आपल्या कारकिर्दीची सुरवात सिक्स मारून करणारा शिखर धवनला वर्ल्डकप मध्ये रिप्लेस करतोय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने दमदार शतक झळकवल पण याच मॅचमध्ये त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. तेव्हा चर्चा चालली होती की विश्रांती म्हणून तो पुढचे एक-दोन सामने खेळू शकणार नाही. तसा तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळला पण नाही. त्या सामन्यात त्याच्या जागी केएल राहुल याला ओपनिंगला पाठवण्यात आले होते.

पण परवा शिखर धवनने ट्विटर वर व्हिडीओ टाकला ज्यात त्याने सांगितले की अंगठा फ्रॅक्चर झाला असून त्यामुळे त्याला वर्ल्ड कप मधून बाहेर व्हाव लागत आहे. हा भारतासाठी मोठा धक्का होता. व्हिडीओ मध्ये बोलताना तो फार भावूक झाला होता. हा ट्विट त्याने हॉस्पिटल मधूनच टाकलेला. त्यावर खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर वरून त्याला रिप्लाय केला आणि त्याचे सांत्वन करत त्याला धीर दिला.

सगळीकडे शिखर धवन वर्ल्ड कपच्या बाहेर गेल्याची चर्चा चालली होती. त्याचा फॉर्म बघता ते साहजिकच होते. पण त्याच्या जागी खेळायला येणाऱ्या रिषभ पंत याचाही वर्ल्ड कप पर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. मात्र त्यावर फारशी चर्चा होताना दिसली नाही.

दोनच वर्षापूर्वीची गोष्ट आहे.

दीर्घ आजारपणामुळे रिषभच्या वडिलांचे निधन झालेले. तेव्हा तो १९ वर्षाचाच होता. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर झालेलं अस नुकसान कधी न भरून निघणार असत. वडिलांवर अंतिम संस्कार करण्यासाठी रिषभ दिल्ली वरून घरी गेला. आणि दुसऱ्या दिवशीच दिल्ली कडून आयपीएल सामना खेळण्यासाठी परतला होता. त्या सामन्यात रिषभने शानदार अर्धशतक झळकावले होते. पण तरी बंगलोर विरुद्धचा तो सामना दिल्ली १५ धावांनी हरली होती.

त्याला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत मिळाली. या संधीच त्यानं सोन केलं. आपल्या पहिल्याच कसोटीच्या पहिल्याच बॉलला त्याने सिक्स मारून झोकात एंट्री केली. त्याच सिरीज मध्ये त्याने आपली पहिली कसोटी सेंच्युरी नोंदवली.

रिषभ पंतने ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे मध्ये पर्दापण केले. त्यापूर्वी तो U-१९ आणि आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कडून खेळताना तो कायम संघाचा तारणहार राहिला आहे. त्या बळावरच त्याने भारतीय क्रिकेट संघात जागा पटकावली. धोनीनंतर भारताच्या विकेटकिपर बॅट्समनची जागा त्याचाच नावे असणार आहे हे निश्चित.

या सगळ्यात त्याच्या आईने केलेले प्रयत्न विसरता येणार नाही.

Rishabh Pant with Mother Twitter RishabhPant777 Getty Images 784x441

रिषभला चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या आहेत. त्यासाठी त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले. पण त्यांना दिल्लीत राहणे परवडत नव्हते म्हणून रिषभची आई गुरुद्वाऱ्यात राहायची आणि तिथेच कामही करायची.या सगळ्याच फळ म्हणून रिषभला U-१९ मध्ये स्थान मिळाल आणि २०१६ च्या U-१९ वर्ल्ड कप मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केल. त्याचवेळी आयपीएलच्या दल्ली संघाने त्याला १.९ करोड मध्ये त्याला खरेदी केल आणि तिथूनच त्याच आयुष्य बदललं.

तर आजच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रिषभ वर्ल्डकप मध्ये पर्दापण करण्याची शक्यता आहे. त्याच्याकडून संघाला आणि देशवासियांना अनेक अपेक्षा आहेत. तो सुद्धा या अपेक्षा खऱ्या ठरवण्यासाठी प्रयत्नशील असेल. आणि केवळ शिखर धवनच्या जागी “बदली” खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाल्याचे लेबल पुसण्याचा नक्कीच सार्थ प्रयत्न करेल.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.