२१ दिवसात ॲमेझॉन आणि नेटफ्लिकसवरचे हे २१ पिक्चर बघून काढा.

२१ दिवसात काय करायचं. बोलभिडू असेपर्यन्त लोड घ्यायचा नाय भावानों. मस्तपैकी नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमची मेंबरशिप घ्यायची आणि ताणून द्यायचं.
पण झालय अस की, Netflix आणि ॲमेझॉन वर नक्की काय बघायचं ते कळत नाही. म्हणून ही एकवीस पिक्चरची लिस्ट घेवून आलोय.

नेटफ्लिक्सवरचे पिक्चर.   

थ्रिलर कॅटगरी
१.  The Platform :  
 १०० ते १५० मजल्यांचे एक तुरुंग आहे, प्रत्येक मजला खतरनाक गुन्हेगारांनी भरला आहे. या तुरुंगात गुन्हेगारांना जेवण द्यायची पद्धत मात्र विचित्र आहे. सगळ्यात वरच्या मजल्यावरून लिफ्ट सारख्या प्लॅटफॉर्म वरून जेवण द्यायला सुरुवात करतात, प्रत्येक मजल्यावर ५ मिनिट तो प्लॅटफॉर्म थांबणार ज्याला जमेल तितकं जेवण ओरबडून घ्यायचं.

या पद्धतीमुळे खालच्या मजल्यांवरील लोकांना जेवण मिळणे बंद होत. शेवटी खालच्या मजल्यांवरून एकमेकांना मारून खायला सुरुवात होते. माणसाच्या पोटाचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी तो कोणत्या स्तरावर जाऊ शकतो हे बघायचं असेल तर हा पिक्चर बघा.

२. Gone Girl :  

लग्न झालेल्या किंवा प्रेमात असलेल्या लोकांनी हा पिक्चर आपापल्या जबाबदारीवर बघावा. घरात बसून बसून भांडणे वाढू शकतात. आपल्यावर खूप प्रेम करणारी बायको एकदिवस अचानक गायब झाल्यानंतर तिच्या शोधात असलेल्या नवऱ्याला आपल्या बायकोबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी कळायला लागतात.

कोण चूक कोण बरोबर यापेक्षा हा पिक्चर बघितल्यानंतर माणसातल्या नात्यांच्याबद्दल तुम्ही विचार करायला लागता.

३. Seven
सिरीयल किलर हा सर्वांचा आवडीचा विषय खून कोण करत याचा तपास अशा पिक्चर मध्ये खूप इंटरेस्टिंग असतो. पण Seven मध्ये नेमकं उलट आहे, खुनी कोण आहे यापेक्षा तो का खून करतोय याचा तपास आपल्या अंगावर काटा आणतो.
४. Zodiac
कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी काही गुन्हेगारांचा शोध लागत नाही, अशाच एका अजूनही न उलगडा झालेल्या सत्य घटनेवर आधारित हा पिक्चर बघताना पोलीस तपासातले अनेक महत्वाचे पैलू आपल्याला समजतात.
५. Don’t Breath :
एकटाच राहणाऱ्या अतिश्रीमंत आंधळ्या म्हाताऱ्याच घर कोणत्याही चोरांना चोरी करायला सोपं आहे असं वाटत असेल तर हा पिक्चर बघा मग कळेल कि कोणालाही हलक्यात घेऊन चालत नाही.    

 

टेन्शन फ्रि  कॅटेगरी. 
६. Forrest Gump :

फॉरेस्ट गंप नावाचा मुलगा आपल्या थोड्या वेगळ्या चालण्या-बोलण्यामुळे बऱ्याच जणांचा चेष्टेचा विषय आहे. पण त्याला असलेला आजार, त्याची होत असलेली चेष्टा त्याला आयुष्यात कधी थांबवू शकली नाही. फॉरेस्ट चा आयुष्याचा प्रवास आपल्याला खूप इंस्पायर जातो. (अमेझॉन प्राईम वर सुद्धा उपलब्ध आहे)

७.  Bucket List :

आयुष्यात एकदा का होईना अनुभव घ्यायचा आहे अशा गोष्टींची आपण केलेली यादी म्हणजे ‘बकेट लिस्ट’. आपल्या तरुणपणात ही लिस्ट पूर्ण करायचा सगळेच प्रयत्न करत असतात. पण कॅन्सर ने आजारी असलेले सत्तरीतले दोन म्हातारे आपली ‘बकेट लिस्ट’ बनवतात आणि ती पूर्ण करण्यासाठी दवाखान्यातून पळून जातात.

या दोन म्हाताऱ्यांनी आपल्या स्वप्नांचा केलेला प्रवास आपल्याला आनंद देऊन जातो.

८. As good as it’s get :

जगातील सगळ्या लोकांना शिव्या देणारा, सतत लोकांचा अपमान करणारा एक लेखक ज्याने आपल्या आयुष्यात कधीच कोणाला किंमत दिली नाही. अशा माणसाच्या आयुष्यात फरक कोण पाडतो तर एक कुत्रा.

एका कुत्र्यामुळे या माणसाच्या जीवनात किती सकारात्मक बदल होतात याची स्टोरी म्हणजे हा पिक्चर.

