स्वातंत्र्याच्या एक वर्षाच्या आतच भारतीय अणुशक्तीचा पाया रचण्यात आला

३ ऑगस्ट १९४८. याच दिवशी भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोग स्थापन केला. हा दिवस भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. द ऍटॉमीक एनर्जी कमिशन हा आयोग डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमीक एनर्जी (DAE) भारत सरकारचाच एक भाग आहे. पंतप्रधान आणि सरकारच्या अख्यतारीत हे सगळं बघितलं जातं.

द इंडियन ऍटॉमीक एनर्जी कमिशन हे १० ऑगस्ट १९४८ रोजी सायंटिफिक रिसर्च डिपार्टमेंटच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले. पण हे खऱ्या अर्थाने ते ३ ऑगस्ट १९४८ रोजीच तयार झालं होतं. भारत सरकारने १ मार्च १९५८ रोजी आर्थिकदृष्ट्या आणि अधिक क्षमतेने द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडिया लाँच केलं. पूर्वीच्या तुलनेत हे जास्त सक्षम असल्याचं सांगण्यात आलं होतं.

 महाराष्ट्रात मुंबईमध्ये द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे.

द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाची महत्वाची कर्तव्ये म्हणजे भारतभरात ऍटॉमीक रिसर्च करण्याचे प्रोग्रॅम आयोजित करणे. देशातल्या ऍटॉमीक शास्त्रज्ञांना त्यात पारंगत करणे आणि त्यांना त्याबद्दल प्रशिक्षण देणे. न्यूक्लीअर रिसर्च इन कमिशनच्या प्रयोगशाळा जास्तीत जास्त आणि मोठ्या प्रमाणात उभारणे. मिनरल्स आणि त्याच्याशी संबंधित मूलद्रव्यांचा अभ्यास करणे. इंडस्ट्रीयल स्तरावर मिनरल्सचा वापर आणि साठा वाढविणे.

द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाची पाच रिसर्च सेंटर भारतभर विस्तारलेली आहेत. अगोदर ही पाच रिसर्च सेंटर कोणती आणि कुठे कुठे आहेत ते जाणून घेऊया.

१) भाभा ऍटॉमीक रिसर्च सेंटर (BARC) मुंबई
२) इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटॉमीक रिसर्च ( IGCAR ), कल्पक्कम, तामिळनाडू
३) राजा रामन्ना सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ( RRCAT ) इंदोर
४) व्हारएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर ( VECC ) कोलकाता
५) ऍटॉमीक मिनरल्स डिरेक्टरेट फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च ( AMD ) हैदराबाद

या सगळ्या सेंटर पासून आर्थिक मदत विस्तारली जाते ती नॅशनल इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी आणि जी या फिल्डमध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन चालवल्या जातात त्यासाठी वापरली जाते.

ज्यावेळी द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आल्यावर त्याचे प्रमुख नेमण्यात आले होते. स्थापन केल्याच्या वर्षांपासून म्हणजे १९४८ साली प्रमुख म्हणून होमी भाभा यांची निवड करण्यात आली होती. होमी भाभा हे १९६६ पर्यंत या आयोगाचे चेअरपर्सन म्हणून कार्यरत होते.

पुढे विक्रम साराभाई यांनी १९७१ पर्यंत या आयोगाची सूत्र सांभाळली. नंतर एच एन सेठाना,राजा रामन्ना, एम.आर.श्रीनिवासन,पी.के. अय्यंगर, आर.चिदंबरम, अनिल काकोडकर, श्रीकुमार बॅनर्जी, रतन कुमार सिन्हा, शेखर बासू आणि आता कार्यरत असलेले के इन व्यास. २०१८ पासून के एन व्यास द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाची धुरा सांभाळत आहेत.

पाच सेंटरची प्रमुख म्हणून द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडिया ओळखली जाते.

७३ वर्ष पूर्ण करून द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडिया अजूनही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाचं वार्षिक बजेट हे केंद्र सरकारकडून पुरवलं जातं. केंद्र सरकार ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाला दर वर्षी २१४.७० बिलियन इतकं बजेट पुरवतं.

महासत्ता आणि विज्ञानाच्या जगात भारताची यशस्वी वाटचाल असावी आणि जागतिक पातळीवर नवनवीन लोकांना संधी आणि नवनवीन शोध लावण्याचं काम द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडिया करत असते. होमी भाभा ते के एन व्यास इथपर्यंत या चेअरमन असणाऱ्या लोकांनी यशस्वीपणे द ऍटॉमीक एनर्जी कमिशन ऑफ इंडियाची सूत्र सांभाळत जगभरात या आयोगाचं नाव केलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.