दिले तर कुणी मोफत लॅपटॉप, टॅब वाटण्याचे आश्वासन दिले. 

आता या सर्वांची जाहीरनामे आणि आश्वासनांचा पाऊस पाहता या आश्वासनांच्या जोरावर येत्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे.  सत्ता कुणाची का येईना पण जाहीरनाम्यात दिलेले आश्वासने पूर्ण होतील कि नाही याबाबत खरं तर युपीच्या नागरिकांनी बोललं पाहिजे….असो तर आता प्रश्न असा समोर येतोय कि,

आता तुम्ही म्हणाल कि, सर्व राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्याबाबत आपण बोललो पण यात मायावतींचा पक्ष कुठे आहे? तर असं समजतंय कि, बसपा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही. याआधी च्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत बसपा ने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला नव्हता.

पण का ???

सर्व प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आले मात्र मायावती यांनी त्यांच्या बसपा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबत मायावती सांगतात की, त्यांचा पक्ष इतर राजकीय पक्षांप्रमाणे निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही कारण त्यांचा ‘मोठे दावे करण्यापेक्षा सत्तेत आल्यावर कृती करण्यावर’ जास्त विश्वास आहे….

अलीकडेच युपीच्या निवडणुकीचे जाहीरनामे प्रसिद्ध होताच मायावतींनी टीकास्त्र सोडले. मायावती म्हणाल्या की प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या पुढे जाऊन आम्ही तळागाळात जाऊन काम करण्यास प्राधान्य देतो. तसेच असंही प्रतिस्पर्धी पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यातील ५० टक्के देखील आश्वासने पूर्ण करीत नाहीत. असा आरोप त्यांनी केला.

मायावतींचा पक्ष जाहीरनामा तयार करत नाही मात्र फोल्डर तयार करते ज्यामध्ये मागील कार्यकाळात पक्षाने कोणती विकासाची कामे मार्गी लावलीत…थोडक्यात मायावतींच्या पॅटर्नच वेगळाय.

जरी मायावती यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला नसला तरी त्यांचा पक्ष केलेल्या कामगिरींचे फोल्डर जनतेसमोर ठेवते….२०२२ च्या निवडणुकीत त्यांनी असेच फोल्डर तयार केले आहे.

बसपाच्या चार सरकारच्या कार्यकाळातील म्हणजे  १९९५, १९९७, २००२ आणि २००७ मधील  कामगिरीचे फोल्डर प्रसिद्ध करताना मायावती म्हणाल्या की, पक्षाने आपल्या सरकारांनी सुरू केलेल्या विकास आणि कल्याणकारी योजनांची लोकांना आठवण करून देण्यासाठी हे फोल्डर तयार केले आहे. भाजप सरकार आपली खोटी आश्वासने आणि जाहिरातींच्या माध्यमातून केवळ कागदापुरतेच मर्यादित प्रकल्प दाखवत आहे, तर बसपाने तळागाळातील लोकांसाठी काम केले आहे, असे त्या म्हणाल्या.

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी मागील वर्षीच एका कार्यक्रमाद्वारे सांगितलं कि, उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेने कुणाला मत द्यायचे कुणाला नाही हे ठरवतांना आपल्या बसपा पक्षाच्या जुन्या कामगिरीची दखल घेतली पाहिजे. जर का जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिलं तर आम्ही सत्तेत येऊ…पण हे शक्य तेंव्हाच आहे जेंव्हा उत्तर प्रदेशातील लोकांकडे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करण्याची ताकद असेल तरच…तरच जनता आम्हाला संधी देईल आणि मगच  आम्ही सत्तेवर आल्यावर राज्याचा सर्वांगीण विकास करू.

इतकंच नाही तर त्याचदरम्यान त्यांनी असाही दावा केला होता की, आम्ही सत्तेवर आलो तर उत्तर प्रदेशमध्ये समाजातील सर्व घटकांना जीवनाची, मालमत्तेची सुरक्षा हमी दिली जाईल आणि विश्वासाचे – कायद्याचे राज्य प्रस्थापित करू, राज्याला जातीयवादापासून मुक्त करू….तसेच  ‘प्रबळ इच्छाशक्ती’ने चांगले काम सुरू ठेवण्याचे आश्वासन बसपाने दिले आहे.

तसेच बसपा सत्तेत असतांना राज्यात प्रथमच लखनौ आणि नोएडा येथे सर्व समाजातील सर्व समाज सुधारकांचे स्मारके उभारल्याचे दाखले दिले होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या स्मरणार्थ भव्य स्मारके, उद्याने आणि इमारती बांधण्यात आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले होते. तसेच त्यांनी ही कामे आता पूर्ण झाली आहेत आणि भविष्यात पक्षाचे सरकार आल्यास सर्व स्तरावर विकासकामांच्या जोरावर राज्याचे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. सलग चार टर्म सत्तेत असतांना आपण राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी असंख्य ऐतिहासिक आणि महत्त्वाची कामे केल्याचा दावा त्यांनी केला.

जाहीरमा नसेल तरी त्यांनी त्यांनी वर केलेले सगळे दावे त्यांनी २०२१ सालाच्या नोव्हेंबर महिन्यात केलेत….

दरम्यान मायावती म्हणाल्या होत्या कि, “जेव्हा पुन्हा आमचे सरकार येईल, तेव्हा आम्ही राज्याच्या विकासासाठी आणि गरीब, मजूर, छोटे व्यापारी, वकील, कर्मचारी, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांच्या कल्याणासाठी काम करू. राज्यातील सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघातील गावपातळीपर्यंतच्या लोकांना फोल्डर दिले जातील, असे बसपा प्रमुख म्हणाले होते.

२००७ ते २०१२ पर्यंत बसपाने राज्यात एकहाती बहुमताचे सरकार चालवले, परंतु २०१२ मध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाले.

तसेच त्यादरम्यान त्यांनी दावा केलेला कि, “राज्याला जातीय आणि जातीय हिंसाचार, तणाव, दंगली आणि भीतीपासून मुक्त करण्याचे श्रेय बसपा सरकारला जाते.”

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.