हिंदू धर्माचे घनघोर पालन करण्यासाठी ज्युलिया रॉबर्ट्स नवरात्रीत घट बसवते, उपास देखील करते..

जगभरात विविध धर्म आहे. धर्माच्या नावावर भांडणं करणारे , धर्मावरून कत्तली करणारे लोकं सुद्धा बरेच आहेत. अनेकदा हिंदू धर्मावर टीका करणारे लोकसुद्धा पुरतं ओळखून आहेत की हिंदू धर्म हा प्राचीन धर्म आहे. अनेक वैज्ञानिक सुद्धा मानतात की गीतेमध्ये भरपूर पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. गीतेतील ज्ञान हे खरं आहे. फॉरेनर जर भारतात आले तर भारतीय संस्कृती प्रमाणे त्यांचं स्वागत केल्याने ते सुद्धा हिंदू धर्माकडे आस्थेने बघतात. हेच कारण आहे की अनेक लोक भारतातले धार्मिक ठिकाणं आणि गोष्टी बघून हिंदू धर्माकडे आकर्षित होतात.

आता हिंदू धर्माचा विषय काढलाय तो यासाठी की हॉलिवूड चे सेलिब्रिटी लोकसुद्धा हिंदू धर्म स्वीकारून बसलेले आहेत आणि हा धर्म त्यांना आत्मिक शांतता देतो असं त्यांनी सांगितले आहे. तर आपण जाणून घेऊया हॉलिवूडच्या टॉप हिरोईनपैकी एक असलेली जुलिया रॉबर्टने हिंदू धर्म स्वीकारला त्याची गोष्ट.

ती फक्त हिंदूच नाही बनली तर मोठ्या उत्साहात ती शाकाहारीसुद्धा बनली.

हॉलिवूड ऍक्टरेस जुलिया रॉबर्टने काही वर्षांपूर्वी हिंदू धर्म स्वीकारला होता. अगोदरचा ख्रिश्चन धर्म त्यागून जुलिया रॉबर्टने हिंदू धर्म स्वीकारला याचा खुलासा तिने 2010 मधेच केला होता. जुलिया हिंदू धर्मावर आणि परंपरेवर भरपूर विश्वास ठेवते. हिंदू धर्मातले जितके काही सण आहेत ते मोठ्या उत्साहात ती आपल्या घरी साजरे करते. ती नवरात्रीचे उपवास तर धरतेच शिवाय घरात देवीचा घट स्थापन करून पूजाही करते. सोशल मीडियावर याचे तिने फोटोही पोस्ट केले होते. एवढंच नाही तर ती आपल्या मुलांचं मुंडन करण्यासाठी भारतातही आली होती.

जुलिया रॉबर्टला योगाचं नॉलेज बरंच आहे आणि तीची इच्छा आहे की रिटायर झाल्यावर ती भारतात येऊन संन्यासी बनणार आहे. शाकाहारी जेवण ती घेते आणि तिला भारतीय पोशाख परिधान करणे प्रचंड आवडते. आता जुलिया रॉबर्ट्स भारतात कधी आली होती तर इट प्रे अँड लव्ह या सिनेमाच्या शुटींग साठी ती भारतात आली होती.

हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर जुलिया रॉबर्टला भावना विचारण्यात आल्या होत्या तेव्हा ती म्हणाली होती की,

मी आता पूर्णपणे हिंदू धर्माचं पालन करत आहे. माझं कुटुंब आणि काही मित्रांमुळे माझं वैयक्तिक जीवन खूपच खराब झालं होतं. पुढचा जन्म हा मला शांत आणि समर्थपणे घालवायचा आहे म्हणून मी हिंदू धर्म स्वीकारला…

हॉलीवूडची सुपरहिट फिल्म प्रेटी वुमन मध्ये आपल्या अभिनयाने जगभरात पोहचलेली जुलिया रॉबर्टने हिंदू धर्म स्वीकारल्याने भारतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.