आज ज्यांचा प्रपोज गंडला त्यांच्यासोबत जगजीतसिंह आयुष्यभर राहिल…

जगजीतसिंह. रात्रीच्या अंधारात हातात ग्लास घेवून कित्येकजण त्याची गाणी ऐकतात. त्याने कित्येक मैफीलीत जान आणली. प्रेम फुलवण्याच काम पण त्यानेच केलं आणि कोणीतरी सोडून गेल्यानंतर त्यानेच सावरलं. प्रेमात पडणारा आणि जगजीतसिंह न आवडणारा माणूस आजपर्यन्त तरी आम्हाला सापडला नाही.

गावाला प्रेमाची भाषा शिकवणाऱ्या जगजीतसिंहची स्वत:ची लव्हस्टोरी देखील सरळ, साधी, सोप्पी नव्हती.

तो चित्राच्या प्रेमात पडला होता. तो जेव्हा तिच्या प्रेमात पडला तेव्हा तिच लग्न झालं होतं. नवऱ्याच्या विचित्र वागण्यामुळे चित्रा पुर्णपणे तुटली होती. ती नवऱ्यापासून वेगळी झाली होती. चित्राला एकटीलाच आयुष्य काढायचं होतं अशा काळात तिला जगजीतसिंह भेटला.

जगजीतसिंहच्या गझलेच्या प्रेमात ती पडली. जगजीतसिंह देखील तिच्या प्रेमात पडला.

पण चित्राकडे लग्नाचं धाडस नव्हतं. जगजीतसिंह यांनी मग चित्राचं मग वळवलं, त्यानंतर ते तिच्या पुर्वीच्या नवऱ्याकडे गेले. त्याच्याकडून देखील लग्नासाठी रितसर परवानगी घेतली. कोणतही बंड न करता, जगजितसिंह या माणसाने सहज प्रेमाने प्रेम जिंकल. 

दोघांनी १९६९ साली लग्न केलं, पुढे या जोडीने अनेक वर्ष रसिकांना झुलवलं. ज्या काळात गझल गायकी करावी ती पाकीस्तानी गायकांनी असा समज असताना जगजीतसिंह यांनी स्वत:ला सिद्ध केलं.

त्यांच्याच या सुपरहिट गझलं, खास राजकारणाच्या राड्यात तुमच्या रात्री भारी करण्यासाठी. 

१.तुमको देखा तो ये खयाल आया.

 

१९८२ साली रिलीज झालेल्या साथ साथ या सिनेमामधल हे सदाबहार गाणं. देखणा फारुख शेख आणि साधी सिंपल दीप्ती नवल यांच्यावर शूट झालेलं हे गाण. प्रेमाची आर्तता अनुभवावी तर याच गाण्यात. जावेद अख्तर यांनी लिहिलेले शब्द जगजीतसिंह यांच्या मुलायम आवाजातून हृदयाला चीर पाडत जातात.

२. होठोसे छुलो तुम मेरे गीत अमर करलो.

 

ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. जगजितसिंह यांची जीवनकथा म्हणाव अस हे गाणं. प्रेमगीत या सिनेमासाठी त्यांनी स्वतः संगीतबद्ध केल होत. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर चं नॉमिनेशन सुद्धा मिळाल.

३.होशवालो को खबर क्या?

९० च्या दशकातल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणार हे गाण. पहिल्या प्रेमाचा पहिला रोमांटिकपणा अनुभवावा तर याच गाण्यात. सरफरोश या सिनेमात नसिरुद्दीन गात असलेल गाण आमीर खान आणि सोनाली बेंद्रे प्रमाणे आपल्यालाही आठवणीच्या निरागस जगात घेऊन जाते.

४.तुम इतना जो मुस्करा रहे हो.

मनात ला दर्द लपवून चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या प्रत्येकासाठीचं गाण.

१९८२च्या महेश भट्टच्या अर्थ या सिनेमामधल गाण. शबाना आझमी आणि राजकिरण यांच्यावर चित्रित झालेलं हे गाण. शबाना आझमीच्या अभिनयाची ताकद या गाण्यात दाखवली आहे. नात्यातली गुंतागुंत आपल्या गाण्यातून हळूवारपणे उलगडणे ही तर जगजितसिंह यांची खासियत होती.

५.चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कोनसा देश.

१९९८ साली आलेल्या दुश्मन या सिनेमातलं हे गाण. काजोल, संजय दत्त आणि आशुतोष रानाचा अंगात धडकी बसवणारा हा सिनेमा. काजोलच्या डबल रोल पैकी एकीच्या मृत्यूनंतर सिनेमात वाजणारं हे गीत. ऐकणारा प्रत्येकजण आपल्या प्रियजनांच्या आठवणीने हमखास रडतोच. अस सांगतात, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर या गाण्यान अख्खा लातूर रडला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.