९. The Florida Project

अस म्हणतात की लहान मुलाच्या नजरेतून जग बघितलं तर सगळीकडे आनंदच आहे. The Florida Project हा पिक्चर असंच आपल्याला आजूबाजूचे जग एका ६ वर्षाच्या मुलीच्या नजरेतून दाखवतो जे आपल्याला पण तितकंच आनंदी वाटायला लागत.

रोमॅण्टिक कॅटेगरी

१०. Notting Hill
हॉलिवूड मधली एक सुपरस्टार अभिनेत्री  आणि लंडन मधला एक साधा पुस्तक दुकानदार. प्रेम कोणावरही होऊ शकत याचा अनुभव देणारी ही लव्ह स्टोरी (अमेझॉन प्राईम वर सुद्धा उपलब्ध आहे)
११. Her
आपल्या दैनंदिन आयुष्यातला जास्तीत जास्त भाग आज टेक्नॉलॉजीने व्यापून टाकला आहे. पण भविष्यात मानवी नातेसंबंध सुध्दा आपण टेक्नॉलॉजी मध्येच शोधायाची वेळ आपल्यावर येऊ शकते.
एका ऑपरेटिंग सिस्टीम च्या प्रेमात पडणाऱ्या माणसाची स्टोरी म्हणजेच ‘Her’.
१२. The Notebook
गरीब हिरो – श्रीमंत हिरोइन आणि त्यांच्या प्रेमाला घरांच्याचा विरोध. टिपिकल बॉलिवूड पिक्चर ची स्टोरी वाटत असली तरी, आपलं प्रेम मिळवण्यासाठी प्रत्येक पातळीवर करावा लागणारा संघर्ष ‘The Notebook’ मध्ये परिणामकारक पध्दतीने दाखवला आहे.
१३. Before Sunrise
एका अनोळख्या शहरात पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीवर एका दिवसात प्रेम होऊ शकत का?  Before Sunrise पिक्चर बघा, प्रेमाबद्दलच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
१४. Monty Python and The Holy Grail
७० च्या दशकात बनलेला हा पिक्चर आजसुद्धा जगातला सर्वात कॉमेडी पिक्चर समजला जातो. होली ग्रेल च्या शोधात बाहेर पडलेल्या सैनिकांचा प्रवास या पिक्चर मध्ये दाखवला आहे.

अमेझॉन प्राईमवरचे पिक्चर 

थ्रिलर

१५. Trapped

पुढचे २१ दिवस आपल्याला घरात बसावं लागणार आहे, शक्य असूनसुद्धा आपण बाहेर पडू शकत नाही. पण विचार करा जर एका छोट्या चुकीमुळे तुम्ही तुमच्याच घरात अडकला आणि बाहेर पडू शकला नाही.

समोर माणसे दिसत असूनसुद्धा तुमच्या मदतीला कोणीही येत नाही. माणसांनी भरलेल्या शहरात देखील तुम्ही किती हतबल होऊ शकता हे दाखवणारा पिक्चर.

१६. Orphan

एक जोडपं अनथाश्रमातून नऊ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतात, तिला एक चांगलं आयुष्य देण्याचा निर्णय घेतात. पण निरागस, गोड वाटणारी मुलगीच जेंव्हा या जोडप्याच्या जीवावर उठते त्यानंतर घडणारा थरार म्हणजेच Orphan हा पिक्चर.

टेन्शन फ्री कॅटेगरी
१७. Cast Away
कोणाला हा पिक्चर इमोशनल ड्रामा वाटेल, कोणाला हा पिक्चर माणसाने जगण्यासाठी केलेला संघर्ष वाटेल. फेडेक्स कंपनीत काम करणारा माणूस विमान अपघातात वाचून एका निर्जन बेटावर अडकतो. तब्बल ४ वर्षानंतर तो या बेटावरून सुखरूप बाहेर पडतो.
पण मधल्या या ४ वर्षाच्या काळात या बेटावर टिकून राहणं, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि शेवटी या प्रयत्नांना आलेले यश आपल्याला फिल गुड अस फिलिंग देऊन जात.
(Netflix वर सुध्दा उपलब्ध आहे)
रोमॅण्टिक

१८. Bridget Jones Diery

आपलं प्रेमाचं वय गेलं किंवा आता आपल्याला कोण भेटूच शकत नाही अस वाटत असेल तर हा पिक्चर बघा, यानंतर कोण भेटेल अस नाही पण थोडा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल.

१९. Love and the other drugs

कोणत्याही रिलेशन कडे सिरियस न बघणारा मेडिकल M.R. आपल्याच एका पेशंट च्या प्रेमात पडल्यानंतर त्याचा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलत याची स्टोरी सांगणारा हा पिक्चर.

२०. Bad Neighbors

शांततेत रहायच स्वप्न बघणाऱ्या जोडप्याला शेजारी भेटतात फक्त पार्टी करण्यासाठी जगणारी बॅचलर पोरं. या सिच्युएशन नंतर होणारी धमाल या पिक्चर मध्येच बघा.

२१. Ted

तुमच्यासाठी भांडण करणारा, तुमच्याबर पार्ट्या करणारा गरज लागली तर शिव्या देणारा तुमचा मित्र फरक एवढाच आहे की हा मित्र म्हणजे एक टेडी बेअर आहे. थोडा डबल मिनींग जोक असलेला पिक्चर आहे पण धमाल आहे.

  • महेश जाधव. 
1 Comment
  1. Vaibhav says

    लय भारी काम केलं राव

Leave A Reply

Your email address will not be published.