बॉर्डरचा मथुरादास म्हणून शिव्या खाणारा सुदेश बेरी सुरागमुळे घराघरात पोहचला..

बॉर्डर हा सिनेमा प्रत्येक भारतीयाच्या काळजाचा विषय. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांसारख्या दिग्गज लोकांनी या सिनेमात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. पण यात एक अजून हिरो होता तो म्हणजे सुदेश बेरी. बॉर्डर सिनेमातला मथुरा दास तुम्हाला चांगलाच आठवत असेल. जो सनी देओलला सुट्टी मागतो आणि शेवटी मरतो. खरंतर सुदेश बेरीला बॉलिवूडमध्ये लीड हिरो म्हणून सिनेमे मिळाले नाहीत, सपोर्टींग ऍक्टर म्हणून ते फेमस होत राहिले. 

पण छोट्या पडद्यावर, टीव्ही सिरियलमध्ये सुदेश बेरीसारखा बेरकी व्हिलन दुसरा शोधून सापडणार नाही.

बॉलिवुड असो किंवा टीव्ही सिरियल्स यामध्ये एक गरजेचं असतं की हिरोचं कॅरेक्टर जितकं मजबूत आहे त्याच्या दुप्पट दमदार कॅरेक्टर व्हीलनच असतं. सुदेश बेरी यांनी बॉलिवुड आणि सिरीयल दोन्हीकडे आपले झेंडे गाडले आहेत. सुदेश बेरींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली ती 1988 साली. पहिलाच सिनेमा त्यांना मिळाला खतरों के खिलाडी.

पण खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे 1990 मध्ये आलेल्या घायलमुळे. या सिनेमात जेलमध्ये सनी देओलच्या साथीदाराची भूमिका त्यांनी साकारली होती.

1992 साली दूरदर्शनवर आलेल्या कशिश मालिकेत मालविका तिवारी सोबत सुदेश बेरी लीड रोलमध्ये झळकले. खरंतर सुदेश बेरींनी वंश, युद्धपथ या सिनेमांमध्ये लीड भूमिका केल्या खऱ्या पण ते लोकप्रिय झाले सपोर्ट ऍक्टर म्हणून आणि नंतर तशाच भूमिका त्यांच्या वाट्याला येत गेल्या. आर्मी, बॉर्डर, रिफ्युजी, एलओसी कारगिल या सिनेमांमध्ये जबरदस्त काम करून सुदेश बेरी घराघरांत पोहचले.

बॉर्डर सिनेमा जितका गाजला त्यातून चांगली ओळख त्यांना मिळाली, सुभेदार मथुरा दास चांगलाच भाव खाऊन गेला होता.

पण बॉलिवुडच्या तुलनेत छोट्या पडद्यावर सुदेश बेरींची जबरदस्त पकड होती. बेरकी खलनायक त्यांच्यासारखा कोणी रंगवला नाही. टेलिव्हिजनच्या बाबतीत सुदेश बेरी सर्वात अगोदर महाभारत सिरियलमध्ये झळकले. यानंतर कशिश, सीआयडी ऑफिसर, अंदाज, अगले जनम मोहें बीटीया ही किजो, बेगूसराय, सिया के राम अशा अनेक सिरियल्समध्ये सुदेश बेरींनी अभिनय केला आणि लोकांकडून त्यांना अशा भूमिकेचं जास्त कौतुक केलं.

पण सुदेश बेरींना आजही ओळखलं जातं तो रोल म्हणजे सुराग द क्लू .

दूरदर्शनवर ही सिरियल यायची. यात सुदेश बेरी इन्स्पेक्टर भारत करायचे. क्रिमिनल कितना शातीर क्यू ना  हो वो कोई ना कोई सुरंग छोड ही देता है असा महान डायलॉग मारत सीआयडी ऑफिसर सुदेश बेरी केस स्लॉव्ह करायचे आणि शेवटी आपल्या खास स्टाईल मध्ये म्हणायचे

यु आर अंडर अरेस्ट

आज सीआयडी पासून ते क्राईम पेट्रोल पर्यंत सिरीयल गाजत असतात. पण सुदेश बेरीच्या सुरागची सर कशालाच नाही. अधिकारी ब्रदर्स यांनी बनवलेली हि सिरीयल फक्त एकच सिझन आली पण दर सोमवारी रात्री १० ते ११ या वेळेत संपूर्ण भारत सीआयडी ऑफिसर भारतची वाट बघायचा.

सुदेश बेरीची बॉर्डरमध्ये सनी देओलच्या शिव्या खाणाऱ्या मथुरादास मुळे बनलेली  इमेज या सिरियलमुळे बदलली आणि तो टीव्हीच्या स्टार कलाकारांमध्ये गणला जावू लागला.

वडिलांची इच्छा होती की पोरानं बॉक्सर व्हावं पण सुदेश बेरींनी आपली आवड जोपासली आणि अभिनयात करियर केलं. आजसुद्धा छोट्या पडद्यावर सुदेश बेरींचा तगडा फॅनबेस आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.