ही आहेत हिंदूंसारखी देवळं असणारी इराक व सीरियामधली यझिदी माणसं..

इसिस संघटनेनं आजपर्यंत सगळ्यात जास्त कत्तल केलेली लोकं म्हणजे यझीदी. त्यांच्या धर्माविषयी आपल्याला खूप कमी माहिती आहे. पण त्यांच्यात आणि हिंदूंमध्ये कित्येक समानता आढळतात.

हा धर्म नक्की वेगळा आहे की मुस्लीमांमधलाच एक वेगळ्या वाटेला लागलेला पंथय की कुर्द माणसांचा जुना गटाय यावर संशोधकांमध्ये हाणामाऱ्या चालू आहेत. पण कुरमानजी भाषा बोलणाऱ्या लोकांचा हा समूह आज सगळ्यात जास्त हलाखीच्या परिस्थितीत आहे यावर मात्र सगळ्यांच एकमत असायला हरकत नाही.

कोण आहेत हे यझिदी..

इराक आणि सीरियाच्या भागात त्यांची मुख्य वस्ती आहे. किंवा होती अस म्हणुया. आता ह्यातले बरेचशे लोक वेगवेगळ्या देशांत पळून गेले आहेत. ७ ते १० लाखांपर्यंत ह्यांची लोकसंख्या असल्याचं सांगितलं जातं.

यातले पाच लाख लोक एकट्या इराकमध्ये राहतात. २०१४ मध्ये ISIS संघटनेने त्यांच्यातल्या इतक्या लोकांना मारलं की हा समूह आता जगतो की नष्ट होईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. हे लोक मुसलमान नाहीत असं त्यांचं मतय. मुहम्मद पैगंबर यांच्यानंतर सुरू झालेल्या चार मोठ्या खिलाफत शासनांमधील दुसऱ्या उम्मायद खिलाफतीत ह्या धर्माची स्थापना झाल्याचं म्हणतात पण यझीदी लोकं असलं काहीच मान्य करत नाहीत.

ती लोकं “क्षव्हेदे एझ डाम” म्हणजे “देवांनी आम्हाला बनवलं” असा आपला इतिहास सांगत असतात.

सुफी संतांच्या शिकवणीचा आणि वचनांचा ह्या धर्मावर मोठा परिणाम झालेला आढळतो. त्यामुळं त्यांचे देवदेवता सगळे इस्लामहून वेगळ्या आहेत. मात्र जीव वाचवण्यासाठी  काळाच्या ओघात अनेक यझीदी लोकांनी इस्लाम स्वीकारून कुर्दिश ओळख आपलीशी केली आहे.

अर्थात अजून यझीदी राहिलेली लोकं कुर्द हेच आधी यझीदी होते आणि त्यांनी धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असल्याचं सांगतात.

जगात फक्त एकच देव आहे आणि जग बनवून त्याच्या कारभाराची जबाबदारी त्याने सात देवदूतांकडे दिलीय अशी यझीदी धर्माची शिकवण आहे. क्षव्हेदे हा देव जगाचं पालनपोषण करतो. विष्णुसहस्त्र नामांप्रमाणे त्याला १००१ नावं आहेत. माणसाला बनवल्यानंतर क्षव्हेदे देवानं त्याच्या सात देवदूतांना माणसासमोर नतमस्तक व्हायला लावलं.

टवूसे मेलेक नावाची दूत सोडून सगळे माणसासमोर नमले. पण क्षव्हेदेला बघायचं होतं की कोण आपल्याशी प्रामाणिक आहे. म्हणून त्यानं टवूसे मेलेकलाच माणसांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले
आता ही स्टोरी खरंतर इब्लिसच्या नावाने कुरणातही आढळते.

पण सिरीयात ह्या लोकांना सैतानाची पूजा करणारी माणसं म्हणूनच शिवी दिली जाते. फैजच्या कवितेमुळं पाकिस्तान आणि नवाजुद्दीनच्या सॅक्रड गेम्समुळं भारतात फेमस असलेल्या अन-अल-हक (अहं ब्राह्मस्मि) विचारांशी समानता आढळते.

कितेबा किल्व्हे हे त्यांचं धार्मिक पुस्तक आहे. मिशेफा रेस म्हणजे काळं पुस्तक ह्यालाही त्यांच्यात धर्मग्रंथांचा दर्जा दिला जातो. अर्थात १९१० ते १९२० च्या काळात प्रकाशित होताना पाश्चिमात्य लोकांनी ह्याच्यात आपल्या मनाने अनेक भाकडकथा घुसवल्यात. त्यामुळं यझीदी लोकांचं जे काय ओरिजनल तत्वज्ञान असेल ते म्हणजे आज्यापंज्यानी शिकवलेलं गाणी आणि प्रार्थना…

1280px Lalish the holiest site in Ezidkhan the sacred place of the Ezidis 01
यझिदी लोकांची देवळं, ही आपल्याचं देवळांसारखी दिसतात

सूर्याकडे तोंड करून ही लोकं प्रार्थना म्हणतात. ह्यांच्यात बुधवार आणि मंगळवारच्या संध्याकाळी सामूहिक प्रार्थना केली जाते.त्यांच्यातही आत्मा मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि अमर असतो अशी कल्पना आहे. पीर आणि शेख लोकांचीही परंपरा ह्या लोकांच्यात आढळते.

आणि ह्यांची सगळ्यात वेगळी खासियत आणि ओळख म्हणजे त्यांची देवळं.

उत्तर इराकमधील सगळ्यात उंच शिखरावर त्यांचं चेल मेरा नावाचं म्हणजे चाळीस बाप्प्यांचं देऊळ आहे. ते एवढं जुनं आहे की नेमकं कोणत्या काळात बांधलं गेलं हे कुणालाच माहीत नाही. त्या जागी चाळीस माणसांना गाडलं म्हणून हे नाव पडल्याचं लोक सांगतात.

ह्यांच्या देवळावर हिंदू मंदिरांसारखा कळस असतो. बरेचदा गाभारा आणि मंडप ह्यांच्यावरही दोन कळस असतात. त्यांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे सेमैय्या होय. शेख आदि ह्या त्यांच्यातल्या सर्वोत्तम धर्मगुरूच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो.

त्याचं खूप मोठं मंदिरही लालिश गावात उभारलेले आहे. हे आदि म्हणजे अपल्या इकडुन तिकडं गेलेले आदि शंकराचार्य असावेत असा दावा काही लोक करतात, पण ह्याला कुठलाही ठाम पुरावा नाही. देऊळ अगदी हिंदू देवळासारखं मोठ्ठं आणि कोरीव आहे.

‘कबा मेरे दिवाने’ हे आर्मेनियातलं त्यांचं सगळ्यात मोठं देऊळ आहे. गेल्या वर्षीच ते भक्तांसाठी पुन्हा उघडण्यात आलं. जगभरातील लोकांनी ह्या देवळासाठी मदत केली आहे. जगभर पसरलेली यझीदी जनता भारतीय आणि इतर लोकांशी संवाद साधत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि टिकून राहण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.