हनीट्रॅपमध्ये गुतलेल्या कॅप्टनने भारताच्या गगनशक्तीचे सिक्रेट पेपर्स पाकला दिले होते

दोनच दिवसांपूर्वीची घटना आहे. हनी ट्रॅप ची. कोची मध्ये हनी ट्रॅप प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून चिक्कमगलुरू पोलिसांनी सहा महिलांसह १३ जणांना अटक केली. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून सार्वजनिक ठिकाणी आपली प्रतिमा डागाळण्याची धमकी देऊन आरोपीने एका व्यक्तीकडून पैसे उकळले होते…आता हि घटना तुम्हाला वरवर साधारण फसवणुकीची घटना वाटू शकते पण हा हनी ट्रॅप प्रकरण वाटतं तितकं सोप्प नाहीये…भले भले यात फसले गेले अन फसवले गेलेत…त्यांची उदाहरणं आता इथे घ्यायला नकोच.

पण हनी ट्रॅप ची भानगड नक्की काय ? नक्की असे प्रकरणं होण्यामागे काय कारण असतात ?

हनी ट्रॅप ही अलीकडच्या काळात सर्रास वापरली जाणारा शब्द आहे. भले भले मोठे राजकीय नेते असोत वा  सैन्यातील अधिकारी असोत, ‘रॉ’चे अधिकारी असोत, आयएएस कि आयपीएस अधिकारी असोत. अनेक जण अशा हनी ट्रॅप मध्ये गुतले होते. पण या हनीट्रॅपमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे  लष्कराचे जवान जाळ्यात अडकवले जातात.

हनी ट्रॅपचा उद्देश म्हणजे गंभीर प्रकरण असतंय.

आजच्या युगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे डेटा म्हणजेच माहिती. आणि जेंव्हा प्रश्न त्या माहितीच्या  सुरक्षिततेचा येतो तेंव्हा गोपनीयता ही आलीच.आणि जेंव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेंव्हा युद्ध, लढाया आल्याच. जगातील प्रत्येक देश आपल्या शत्रूला पराभूत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. 

पण कोणतेही युद्ध हे सरळ मार्गी होतंच नाही. प्रत्येक वेळी फक्त रणांगणावरच पराभव होतो असे नाही. यात जमेची बाजू ठरते समोरच्या देशाची अंतर्गत गोपनीय माहिती मिळवणे. बुद्धिमत्तेच्या पद्धतींनीही शत्रूचा पराभव केला जातो. या बुद्धिमत्तेच्या खेळात मोठी भूमिका बजावते – हनीट्रॅप.

कसं ? तर ट्रॅप म्हणजेच सापळा रचून..नावाप्रमाणेच इतका गोड सापळा असतो कि माणूस त्यात अडकतोच अडकतो. 

दिसायला सुंदर, आकर्षक महिला एजंट ठरवून महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या सौंदर्याने प्रेमात पडतात, संबंध ठेवतात थोडक्यात अशा प्रकारच्या जाळ्यात अडकवतात. आणि त्यांच्याकडून माहिती काढून घेतात. या सापळ्यात अडकलेल्याला व्यक्तीला कळत पण नाही कि, आपण कुठे फसलो आणि आपला काहीतरी गंभीर षडयंत्राचा भाग बनलोत आणि यात आपला बळी याची देखील त्यांना कल्पना नसते.

यात अग्रेसर असलेली पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI अनेकदा भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाशी संबंधित लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. 

तस तर आत्तापर्यंतचा ट्रेंड बघितला तर, लष्कराशी संबंधित लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून गोवले जात असल्याचे कळते. समोर बोलत असलेली मुलगी खरंतर मुलगीच असेल असं नाही. कधीकधी पुरुष एजंट स्त्रीचा आवाज काढून बोलतात. यासाठी फेक प्रोफाईल तयार केले जातात.

हे सगळं इतकं खरं खुरं वाटायला लागते कि, होत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. लष्कराशी निगडित लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाणही केली जाते आणि व्हॉट्सअॅपसारख्या मीडियाद्वारे चॅटिंगही केले जाते. या प्रकारादरम्यान चॅटिंग, इंटिमेट फोटोज, पर्सनल सिक्रेट्स कळतात, या सगळ्या माहितीद्वारे त्या गोवलेल्या ट्रॅप केलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं.

अनेक वेळा ती स्वत:ला परदेशी असल्याचे सांगते.अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, ती मुलगी स्वत:ला युरोपीय देश किंवा अमेरिका असल्याचे सांगते. अनेक वेळा मुलगी स्वत:ला वर्तमानपत्र किंवा मासिकाशी संबंधित असल्याचे सांगतात. त्या बदल्यात या ट्रॅपमधल्या लोकांना चांगले पैसे दिले जातात. त्यांच्या याच ट्रॅप त्यांच्याकडून करून घेतली जातात जसं कि, भारताच्या लष्करी प्रतिष्ठानांची फोटोज शेअर करणे, काही लष्करी योजनांबद्दल माहिती घेणे अशी देखील कामे त्यात असतात. 

२०१८ च्या दरम्यान असंच एक प्रकरण घडलं होतं..

या प्रकरणात हवाई दलातील अरुण मारवाह यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून बरीच माहिती मिळवली गेली होती. सहसा अशी माहिती दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरली जाते. माहिती काय आहे आणि किती गोपनीय आहे यावर शत्रू माहितीचा वापर कसा करेल हे अवलंबून असते.

तर जेंव्हा हे प्रकरण समोर आलं तेंव्हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ला भारताच्या लष्कराची गुप्तचर माहिती दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २०१८ मध्ये भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह याला अटक केली होती. कॅप्टन अरुण मारवाह यांनि त्यांच्या फोनमधून भारतीय हवाई दलाच्या गुप्त कागदपत्रांचे फोटो व्हॉट्सअॅपवरून पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. जेंव्हा त्यांच्यासंबंधित संशयास्पद हालचाली लक्षात आल्या तेंव्हा त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि नंतर तपासादरम्यान हा धक्कादायक ट्रॅप समोर आला होता. 

फेसबुकच्या माध्यमातून मारवाहला आयएसआयने हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. स्वत:ला मॉडेल दाखवून आयएसआय एजंट मारवाह यांच्याशी बोलायची. आठवडाभर त्यांच्या चॅटिंग नंतर मारवाहला हवाई दलाशी संबंधित कागदपत्रे शेअर करण्यास सांगण्यात आले. गगन शक्ती ही अशी कसरत देखील कॅप्टनने आयएसआयला कळवली होती. 

Gagan Shakti 2018: All about IAF's biggest combat drill | Economic Times - YouTube

पण मारवाह याने पैशांच्या लालसेपोटी हि माहिती दिली नव्हती तर, त्यांच्या पर्सनल गोष्टींच्या गोपनीयतेची बदल्यात माहिती शेअर करत असे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आयएसआयला पुरवलेल्या मारवाहने पाक गुप्तचर संस्थांना दिलेल्या कागदपत्रांमध्ये प्रशिक्षण आणि युद्धाशी संबंधित सरावाचा समावेश आहे.

आजही अशा हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना गुप्तहेर म्हणूनच ओळखलं जातं. अनेक बातम्यांमध्ये अशा अधिकाऱ्यांची नावं आरोपी म्हणून येतच राहते….

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.