व्हाट्सऍपच्या नव्या फिचरमुळे, अब पैसा हि पैसा होगा !

धंदा नहीं, एक स्कीम है, अमिरों की स्कीम हमारे हात लगी है! पच्चीस दिनों में पैसा डबल…अब पैसा ही पैसा होगा…!!!

अहो भिडूनों खरचं…नवी स्कीम आलीय..व्हॉट्सऍप वापरता ना ? तर १०० टक्के स्कीम खरी आहे.

व्हॉट्सऍप मागच्या बऱ्याच महिन्यांपासन आपल्या पेमेंट सर्व्हिसची चाचणी घेतय. जे व्हॉट्सऍपच्या अँड्रॉइड व्हॉट्सऍपच बीटा व्हर्जिन वापरतात, त्यांच्यासाठी ही यूपीआय-बेस्ड पेमेंट सर्व्हिस मागच्या बऱ्याच दिवसांपासून लाइव्ह आहे.

आता यात विशेष काय आहे असं म्हणाल ? तर रुको जरा सब्र करो, और आगे पढो..

ऐन सणासुदीच्या काळात व्हॉट्सऍपने लोकांना आपल्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर यावं म्हणून कॅशबॅक द्यायला सुरु केलंय. लोकांना व्हॉट्सऍप पेमेंटद्वारे प्रत्येक ट्रान्सफरवर पूर्ण ५१ रुपये मिळवण्याची संधी आहे. कस्स…तर एकदम इन्शटन्ट.. पण त्यासाठी जुगाड पण करायला लागणारे भिडू.

काय आहे हा जुगाड.. आणि तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून कशाप्रकारे पैसे कमवू शकता ? हे वाचायलाच  पाहिजे.

व्हॉट्सअ‍ॅप वरून पैसे पाठवण्‍यासाठी किंवा मिळवण्यासाठी, तुम्‍ही पहिल्यांदा तुमच व्हॉट्सअ‍ॅप UPI प्रोफाईल सुरु करायला पाहिजे. म्हणजे काय ? तर तुम्हाला तुमच बँक अकाउंट या व्हॉट्सअ‍ॅप UPI ला लिंक कराव लागेल. हे कसं करायचं ? तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज टाईप करायचा, तिथे एक रुपयाचं ₹ चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून, पुढची प्रोसेस फॉलो करून UPI ​​प्रोफाइल क्रिएट करायचं. ही प्रोसेस बाकीचे जे पेमेंट अ‍ॅप आहेत अगदी त्यांच्या सारखीच आहे.

आता ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही कोणत्याही युजरला पैसे पाठवू शकता. पण पैसे फक्त त्याच  व्यक्तीला पाठवले जाऊ शकतात ज्याच स्वतःच पण व्हॉट्सअ‍ॅप UPI प्रोफाईल असेल. आणि ते त्याच्या बँकेशी लिंक केल असेल.

आता युजर निवड, पैसे पाठवा आणि तिथून तुमच्या अकाऊंट मध्ये ५१ रुपये रिफंड मिळवा.

आता यात भारी काय माहिताय का ?

तर कॅशबॅक मिळवण्यासाठी ट्रान्सफर होणाऱ्या फंडवर कोणतही लिमिट नाही. म्हणजे जर तुम्ही फक्त रुपाया जरी ट्रान्सफर केला तरीसुद्धा ५१ रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

आता लगीच हरखून टुम्म होऊ नगासा..

कारण त्यातही काही अटी आणि नियम आहेत. कॅशबॅक फक्त पाच वेळाच मिळवता येतो. म्हणजे तुमच्या खात्यात जास्तीत जास्त २५५ रुपये कॅशबॅक रिफंड होऊ शकतो. आणि यासाठी किमान एक-एक रुपया पाच वेळा ट्रान्सफर करावा लागेल.

लक्षात ठेवा!

ही UPI आधारित सर्व्हिस आहे. म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे एक्सचेंज केले जातील, ते वॉलेट नाही. तुम्ही तुमच बँक अकाऊंट लिंक केलं तरचं तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल. तुम्ही मोबाईल नंबरवर पैसे पाठवू शकता, त्यानंतर नंबर अकाऊंटशी पण लिंक असला पाहिजे. तुम्हाला एक QR कोड देखील मिळेल, जो स्कॅन करून तुम्ही पैसे देखील घेऊ शकता.

५१ रुपयांची ही ऑफर सध्या फक्त व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी आहे. मग तुमच्या आमच्या सारख्या गरीब अँड्रॉइड युजर्सना ही स्कीम मिळणारे का ?

तर मिलेगा मिलेगा…सबको मिलेगा. हम सब मिल बाट कर खायेंगे जी..सबकी बल्ले बल्ले होगी.

म्हणजे अजून तरी अँड्रॉइड युजर्सला ही स्कीम लागू नाहीये. पण असं म्हणतात सब्र का फल मिठा होता है. अगदी तसंच येणाऱ्या काही दिवसांत ही स्कीम अँड्रॉइड युजर्ससाठी पण सुरु होईल.  कारण पर्याय नाही ओ व्हॉट्सअ‍ॅपला. कारण यांची सरळ सरळ टक्कर Google Pay आणि Phonepe शी आहे.

तस ही Google Pay आणि Phonepe सगळ्या अँड्रॉइड फोन मध्ये चालत. आणि हे दोन्ही ही ऍप पैसे ट्रान्सफर केले रे केले की रिवॉर्ड देतात. त्यामुळं व्हॉट्सअ‍ॅपनं त्यांची ही स्कीम जर अँड्रॉइड युजर्ससाठी नाही ना लागू केली तर डायरेक्ट कोलतील अँड्रॉइड युजर्स व्हॉट्सअ‍ॅपला…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.