पी.सावळाराम यांनी स्टेशनवर बसून लिहिलेलं गाणं प्रत्येक लग्नात वाजवलं जातं

आपल्या महाराष्ट्रात प्रसंग कुठलाही असो त्यावर गाणं हे तयारच असतं, प्रल्हाद शिंदेंच्या ऐका सत्यनारायणाच्या कथेपासून ते आनंद शिंदेंच्या हळद लागलीपर्यंत. लग्नातल्या अनेक प्रसंगांवर गाणी बनली. पण एक काळ असा होता किंवा अजूनही पाठ्वणीच्या वेळेस पी. सावळाराम यांनी लिहिलेलं गाणं वाजत म्हणजे वाजतंच.

पण या अगोदर जाणून घेऊया पी. सावळाराम यांच्याबद्दल. पी. सावळाराम हे असे कवी होते कि त्यांनी लिहिलेल्या ओळी या घरातल्या स्वयंपाकघरापासून ते गोर गरिबांच्या ओट्यापर्यंत पोहचल्या. साध्या सोप्या ओळी पण त्याचा अर्थ इतका डीप असायचा कि वाचणारा ऐकणारा अंतर्मुख व्हायचा. 

पी. सावळाराम यांचं मूळ नाव होतं निवृत्तीनाथ आबासाहेब पाटील. ४ जुलै १९१४ रोजी त्यांचा जन्म झाला. मूळचे ते येडेनिपाणी गावचे होते. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. ५० वर्षांपूर्वी त्यांची गीते हि घराघरात वाजवली जायची. ३५० सुपरहिट भावगीते त्यांनी लिहिली.

सुरवातीला ते निवृत्तीनाथ पाटील याच नावाने कविता लिहीत असे. पण त्यांचं नाव पी.सावळाराम होण्यामागेही एक किस्सा आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे हे सावळारामांचे शाळेतले मित्र होते. आधुनिक कादंबरीचे जनक आणि प्रसिद्ध साहित्यिक ह. ना. आपटे यांच्या उषःकाल कादंबरीतील सावळ्या ह्या व्यक्तिरेखेशी निवृत्तीनाथ ह्याचं साधर्म्य आहे, असं पागे ह्यांना वाटत असायचं आणि त्यामुळे त्यावरुन ते त्यांना सावळ्या अशी हाक मारत असायचे. 

हळूहळू निवृत्तीनाथ पाटील यांच्या कविता आणि गाणी आकाशवाणीवर प्रसिद्ध होऊ लागली. त्याचवेळी आकाशवाणीवर निवृत्तीनाथ नावाचे बासरीवादक होते. एकाच नावाचे दोन व्यक्ती असल्याने जास्तच घोळ होऊ लागला. कवी आणि गीतकार म्हणून नव्यानेच पुढे येऊ पाहणाऱ्या निवृत्तीनाथ पाटील यांनी नाव बलून ते पी. सावळाराम केलं. आणि याच नावाने पुढून ते प्रसिद्ध झाले.

राम राम पाव्हणं या सिनेमाचे दिग्दर्शक दिनकर पाटील हे गीतकाराच्या शोधात होते, या सिनेमाला लता मंगेशकर संगीत देणार होत्या आणि शांता शेळके गीतकार म्हणून काम बघणार होत्या. पण त्यांनी लावण्यासाठी दुसरा गीतकार बघा म्हणून सुचवलं तेव्हा दिनकर पाटील यांना आपल्या कॉलेजमधल्या दोस्तांची आठवण झाली ते होते पी. सावळाराम. २ दिवसांत जबरदस्त लावण्या पी.सावळाराम यांनी लिहून दिल्या. 

यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये तेव्हा दोन बाजू तयार झाल्या होत्या. एका बाजूला दिनकर पाटील, वसंत प्रभू आणि पी. सावळाराम तर दुसर्या बाजूला राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग.दि.माडगूळकर होते. या काळात मोठ्या प्रमाणावर भावगीतांची निर्मिती झाली.

तर त्यांनी एक गाणं लिहिलं होतं जे प्रचंड हिट झालं होतं ते गाणं होतं

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का…

या गाण्याच्या जोरावर त्यांना शरद पवारांनी नगराध्यक्ष म्हणून निवडूनच आणलं होतं. तर या गाण्यामागेही एक किस्सा आहे.

एकदा ते पुणे रेल्वे स्टेशनवर वाट पाहत बसले होते. त्यावेळी त्या स्टेशनवर बरीच गर्दी जमलेली होती. एका नवविवाहित मुलीची पाठवणी चालली होती. पी. सावळाराम लक्ष देऊन तो प्रसंग बघत होते. नवरीला सासरी पाठवताना मुलीच्या आईच्या तोंडून शब्द निघाले कि दिल्या घरी सुखी राहा.

या वाक्यावरून पी. सावळाराम यांच्या लेखणीतून अजरामर शब्द उतरले आणि त्यांनी गाणं लिहिलं गंगा जमुना डोळ्यात उभ्या का…..हे गाणं तेव्हा प्रत्येक लग्नसमारंभात वाजवलं जायचं आणि विवाह सोहळ्याचा एक अविभाज्य भाग बनलं होतं. 

मराठी सिनेमात भावगीतांचा त्यांनी सुवर्णकाळ आणला. गदिमा आणि शांता शेळके यांच्या बरोबरीने पी.सावळाराम यांचं नाव घेतलं जातं. ते एक बंडखोर कवी म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांनी एक गीत लिहिलं होतं,

पंढरीनाथा झडकरी आता,
पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला..
हे गीत बंडखोरीचेच आहे आणि याच धाटणीचे
विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला

हे गीतही बंडखोरी दाखवणारे होते. तुळशीमाळ गळ्यात न घालता आणि टाळ न कुटता आई-वडिलांची सेवा करणाऱ्याचे हे गीत आहे हे त्यांनी दाखवून दिले.

सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।

या ओळी असलेली काळा गुलाब शीर्षकाची त्यांनी कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती.

याबरोबरच त्यांनी अनेक भावगीतांच्या रचना केल्या पैकी गंध फुलांचा गेला सांगून, कोकीळ कुहूकुहू बोले, लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी हि गाणी आणि अशी बरीच गाणी त्यांची गाजली.

पण गंगा जमुना डोळ्यात का उभ्या या गाण्यामुळे पी. सावळाराम हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले होते. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.