ईद-ए-मिलाद भारतात साजरा होतो पण काही मुस्लिम देशात होत नाही. का?

ईद मिलाद-उन-नबी म्हणजेचं ईद- ए-मिलाद हा दिवस मोहम्मद पैगंबर यांचा जन्म आणि मृत्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. हो, आता याबाबतही काही . पण हा दिवस रबी-उल-अव्वल महिन्यात साजरा केला जातो,  जो इस्लामिक कॅलेंडरमधला तिसरा महिना आहे.

हा दिवस मौलिद म्हणूनही ओळखला जातो, ज्याचा अरबी शब्द ‘जन्म देणे’ आहे. रबी-उल-अव्वल महिन्याच्या १२ व्या दिवशी मौलिद साजरा केला जातो.

असे मानले जाते कि, मुहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदी अरेबियातील मक्का इथे ५७० च्या सुमारास झाला. ते अल्लाहचे शेवटचे दूत होते ज्यांनी सर्व मानवांसाठी प्रेम आणि एकतेचा संदेश दिला. आपल्या हयातीत मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली, जे अल्लाहच्या उपासनेसाठी समर्पित होते.

६३२ मध्ये मुहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर, अनेक मुस्लिमांनी त्यांचे जीवन आणि शिकवणी विविध अनौपचारिक सणांसह साजरा करण्यास सुरुवात केली. ८ व्या शतकात या दिवसाला लोकप्रियता मिळाली जेव्हा पैगंबरांचे घर प्रार्थना सभागृहात रूपांतरित झाले.

११ व्या शतकात, इजिप्तमध्ये पहिल्यांदाच ईद-ए-मिलादला अधिकृत सण म्हणून साजरा केला गेला, हा दिवस नमाज पठण करण्यासाठी चिन्हांकित केला जायचा. नंतरच्या मौलवी पवित्र कुराणातील श्लोक सांगत. यानंतर या सणाला अधिक लोकप्रिय झाले.

१२ व्या शतकात सीरिया, तुर्की, मोरोक्को आणि स्पेन सारख्या देशांनी हा दिवस साजरा सुरुवात केली. त्याआधी या देशात या दिवसाला फार काही महत्व दिले जात नव्हते.

इस्लामचे दोन प्रमुख संप्रदाय, सुन्नी आणि शिया एकाच महिन्यात वेगवेगळ्या दिवशी या प्रसंगाचे स्मरण करतात. सुन्नी महिन्याच्या १२ व्या दिवशी साजरा करतात, तर शिया महिन्याच्या १७ व्या दिवशी करतात.

विविध देशांतील बरेच मुसलमान धार्मिकदृष्ट्या या दिवसाचे पालन करतात, तर असे बरेच लोक आहेत जे मानतात की, पैगंबरांचा वाढदिवस नक्की माहित नाही आणि तो अस्तित्वात नाही. ईद -उल -फितर आणि ईद -उल -अधा वगळता कोणताही सण हा एक प्रकारचा बिदा किंवा धर्मातील नाविन्य आहे असे त्यांचे मत आहे.

म्हणूनच अनेक इस्लामिक देशांमध्ये ईद ए मिलाद साजरा होत नाही.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.