टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ब्रॉन्झ जिंकलेल्या विनोद कुमारच पदक काढून घेतलंय, पण नेमकं का?

डोंगरावरुन पडल्यानंतर सलग १० वर्षे अंथरुणाला खिळलेल्या डिस्कस थ्रोअर विनोद कुमारने रविवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या एफ -५२ स्पर्धेत आशियाई विक्रमासह कांस्यपदक पटकावले. परंतु आजाराच्या क्लासिफिकेशन नंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे.

भारताच्या विनोद कुमारने डिस्कस थ्रोमध्ये जिंकलेले कांस्यपदक आता त्यांना मिळणार नाही.

टोकियो पॅरालिम्पिकच्या टेक्निकल प्रतिनिधीने दिलेल्या निवेदनानुसार, विनोद कुमार डिस्कस थ्रो (एफ ५२ क्लास) साठी पात्र नाही. ४१ वर्षाच्या या बीएसएफ जवानाने १९.९१ मीटर सर्वोत्तम थ्रोसह तिसरा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत पोलंडच्या पियोट्र कोसेविज (२०.०२ मीटर) आणि क्रोएशियाच्या वेलीमीर सँडर (१९.९८ मीटर) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. पण त्याच स्पर्धेत भाग घेणाऱ्या एका स्पर्धकाकडून विरोध झाला आहे. त्याने विनोदच्या एफ -५२ च्या क्लासिफिकेशनवर आक्षेप घेतला आहे. अजूनही त्या स्पर्धकाच्या विरोधच कारण समजलेलं नाही.

अक्षमतेच्या आधारे वर्गीकरण :

पॅरा खेळाडूंचे त्यांच्या अपंगत्वाच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात येते. या क्लासिफिकेशनमुळे सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्याच्या क्षमतेच्या खेळाडू बरोबर स्पर्धा करण्याची संधी मिळते.

म्हणजे अपंग असणाऱ्या खेळाडूंना समान अपंगत्वासह स्पर्धा करण्याची परमिशन मिळते. गेम्सच्या स्पर्धेच्या आयोजकांच्या मते, स्पर्धेतील क्लासिफिकेशनच्या तपासणीमुळे या कार्यक्रमाचा निकाल सध्या पुनरावलोकनाखाली म्हणजेच निरीक्षणाखाली आहे.

पण हि एफ- ५२ स्पर्धा काय असते 
F52 स्पर्धेत असे खेळाडू भाग घेतात ज्यांची स्नायू क्षमता कमकुवत आहे आणि त्यांच्या हालचाली मर्यादित आहेत. हातात त्राण नाहीत किंवा पायाच्या लांबीमध्ये फरक आहे. ज्यामुळे खेळाडूंना बसूनच स्पर्धा खेळावी लागते. पाठीच्या कण्याला दुखापत असलेले किंवा अंग कापलेले खेळाडू देखील या क्लासिफिकेशन मध्ये मोडतात.

विनोद कुमारांना अपंगत्व कस आलं? 

सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सामील झाल्यानंतर प्रशिक्षण घेत असताना, विनोद कुमार लेहमधील एका शिखरावरून खाली पडले होते. त्या दुर्घटनेमुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे, ते जवळजवळ एक दशकापर्यंत म्हणजे सलग दहा वर्षे अंथरुणाला खिळून होते.

या काळात त्यांचे आई -वडील मरण पावले. आई वडील गेल्यानंतर विनोदच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची झाली होती. २०१२ च्या सुमारास त्यांची मानसिक स्थिती सुधारली. म्हणूनच विनोद कुमारांनी काहीतरी करायचे ठरवले. बसून काही उपयोग नव्हता हे त्यांनी जाणलं. पुढे २०१६ च्या रिओ गेम्स नंतर त्यांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये आपलं करिअर करायचं ठरवलं.

त्यांनी रोहतक येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सराव सुरू केला. आपल्या सरावाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत दोनदा कांस्यपदक जिंकले. पुढं मजल दरमजल करीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुद्धा आपला डंका वाजविला. त्यांनी २०१९ मध्ये पॅरिस ग्रां प्रीमध्ये भाग घेतला आणि नंतर त्याच वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला.

विनोद कुमारने रविवारी पदक जिंकले पण त्यांच स्वतःच क्लसिफिकेशन देण्यात ते असमर्थ ठरले आणि त्यानंतर ब्रॉन्झ पदकाचा हातातोंडाशी आलेला घास गेला.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.