प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची “लव्हस्टोरी”.

हं झालं का. आत्ता कुठे राजकारणात आल्या तर लागले का लगेच बदनामी करायला. अहो काय करायचं असत तुम्हाला हे अस एकमेकांच्या घरातल्या बातम्या सांगून. नाय आम्ही काय म्हणतो सिद्ध तरी काय करणार आहात सांगा तरी एका, तर अशा भिडू लोकांसाठी सल्ला. लोड घ्यायचा नाही. जे येतय ते वाचायचं. कमेंट बॉक्स खुला असतो. तिथं लिहायचं आपल्या भावनेला मोकळं करायचं झालं. 

आत्ता नेहमीसारख्या बतावण्या सोडून मुळ मुद्यावर येतो.

तर आत्ता प्रियांका गांधीबद्दल लोक सर्च करू लागलेत. यांच गोत्र कुठे सापडेल का? या शोधात दूपारपासून गुगलवर रतीब लागला असेल. तर कसय नेहमीत तुमच्या मदतीला आम्ही यायचं ठरवलं आहे. तर हि घ्या प्रियांका गांधींची लव्हस्टोरी आणि वाड्रा परिवार नेमके कोण आहेत त्या बद्दल डिटेल माहिती.

वाड्रा मुळेच कुठले म्हणायचे. 

वाड्रा मुळचे पाकिस्तानातले. पाकिस्तानच्या सियालकोटचं हे कुटूंब. सियालकोटमध्ये राहणारे रॉबर्ट यांचे आजोबा हुकूम रॉय वाड्रा व्यवसायाच्या शोधात मुरादाबादला आहे. तिथे त्यांनी पितळेच्या व्यवसायात पाय रोवले. १८ एप्रिल १९६९ ला याच घरात रॉबर्ट वाड्रा यांचा जन्म झाला. म्हणजे रॉबर्ट वाड्रा यांचा जन्म मुरादाबादचा. त्यांची आई मात्र स्कॉटलेंडमध्ये राहणारी होती. त्यांच नाव मॉरीन वाड्रा.

मुद्याची लव्ह स्टोरी काय आहे. 

तर झालं अस की प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हे शाळेतलं प्रेमप्रकरण. प्रियांका तेरा वर्षांच्या असताना पहिल्यांदा रॉबर्ट यांना एका मित्राच्या घरी भेटल्या. रॉबर्ट यांची बहिण प्रियांका यांच्या वर्गात होती. त्यातूनच या गाठीभेटी वाढत गेल्या. रॉबर्ट आणि प्रियांका यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. एका मुलाखतीत, रॉबर्ड वाड्रा यांनी सांगितल होत की, मला आयुष्यातली सर्वात मोठ्ठी हिंम्मत तिला प्रपोज करताना दाखवायला लागली होती. तिच्या राजकिय कुटूंबाची परस्थिती पाहता माझ्यासाठी ते धाडसच होतं. 

त्यानंतर प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि राहूल गांधी हे चांगले मित्र झाले. रॉबर्ट वाड्रा यांनी १९९१ सालात त्यांना प्रपोज केलं आणि त्यांनी प्रेमप्रकरण सुरू झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८ फेब्रुवारी १९९७ रोजी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच लग्न झालं. शाळेपासून सुरू झालेल्या लव्हस्टोरीने एक टप्पा पुर्ण केला. 

पण इथे सुखी संसार नव्हता. रॉबर्ट वाड्रा यांचे वडिलांमुळे त्यांच्या संसारात अडचणी वाढल्या. गांधी आडनावाच्या संबधाच्या दुरउपयोग करुन त्यांनी चुकिच्या गोष्टी करण्यास सुरवात केल्याचा आरोप केला गेला. संसारात अडचणी वाढल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी आपले वडिलांसोबतचे संबध संपुष्टात आले आहेत अस जाहिर करुन टाकलं. २००१ साली त्यांनी सार्वजनिकरित्या आपले व आपल्या वडिलांचे कोणतेही संबध नसून त्यांच्यासोबत व्यवहार करू नये अस सांगितलं. 

याच वर्षी त्यांच्या बहिणीचा देखील एका अपघातात मृत्यू झाला. २००३ साली त्यांच्या भावाने आत्महत्या केली तर २००९ साली वडिलांचा देखील मृत्यू झाला.

बाकी रॉबर्ट्र वाड्रा आणि DLF, रॉबर्ट वाड्रा आणि विमानातून विना चेकिंग जाण्याची सुट व इतर गोष्टी जशा चर्चेत येत राहतील तशा तुमच्यापुढे मांडतच राहू तुर्तास लव्हस्टोरीवर विषय संपवू. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.