एम. एम. किरवानी यांनी नाटू नाटूच्या आधीही मोक्कार हिट गाणी दिलेत… त्यातलीच ही १० गाणी

आरआरआर सिनेमातलं नाटु नाटु गाणं हिट तर ठरलंच. शिवाय या गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये बेस्ट ओरिजीनल साँग हा अवॉर्डही मिळाला. आता ऑस्कर अवॉर्ड्ससाठीही बेस्ट ओरिजीनल साँग या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालंय.

या अवॉर्ड्समुळे एक नाव चर्चेत आलं… एम एम किरवानी. पण हे नाव चर्चेत आलं त्यापेक्षा एक मोठी गोष्ट म्हणजे एम एम किरवानी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.

एम एम किरवाणी हे नाटू नाटू गाण्याचे म्युझिक कंपोजर आहेत म्हणून आज चर्चेत आहेत, पण याआधीही त्यांनी खूप लोकप्रिय गाणी इंडस्ट्रीला दिली आहेत आणि ते जरी आज चर्चेत आले असले तरी त्यांची गाणी खूप आधीपासून चर्चेत राहिली आहेत.

बघुया त्यांची आतापर्यंतची काही हिट गाणी.

१. तुम मिले दिल खिले.

९० च्या दशकात हे गाणं म्हणजे असं प्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात भारी मार्ग होता. १९९४ साली आलेल्या महेश भट्ट यांच्या क्रिमिनल चित्रपटातलं हे गाणं आहे. या चित्रपटात नागार्जुन आणि मनिषा कोयराला हे दोघं मुख्य भुमिकेत होते.

‘तुम मिले, दिल खिले… और जीने को क्या चाहिए’ हे शब्द जितके भारी आहेत तितकंच भारी म्युझिकसुद्धा आहे. त्यामुळेच हे गाणं लोकप्रिय झालं होतं आणि आजही हे गाणं ऐकलं की भारी वाटतं.

२. आ भी जा.

२००२ साली एक सिनेमा आलेला ‘सूर’ नावाचा. लकी अली यांचा हा सिनेमा होता. हा सिनेमाच मुळात संगीत या विषयाभोवती फिरतो. या सिनेमातलं हे गाणं आ भी जा. लकी अली आणि सुनिधा चौहाण यांनी हे गाणं गायलंय.

प्रेयसीला परत आपल्या आयुष्यात बोलवण्यासाठी हे गाणं आहे असं या चित्रपटात दाखवलंय. त्याकाळात ब्रेकअप झालेली पोरं हे गाणं ऐकून पांघरुणाखाली रडायचे असंही कानावर आलंय.

३. नेने नानी ने

हे कोणतं गाणं आहे असं वाटेल खरं, पण हे गाणं त्याच्या नावापेक्षा त्यातल्या फक्त दोन शब्दांमुळे लोकांच्या लक्षात आहे… ते शब्द म्हणजे, ‘अरे अरे अरे अरे… ओ ओ ओ’. आता हे गाणं हिंदी नसलं तरी आपल्या मनात आहे ते या अरे अरे अरे अरे मुळे.

हे गाणं एस एस राजामौली यांच्या एग्गा या चित्रटातलं आहे. हे गाणं आहे लव्ह साँग… आता आपल्याला त्यातले शब्द कळत नसले तरी गाण्याच्या प्रेमात तर आपण पडतोच की.

४. जादू है, नशा है.

जॉन इब्राहीम आणि बिपाशा बासू या दोघांच्या जिस्म या चित्रपटातलं हे रोमँटीक साँग आहे. या गाण्याच्या व्हिडीओचा विचार केला तर, गाण्यामध्ये त्या दोघांचा दाखवलेला रोमान्स हा बॉलिवूडमध्ये त्याकाळात म्हणजे २००३ साली दाखवणं जरा क्वचितच घडत असेल.

असं असलं तरी, हे गाणं आणि त्याचं म्युझिक या दोन गोष्टींकडूनही मन हटत नाही. व्हिडीओ कितीही भारी वाटत असला तरी, ऑडियोलाही तोड नाही. त्यावेळी नव्याने प्रेमात पडलेली पोरं-पोरी आरशात बघुन हे गाणं गुणगुणायचे.

५. धीवारा.

बाहुबलीच्या पहिल्या भागातलं म्हणजेच बाहुबली द बिगीनिंग मधलं हे एक गाणं. हे सुद्धा रोमँटीक गाणंच आहे. फक्त आपल्याला ते शब्द कळत नाहीत येवढाच काय तो विषय.

६. गली में आज चाँद निकला.

गली में आज चाँद निकला हे गाणं कसंय.. खूप दिवसांनी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला भेटलं की, हे गाणं डोक्यात येतं म्हणजे येतंच येतं. नागार्जून आणि पूजा भट हे दोघं या गाण्यात आहेत. शिवाय, लहानगा कुणाल खेमू या गाण्यात पाहायला मिळतो.

७. धीरा धीरा.

एस एस राजामौली यांचा मगाधीरा पिक्चरमधलं हे गाणं. ऐतिहासिक सीन दाखवतानाचं हे गाणं आहे. या गाण्यात बॅकग्राऊंडला नगाडे वगैरे वाजतायत आणि अभिनेत्री काजल अग्रवाल राम चरणसाठी हे गाणं गातेय. हे जे कॉम्बिमेशन आहे ते कमालच आहे.

८. मैने दिल से कहा.

रोग या चित्रपटातलं हे गाणं मैने दिल से कहा ढुँढ लाना खुशी… हे गाणं म्हणजे असं आहे की, आयुष्यात दुख: नसेल तरी, हे गाणं ऐकू दुख: होतं. याचं क्रेडि या गाण्याच्या व्हिडीओत दिसणाऱ्या इरफान खान आणि म्युझिक देणाऱ्या एम एम किरवानी या दोघांनाही जातं.

९. धीरे जलना.

२००५ साली शाहरूखचा एक पिक्चर आलेला पहेली. त्या पहेलीमधलं हे गाणं. सोनू निगम आणि श्रेया घोशाल यांनी हे गाणं गायलंय. शिवाय, गाणं लिहीलंय ते गुलझार यांनी.

आता येवढी सगळी फेमस गाणी सांगितल्यावर एक असं गाणं सांगतो जे भारी आहे, पण चर्चेत काही आलं नाही.

१०. चूप तूम रहो.

सुधीर मिश्रा यांच्या १९९६ च्या इस रात की सुबह नहीं या चित्रपटातलं  हे गाणं आहे. हे गाणं किरवानी यांनी कंपोज केलंय.

खरंतर, किरवानी यांच्या भारी गाण्यांची लिस्ट काढायला बसलो तर, अजून ३०-४० गाणी तरी निघतील. पण या १० गाण्यांवरून त्यांचं  संगीतावर असलेलं प्रभुत्व लक्षात येतंय. आता त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.