रशिया आणि भारताच्या मैत्रीचं खरं उदाहरण म्हणजे ‘ब्रम्होस’ मिसाईल

भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी बोलायचं झालं तर रशियाचं नाव आघाडीवर घेतलं जाईल. या दोन्ही देशांची मैत्री ही आजही नाही, तर कित्येक वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे, पार शीतयुद्धापासून.  म्हणजे कॅलेंडर बदलली, सरकारं बदलली पण दोन्ही देशांचे संबंधावर काडीचाही परिमाण झाला नाही, उलट दिवसांदिवस आणखी घट्ट  होत जातेय.

यामागचं महत्वाचं कारण म्हणजे दोन्ही देशांचं संरक्षाबाबत एकमेकांवर असलेलं अवलंबित्व. एका अहवालानुसार भारत संरक्षासंबंधी गरजेसाठी ३३ टक्के रशियावर अवलंबून आहे. तर रशियाला सुद्धा आपल्या बऱ्याच गोष्टींसाठी भारताची गरज लागते.

पण या मैत्रीचं खरं उदाहरण म्हणजे ब्रह्मोस मिसाईल

१९८०-९० च्या दशकात भारताने ‘पृथ्वी’, ‘अग्नी’ या जमिनीवरून जमिनीलगत अर्थात ‘सरफेस टू सरफेस’ मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा विकास साधलेला होता. ‘आकाश’ क्षेपणास्त्राद्वारे जमिनीवरून हवेत उंचावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या विकासालाही सुरुवात झालेली होती.

या पार्श्वभूमीवर २००१ मध्ये जेव्हा देशात अटल बिहारी वायपेयी यांचं सरकार होत. तेव्हा  जहाजावरून, पाणबुडीतून, यांस जमिनीवरून वा हवाई विमानातून अशा विविध ठिकाणांहून मारा साध्य करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ या अद्ययावत अशा क्रूझ मिसाईलच्या निर्मितीच्या कार्याची सुरुवात करणं ही या क्षेत्रातील पुढील पायरी ठरत होती.

रशियाच्या सहकार्याने सुरू केलेला हा प्रकल्प यशस्वी ठरला आणि २९० कि.मी.चा पल्ला तुफान वेगाने गाठणारं सुपरसॉनिक विक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र नोव्हेंबर २००६ पासून भारतीय सैन्यदलाच्या व नौदलाच्या दिमतीस दिलं गेलं.

रशियाशी सहकार्य करून हा प्रकल्प सुरू केलेला असल्याने भारतातील ‘ब्रह्मपुत्रा’ नदी व रशियातील ‘मोस्क्वा’ नदी यांचा संगमच जणू साधल्याचं संकल्पून या क्षेपणास्त्राचं ‘ब्रह्मोस’ असं नामकरण केलं गेलं. भारताची संरक्षण संबंधातील संशोधन करणार डीआरडीओ ही संस्था व रशियाची एनओपीएम ही कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘ब्रह्मोस’चा विकास सुरू राहिला.

२००४ आणि २००७ मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे या क्षेपणास्त्राच्या एस-मॅनोइरिंगच्या क्षमतेची चाचणी पार पडलेलीच होती. त्यानंतर १८ डिसेंबर २००८ रोजी आयएनएस रणवीर युद्धनौकेवरून केलेली व्हर्टिकल लाँचची चाचणीही यशस्वी ठरली.

मग ५ सप्टेंबर, २०१० रोजी ओरिसामधील चंडीपूर येथून ब्रह्मोसची स्टीप डाईव्ह क्षमता तपासून घेण्यासाठी चाचणी केली गेली. हा महत्त्वपूर्ण प्रयोग यशस्वी ठरला आणि भारताची अद्ययावत क्षेपणास्त्राद्वारे साधलेली संरक्षणसिद्धता अधोरेखित झाली. त्यानंतर नौदल व सैन्यदल यांसोबतच वायुदलाच्या गरजा लक्षात घेऊन ब्रह्मोसच्या अन्य मॉडेलचा प्रकल्प हाती घेतला गेला आणि २०१२ पर्यंत तो साध्य करण्याच्या दृष्टीने योजना केली गेली.

याच काळात ‘अग्नी ३’ या अग्निमालिकेतील अधिक क्षमतेच्या तिसऱ्या क्षेपणास्त्राचाही विकास साधणं सुरू राहिलं. जुलै २००६ मधील त्याची चाचणी अयशस्वी ठरली. मात्र त्यानंतर ओरिसामधील व्हिलर आयलंडवरून एप्रिल २००७ आणि मे २००८ मधील चाचण्या यशस्वी ठरल्या आणि ७ फेब्रुवारी २०१० मधील चाचणीही यशस्वी ठरली.

त्याचप्रमाणे जमिनीवरून आकाशातील उंचीवरच्या लक्ष्याचा परिणामकारकतेने वेध घेण्याच्या दृष्टीने वायुदलासाठीच्या ‘पृथ्वी-२’ क्षेपणास्त्राचा अधिक विकास याच काळात घडून आला. मे २००८ आणि ऑक्टोबर २००९ मधील त्याच्या चाचण्या यशस्वी ठरल्या.

त्याचप्रमाणे नौदलासाठीच्या ‘धनुष’ क्षेपणास्त्राची मार्च २०१० मधील चाचणीही यशस्वी ठरली. या काळात भारताची या क्षेत्रातील कामगिरी इतकी लक्षणीय ठरली की तिसऱ्या जगातील विविध देशांकडून व्यावसायिक तत्त्वावर अशी क्षेपणास्त्रे भारताकडून मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.