योगी म्हणतायत सत्तेत आलो तर लसीसारखंच महिन्यातून दोन वेळा फ्री राशन देईन

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष नवनवीन घोषणा करत आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सगळंच फ्री देऊ म्हणतायत. सध्यातरी अन्नावरच बोलू. अन्नासाठी दाही दिशा वणवण करणाऱ्या यूपीतल्या नागरिकांना आता जेवणाचं प्रलोभन दाखवलं जातंय.

विशेषतः समाजवादी पक्ष आणि भाजपा यांची जनतेला फुकटच्या गोष्टीची प्रलोभन दाखवण्यात स्पर्धा लागलेय.

यूपीमधील निवडणुकीपूर्वी  एका सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी लोकांना म्हटलेत  की त्यांचे सरकार आल्यास ते प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला दोन डोस रेशन पुरवतील.

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘डबल डोस लसीप्रमाणेच भाजप दर महिन्याला तुम्हाला दुप्पट डोस रेशन मोफत देईल.’

त्याच सभेत लसीकरणावर बोलताना योगी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली करोडो लोकांच्या मोफत लसीकरण, मोफत चाचणी करण्यात आली. ‘ज्यांनी लसीबाबत तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि ही भाजपची लस असल्याचे सांगून तुम्हाला रोखले, मग तुम्ही त्यांना सांगा की ही भाजपची लस असल्याने तुम्ही भाजपलाच मतदान कराल.’ अखिलेश यादव यांच्या भाजपाची लस असल्यानं मी घेणार नाही या वक्त्यव्याचा योगींनी शेलक्या शब्दात समाचार घेतला.

त्यामुळं लसीकरण आणि राशन या करून काळात चाललेल्या दोन योजनांची जनतेला पुन्हा आठवण करून देत त्यांनी मतदारांना साद घातली.

बाकी फ्री रेशनच्या घोषणेची चर्चा मात्र दिवसभर जोरात चालली.

मात्र या योजनेला दुसरा अँगल आहे अखिलेश यांच्या घोषणांचा आणि त्यांनी केलेल्या टीकेचा. योगींच्या या घोषणेच्या आधी काही दिवस अखिलेश यादव यांनी फ्री मध्ये देण्यात येणाऱ्या घोषणांचा पाढाच वाचला होता.

“समाजवादी पक्ष सरकार उत्तर प्रदेशमध्ये आल्‍यास दाहा रुपयांत समाजवादी थाळी देऊ”

आशी घोषणा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याआधी केली होती.याशिवाय ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली  ज्येष्ठ नागरिकांसाठी समाजवादी पेन्शन या योजनाही अखिलेश यांनी जाहीर केल्या होत्या. 

‘भाजपने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भाजपला शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाकावे लागले आणि कृषी कायदे परत घ्यावे लागले. शेतकऱ्यांचा भावना भाजपला समजत नसल्याची टीका त्यांनी केली. देशातील ८० कोटी लोकांना अन्नधान्य देत असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे, परंतु ८० कोटी लोकांना बेरोजगार केले, हे ते का सांगत नाहीत”असा सवाल अखिलेश यांनी यावेळी उपस्थित केला होता.

आता यामुळं लोकांना फ्री मध्ये देण्यात येणाऱ्या वस्तूंच्या घोषणांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. यामुळं लोकांचे आरोग्य, शिक्षणासारख्या महत्वाच्या गोष्टी मागे राहतात आणि लोकं या त्यांच्याच टॅक्सच्या पैशांच्या फ्रीच्या घोषणांच्या मागे लागतात.  बाकी या घोषणांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते खाली कंमेंट करून सांगा.  

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.