आजीच नुस्के वापरून प्रॉडक्ट बनवलं, आज लाखोंची उलाढाल करतेय

चांगलं दिसणं, चांगलं राहणं कोणाला आवडत नाही? .त्यातल्यात बायकांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे चेहऱ्यावर साधा पिंपल आला, डोळ्याखाली डार्क सर्कल्स आले तर महिला मंडळींची मीचमीच चालू होते. हे पुरूषांना सुद्धा लागू होतं बरं का.

आता पुरुष असो किंवा स्त्री मेन मुद्दा काय तर स्किन प्रॉब्लेम. ज्यावर उपाय म्हणून लगेच फेसवॉश, वेगवेगळ्या क्रीम, साबणी आपण बघतो. पण केमिकलचे साइड इफेक्ट होतात म्हणून आपण लगेच इंटरनेट सर्च मारतो.

म्हणजे प्रत्येकाने आयुष्यात गुगलवर ब्यूटीसाठी घरगुती उपायांचा शोध घेतलेला असतो. कारण केमिकल प्रोडक्ट कधी- कधी फेल होतं आणि कधी साइड इफेक्ट सुद्धा पहायला मिळतात. पण घरगुती उपाय म्हंटलं की, रिझल्ट येतो आणि तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. त्यामुळे बरीच जण घरगुती उपायांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात.

आणि फक्त सौंदर्य बाबतीतच नाही तर प्रत्येक गोष्टीत आपण घरगुती उपायांचा अवलंब करत असतो. आता मार्केट मध्ये सुद्धा या घरगुती गोष्टींचं फॅड आहे. आणि हीच गोष्ट हेरली कोलकात्याच्या आकांक्षा मोदी हिने. 

तिने आपल्या आजीच्या घरगुती उपायांचा वापर करून फक्त एक हजार रुपये खर्चून घरबसल्या स्किन केअर उत्पादनांचे मार्केटिंग सुरू केलं. आणि आज 7 वर्षांनंतर तिच्या या व्यवसायाची उलाढाल तब्बल 4 कोटींवर पोहोचली आहे. ..आज आपण तिचीच स्टोरी जाणून घेणार आहोत

तर आकांक्षाने शालेय शिक्षण कोलकात्यात मधलेचं. तिने इंग्रजीतून ग्रॅज्युएशन केले आणि नंतर कॉस्मेटिक केमिस्टचा अभ्यास केला.

एका मुलाखतीत ती सांगते की,तिला आधीपासूनचं घरगुती उपचारांमध्ये रस आहे. घरी आजीकडून ती उबटन बनवायला शिकली होती. त्यानंतर आयुर्वेदाची पुस्तके वाचून ती वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने बनवून वापरायची. याचाचं तिला खूप फायदा झाला, ती सांगते तिने कधीच बाजारातील उत्पादने वापरली नाहीत.

ती सांगते, ‘मी स्वत: गोष्टी वापरायचे पण व्यवसायाचा कधीही विचार किंवा नियोजन केले नव्हते. माझ्या सासूबाईंना त्वचेशी संबंधित काही समस्या होत्या. बराच वेळ त्या डॉक्टरांकडून उपचार घेत होत्या, पण फार काही परिणाम दिसत नव्हते. एकदा त्यांच्यासोबत डॉक्टरांकडे गेले आणि पाहिलं की असे बरेच लोक आहेत ज्यांना त्वचेशी संबंधित काही समस्या आहेत.

दरम्यान, जेव्हा कुठल्याच डॉक्टरांचा गुण आला नाही आकांक्षाने स्वतः बनवलेलं उबटन वापरायला दिलं. ते पूर्णपणे आयुर्वेदिक होते आणि त्यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती मिसळल्या होत्या. काही दिवसांनी त्याचा फायदा झाला.

बरेच दिवस उपचार करूनही जो इफेक्ट दिसून येत नव्हता, तो या उबटनने दिसायला लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या रुटीन लाइफमध्ये त्याचा समावेश केला.

आपल्या सासूबाईंवर याचा चांगला रिझल्ट आल्यानंतर आकांक्षाने त्यावर काम करायला सुरूवात केली. ती त्वचारोग तज्ज्ञांकडे गेली. तेथे उपचारासाठी आलेल्या लोकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या घराचा पत्ता घेतला.

यानंतर आकांक्षाने स्वतःचे बनवलेले उबटन त्या लोकांच्या घरी मोफत पाठवले. त्यांनासुद्धा त्याचा चांगला इफेक्ट मिळाला, ज्यानंतर त्यांनी पुन्हा त्याची मागणी करायला सुरुवात केली. 

आकांक्षाचे कस्टमर वाढत होते. त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला हे काम व्यावसायिक स्तरावर सुरू करण्याबद्दल सुचवलं. आकांक्षाला सुद्धा ते पटलं.

आकांक्षाने लगेचच यावर काम कापायला सुरूवात केली. तिने आधी सगळा रिसर्च केला. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींवर अभ्यास केला. कॉस्मेटिक उत्पादनांची माहिती गोळा केली. यानंतर एक हजार रुपये खर्च करून बाजारातून कच्चा माल आणला आणि आधी 250-250 रुपयांचे पॅक बनवले आणि जे आधी मोफत दिले होते.

लोकांना चांगला परिणाम दिसून यायला लागल्यामुळं दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. त्यांनंतर तिने रूट अँड हर्ब्स नावाने आपली उत्पादनं लाँच केली. त्यांच्या उत्पादनाला विशेष अशी जाहिरात आणि प्रमोशनची सुद्धा गरज पडली. माऊथ पब्लिसिटीने त्यांचे काम झाले. तसचं फरक पडलेल्या लोकांनीचं आणखी काही लोकांपर्यंत ते पोहोचवले.

सुरुवातीला दररोज फक्त दोन किलो उबटन बनवलं जायचं, मात्र नंतर त्याची व्याप्ती वाढवत गेली. आणि उत्पादन सुद्धा. म्हणजे आधी 8 उत्पादनांची त्यांनी विक्री सुरू केली. पण लोकांच्या डिमांडनुसार त्यांनी उत्पादनांमध्ये सुद्धा वाढं केली. आज रूट अँड हर्ब्सची जवळपास 80 उत्पादने आहेत. जी पूर्णपणे आयुर्वेदिक आणि केमिकल फ्री आहेत.

सध्या सोशल मीडियासोबत वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कंपनी उत्पादनाची मार्केटिंग करते. Flipkart, Amazon सारख्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा त्यांची उत्पादन विकली जातात. ते ऑफलाइन प्लॅटफॉर्मवरही मार्केटिंग करत आहोत.

रूट अँड हर्ब्सच्या टीममध्ये सध्या 50 – 60 लोकचं काम करतात. त्यापैकी बहूतेक महिलाचं आहेत. महत्त्वाचं म्हणजे आकांक्षा यांच्या उत्पादनांना फक्त भारतात नाही तर सिंगापूर, यूएसए, यूके अशा अनेक देशांमध्ये मोठी मागणी आहे. 

हे ही वाचा भिडू :

Web Title : Success Story of Root and herbs skin care startup

Leave A Reply

Your email address will not be published.