कस असतय रिकाम्या जागा भरणारी काही माणसं असतात, केके त्यात टॉपचा माणूस होता..

‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही’ या गाण्यानं सबंध प्रेमवीरांचं दुखः सलमान भाईच्या डोळ्यातून दाखवलं होतं त्यानं दाखवलं होतं. कृष्णकुमार कोन्नत म्हणजे केके.

१९९९ ते २०१० या काळातला तरुणाईचा आवाज म्हणून केके प्रसिद्ध होता. हम दिल दे चुके सनम मधल्या गाण्यांमुळे तो मातब्बर गायकांच्या रांगेत जाऊन बसला. ह्या गाण्याने यशाच्या अनेक परिसीमा गाठल्या. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम या गाण्यास मिळालं.

पण हे सगळ काही एका रात्रीत मिळालेलं यश नव्हतं.

एका मल्याळी कुटुंबात जन्मलेला केके आईकडून संगीताचे धडे गिरवू लागला. संगीताच कुठलही प्रशिक्षण न घेता तो आवड जोपासत राहीला. शाळेत गाणी गाणे,प्रोग्राम करणे ह्याचा त्याला भयंकर नाद होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना त्याने हॉटेलमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून देखील काम केलं.

गाण्याची आवड त्याला १९९४ ला मुंबईत घेऊन आली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक हरिहरन सोबत आणि त्यांच्याकरवी बर्याच मोठ्या लोकांशी त्याची ओळख झाली. युटीव्हीतर्फे त्याला एका जाहिरातीसाठी जिंगल गाण्याची ऑफर आली आणि तिथून त्याने मागे वळून बघितल नाही. तिथून पुढे त्याने जवळपास बारा वेगवेगळ्या भाषांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक जिंगल्स त्याने गायल्या.

टेलिव्हिजनच्या अनेक मालिकांची शीर्षक गीते त्याने गायली. त्यात प्रामुख्याने शाका लाका बूम बूम ,जस्ट मोहोब्बत ,हिप हिप हुर्रे इत्यादी आहेत. १९९९च्या क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या समर्थनार्थ एक गाणं गायलं होत. सर्वोत्कृष्ट युवा गायक पदार्पणच्या यादीत तो अव्वल होता.

१९९९ च्या सुमारास त्याचा पल हा अल्बम आला आणि त्याने प्रसिद्धीचा कळस गाठला. त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सोलो अल्बमचा पुरस्कार केकेला मिळाला.

युथमध्ये केकेची झिंग इतर गायकांपेक्षा वरचढचं होती. गायक किशोर कुमार,नेसली लेविस आणि संगीतकार आर डी बर्मनला तो गुरुस्थानी मानतो. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी माचीस या चित्रपटातील छोड आये हम वो गलीया हे केकेचं डेब्यू गाणं गाऊन घेतलं होतं. खुद्द रेहमानने त्याच्या विषयी उद्गार काढले होते. तो म्हणाला होता,

मागील दहा वर्षात इतक्या उंच पट्टीत आणि भावपूर्ण गाणारा गायक मी पहिल्यांदाच बघतो आहे.

पुढील काळात त्याचा आवाज परफेक्ट बसला तो इम्रान हश्मीसाठी.

संगीतकार प्रीतम सोबत त्याने बरीच हिट गाणी इंडस्ट्रीला दिली ह्यात वादच नाही. अगदीच काळजाला हात घालणारा आवाज म्हणून केकेकडे पाहू लागल गेल. ओम शांती ओम मधील आंखो मी तेरी हे गाण अजूनही कित्येक जण लूप मोड वर ऐकतात. खुदा जाने, तुही मेरी शब हे,सच केह रहा हे दिवाना सारखी अनेक गाणी त्याची प्रेक्षकांच्या अगदी जवळची आहेत.

त्याचा आवाज म्हणजे प्रेमात नसलेल्या माणसाला देखील प्रेमात पडल्याचा भास करून देतो.

एखाद्या रीएलीटी शो चा जज व्हायला आवडेल का विचारल्यावर तो म्हणायचा की

तिथ तुमची स्वतची मते नसतात, तुम्हाला एका कक्षेत अडकवल जात म्हणून रीएलीटी शो नको.

नंतर अचानकपणे त्याच्या वाट्याची गाणी प्रसिद्ध पाकिस्तानी प्रथितयश गायकांना मिळू लागली आणि केके हळूहळू प्रेक्षकांच्या स्मरणातून गेला.

त्यानंतर तो दिसला थेट बातम्यात. त्याचं निधन झालेलं बातमी आली. त्यानंतर त्याची गाणी लावली अन् झोपून गेलो. कसय भिडू जगात सगळी माणसं लय भारी असतात नायतर लय बाद असतात अस नसतय, काही माणसं तुमचे आयुष्याचे रिकामे कप्पे भरत राहतात, केके त्यातलाच एक होता…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.