एक खराखुरा डाकू मनोज वाजपेयींसोबत रहात होता अन् कोणाला कळले देखील नाही…

बँडीट क्वीन या सिनेमाच्या शूटिंगच्या काळातला हा किस्सा. धौलपूरमध्ये आणि चंबळच्या डोंगरदऱ्यांमध्ये बँडीट क्वीन पिच्चरची शूटिंग होत असायची तेव्हा जेवणाच्या वेळी, गाडीतून प्रवास करताना, रेस्ट हाऊस अशा सगळ्या ठिकाणी मनोज वाजपेयी सोबत एक माणूस असायचा. कधी तो मनोज वाजपेयीच्या गळ्यात हात घालून उभा असायचा तर कधी लोकांसोबत फोटो काढत असायचा तर कधी सिनेमातल्या इतर कलाकारांबरोबर गप्पा मारत असायचा त्यावेळी अभिनेते सौरभ शुक्ला रागाने मनोज वाजपेयीला म्हणाले होते कि,

कोण आहे हा माणूस ?

सगळीकडे सोबत असतो ?

तर तो माणूस होता चंबळच्या खोऱ्यातला सगळ्यात प्रसिद्ध डाकू मानसिंग यादव.

हा खराखुरा डाकू मानसिंग यादव मनोज वाजपेयींबरोबर राहायला होता. बँडीट क्वीन सिनेमाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी खास डाकू मानसिंग यादव यांना बोलावून घेतलं होतं कि डाकू मानसिंगचं पात्र साकारणाऱ्या मनोज वाजपेयीला मदत होईल म्हणून. त्यातून मनोज वाजपेयीला पात्राच्या बारीकसारीक गोष्टी कळतील जेणेकरून भूमिका साकारताना फायदा होईल. 

त्यावेळी डाकू मानसिंगने मनोज वाजपेयीकडून वचन घेतलं होतं कि तो त्याच्या खऱ्या ओळखीबद्दल कुणालाही सांगणार नाही. हा डाकू मानसिंग सेटवर सगळ्यांसोबत फोटो काढत असे आणि त्याने आपलं व्हीजिटींग कार्ड सुद्धा बनवून घेतलं होतं. त्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिलेलं होतं कि,

जय माँ भवानी मानसिंग यादव आणि शेवटी कंसामध्ये लिहिलेलं असायचं पूर्व दस्यु सम्राट.

लोकं सुरवातीला ते कार्ड सहजपणे वाचायची जय माँ भवानी मानसिंग यादव आणि जेव्हा ते पूर्व दस्यु सम्राट वाचायचे तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडायची. ज्यावेळी ते कार्ड लोकं वाचायचे ते काही काळाने घाबरून गायब व्हायचे कारण डाकू मानसिंग हे सोपं प्रकरण नव्हतंच मुळात.

बराच काळ मनोज वाजपेयींच्या सोबत राहिल्याने डाकू मानसिंग हा त्यांचा चांगला मित्र झाला होता. मनोज वाजपेयींसोबत ते प्रवास करायचे. मागच्या सीटवर मनोज वाजपेयी आणि मानसिंग बसायचे तेव्हा चंबळ घाटाच्या प्रवासात मानसिंग हा घाबरून गेलेला असायचा. गाडी चालवणाऱ्याला ते सांगत असायचे कि,

यहां तेज चलाव, तेज चलाव, भगाव भगाव, धीमा करो धीमा करो….

संपूर्ण प्रवासभर त्याची हि कॉमेंट्री चालू असायची. कारण एकेकाळी तो या खोऱ्याचा सम्राट होता पण तरीही त्याच्या जीवाला धोका होताच.त्यांच्या अशा बोलण्याने मनोज वाजपेयी आणि इतर शुटिंगवाले सुद्धा घाबरून जायचे. मानसिंग त्यांना सांगायचा कि,

या खोऱ्यात माझं सगळं आयुष्य गेलंय, मला माहितीय कि कुठे हल्ला होऊ शकतो. आणि जर हल्ला करणार्यांना कळलं कि गाडीत मानसिंग आहे तर संपलंच सगळं लोकं हल्ला करतील.

दस्यु सम्राट मानसिंग हा शरण आलेला होता तरीही त्याच्या जीवाला धोका होता. जीव मुठीत घेऊन तो वागत असायचा. एकदा अशुटिंग चालू असताना मानसिंग यादव गायब झाला. मनोज वाजपेयी एकटेच त्याला शोधत होते कारण सेटवर कोणालाच माहिती नव्हतं कि तो खरा डाकू मानसिंग आहे. झोपडीत आराम करत असताना अचानक तो मानसिंग आला आणि मनोज वाजपेयींच्या कानात सांगत होता कि,

जे तुमची सुरक्षा करताय ना CRPF वाले यांना माहिती नाहीय कि पलीकडच्या डोंगरात सगळी डाकू गॅंग येऊन ठेपली आहे.

डाकू मानसिंग या त्या चंबळच्या खोऱ्यात वाढला असल्याने त्याला तिथल्या सगळ्या गोष्टी माहित होत्या. तिथल्या प्रत्येक दरोडेखोरांचा इतिहास त्याला तोंडपाठ होता . त्यामुळे डाकू मानसिंग दीर्घकाळ तिथे टिकला होता. मनोज वाजपेयी सोबत राहून तोही सिनेमांबद्दल आकर्षित झाला होता.

बँडिट क्वीन सिनेमात मनोज वाजपेयीने मानसिंग हे पात्र अक्षरशः जगलं असल्याचं हे उदाहरण. डाकू मानसिंग मनोज वाजपेयीने आपल्या अभिनयाच्या जोरावर जिवंत केलं होतं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.